माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो,
या जन्मावर आणि इथल्या जगण्यावर शतदा प्रेम करावे असे तुम्हाला वाटते का ?
इथला चंचल वारा तुम्हाला कधी स्पर्शून गेला आहे का ?
इथल्या जलधारांमधे तुम्ही चिंब भिजला आहात का?
भिजलेल्या काळ्या मातीचा सुगंध तुम्ही अनुभवला आहे का?
भूमीतून वर येणाऱ्या हिरव्या पात्याला बघून त्यातील चैतन्याची जाणिव तुम्हाला झाली का?
येथली लाजरी फुले बघून तुम्हाला कुठल्या हळव्या ओठांचं स्मरण झाले ?
विविध रंगांचा पंखा उघडून ही सांज कोण करते असा प्रश्न तुम्हाला पडतो का?
काळोखाच्या दारावरील नक्षत्रांच्या वेली तुम्ही बघितल्या आहेत का?
सहा ऋतूंचे सहा सोहळे बघून तुमचे भान हरपते का?
बाळाच्या चिमण्या ओठातून बोबडी हाक आली तेव्हा तुम्ही तेथे होता काय?
वेलीवरची फुले आणि नदीचा काठ बघून तुम्हाला कोणाची आठवण झाली ?
इथली माती आपल्या ओठांनी हजारदा चुंबून घ्यावी असे तुम्हाला वाटते का ?
इथल्या जगण्यासाठी अनंत मरणे झेलून घेण्याची तुमची तयारी आहे का?
इथल्या पिंपळ पानावर अवघे विश्व तरू शकते असा तुम्हाला विश्वास आहे का ?
आपला,
महेंद्र इंगळे
(कवी मंगेश पाडगावकर यांच्या 'या जन्मावर या जगण्यावर.....' या कवितेचे प्रश्नार्थक रसग्रहण व त्या अनुषंगाने मित्रांशी केलेला संवाद)
