ENGINEER - 1
तिच्याशी मैत्री झाली.
एक दिवस तो तिला म्हणाला, "तू खूप छान दिसतेस."
ती म्हणाली, "ते तर मला माहितीये. मला जे माहित नाही ते सांग."
मग त्याने तिला Radiation पद्धतीने Heat Transfer कसे होते हे तिला Stefan Boltzmann Equation कागदावर लिहून समजावून सांगितले.
तेव्हा पासून तो सिंगलच आहे ...!
ENGINEER - 2
तिच्याशी मैत्री झाली.
एक दिवस तो तिला म्हणाला, "तू खूप छान दिसतेस."
ती म्हणाली, "ते तर मला माहितीये. मला जे माहित नाही ते सांग."
मग त्याने तिला समुद्रातील जहाजावरून आकाशात उंच उडणाऱ्या विमानाला, Projectile Equation चा उपयोग करून, Missiles च्या साह्याने कसे उद्ध्वस्त करायचे हे आपल्याजवळील लॅपटॉप वर Simulations द्वारे समजावून सांगितले. त्याच्या प्रेझेंटेशन ने प्रभावित होऊन, लग्नानंतरची अनेक वर्षे, तो जे सांगत होता ते ती निमुटपणे ऐकत होती!
महेंद्र इंगळे
