Showing posts with label The Cat!. Show all posts
Showing posts with label The Cat!. Show all posts

Wednesday, January 15, 2025

The Cat!


The Cat!

बाळू दहावीत गेला. इंग्रजीचा अडथळा दूर झाल्यास, दहावी पास होण्यात बाळूला अडचण येणार नाही असे त्याच्या वडिलांना वाटत होते. बाळूची इंग्रजीची शिकवणी लावायचा त्यांनी निर्णय घेतला व ते त्याला साटम सरांकडे घेवून गेले.

साटम सर इंग्रजीची शिकवणी घ्यायचे. तीन दिवसात फाड फाड इंग्लिश, फर्डा वक्ता, व्यक्तिमत्व विकासाच्या तीन पायऱ्या अशी काही पुस्तके त्यांनी लिहली होती.

साटम सरांनी बाळूला काही जुजबी प्रश्न विचारले. त्याची त्याने समाधानकारक उत्तरे दिली. 

तुला इंग्रजीत काही वाक्ये बनविता येतात का हे विचारल्यावर, This is boy. That is girl. …अशी काही वाक्ये त्याने म्हणून दाखविली. त्याला  Cat बद्दल काय माहिती आहे असे विचारले असता, Cat म्हणजे मांजर असे सांगून तो एक पाळीव प्राणी आहे असे त्याने सांगितले. इंग्रजी शिकतांना Cat या शब्दाला फार महत्व आहे. इंग्रजीतील तो तिसरा महत्त्वाचा शब्द आहे. A म्हणजे Apple, B म्हणजे Bat आणि  C म्हणजे Cat हे जेंव्हा त्याने सांगितले तेंव्हा, त्याचे वडील म्हणतात त्याप्रमाणे तो कच्चा नाही हे साटम सरांच्या लक्षात आले.

त्या नंतर Tense विषयी त्याला काय माहिती आहे हे सरांनी जाणून घेतले. Present, Past व Future असे असे तीन Tense असून त्यातील Present Tense मला आवडतो कारण त्यात वाक्ये लिहिणे सोपे असते हे त्याने सांगितले. आणखी थोडे इकडाचे तिकडचे बोलणे झाल्यावर त्या दिवसाचा क्लास संपला.

दुसऱ्या दिवशी शिकवणीत साटम सरांनी  बाळूला सांगितले, ‘बाळू, इंग्रजीच्या परीक्षेत निबंधाला फार महत्व आहे. त्याकरिता २० मार्क असल्याने, तो तू चांगल्या प्रकारे लिहायचा. बाकी ग्रामर, टेन्स वगैरे तुला बऱ्या पैकी येते. त्याचा सराव सुरू ठेव.

आता मी तुला निबंध लेखन कसे करायचे ते प्रत्यक्षपणे शिकवतो. मागील परीक्षेत The Cat असा निबंध लिहायचा होता, तो मी तुला शिकवतो.

The Cat !Cat is domestic animal. It has four legs and two eyes. Cat drinks milk .There are different types of cats . Some cats live in jungle. Cat sleeps more. There are different colours of cats. I don’t like black colour. I don’t cross road after cat crosses it.

….

….

Cat is very useful animal. No rat when cat.’

हा निबंध १० वेळेस लिहून काढ . त्याचे पाठांतर होईपर्यंत वाचन कर. आता घरी जा. दोन दिवसांनी परत ये.’

दोन दिवसांनी बाळू आल्यावर , सरांनी त्याचे पाठांतर घेतले, त्याने लिहलेला निबंध तपासला व त्यात शुद्ध लेखनाच्या दुरुस्त्या सुचविल्या .

‘बाळू , आता तू निबंध लिहण्यात पारंगत झाला आहेस. असाच निबंध, न घाबरता, आत्मविश्वास पूर्वक परीक्षेत लिहायचा. शिकवणी संपली. उद्या वडिलांना भेटायला सांग.’

शिकवणी संपली हे ऐकून बाळूला आश्चर्याचा धक्का बसला. सरांनी आपल्याला फार काही शिकविले नाही तेंव्हा, परीक्षेत आपले कसे होणार असा विचार मनात आल्यावर त्याला थोडी भितीही वाटली.

बाळूने चाचरत विचारले, ‘पण सर, The Cat ऐवजी परीक्षेत दुसरा निबंध आला तर…?’

‘उदाहरणार्थ?’, सरांनी विचारले 

‘My Father ‘, बाळू 

‘तो असा लिहायचा…

My Father 

My father’s name is Sadashiv. He is farmer. He has a cat. Cat is domestic animal. It has four legs and two eyes…

….

….

My father is very good person.  I love him.’

हे ऐकल्यावर बाळूचा सरांप्रतीचा आदर द्विगुणित झाला. त्याच्या डोळ्यात चमक दिसायला लागली. आता आपण कोणत्याही विषयावर निबंध लिहू शकतो हा आत्मविश्वास त्याच्या मधे निर्माण झाला आहे हे सरांच्या लक्षात आले. तरीही खात्री करून घ्यावी म्हणून सरांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले.

‘बाळू, My Neighbour हा निबंध कसा लिहशील?’

‘Ramesh is my neighbour. He has a cat. Cat is a domestic animmal….’

‘Very good !’मधेच थांबवत सर बोलले. ‘आणि समजा My Country हा निबंध लिहायचा असेल तर …’

सरांचे वाक्य पूर्ण व्ह्यायच्या आत बाळूने सुरवात केली…

‘India is my country. There are different plants and animals in my country. I like animals. Cat is my favourite animal. Cat is a domestic animal. it has…..’

सरांनी बाळूच्या पाठीवर थाप मारून त्याला शाबासकी दिली तेंव्हा, त्याची छाती फुगून पुढे आली .

साटम सरांच्या मार्गदर्शनामुळे व Cat चा योग्य पद्धतीने उपयोग केल्याने, बाळू फक्त इंग्रजीच नाही तर सर्वच विषयात चांगल्या मार्कांनी पास झाला. बाळूने मनातल्या मनात Cat चे आभार मानले.

बाळू आता बाळासाहेब झाला आहे. बाळासाहेब एका प्रमूख राजकीय पक्षाचे नेते म्हणून सभा संमेलनांमध्ये भाषण करतात तेंव्हा, तेथेही त्यांना Cat चा उपयोग होतो. निवडणुकीच्या वेळी प्रचार सभांमधून त्यांना मागणी असते. पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचे नाव असते. बाळासाहेब पक्षाचे प्रवक्ते आहेत. मेन स्ट्रीम मीडिया व लाखोने व्ह्यूअर असलेल्या, यू ट्यूब चैनल वरील पैनल डिस्कसन मधे ते हिरिरीने भाग घेतात तेंव्हाही त्यांच्या सोबत  Cat असतेच!

महेंद्र इंगळे, पुणे 

जानेवारी, २०२५

PS:This post is inspired by famous ‘Cow’ joke, often shared by Prof. V. K. Rangari, the master of humor, during our M Tech Ed days at NITTR, Bhopal.

I believe, many of us would like to have a ‘Cat’ with us!

I am sure you will have fun searching the cats with the people, including professors, entrepreneurs, statesmen, journalists, forget the students and politicians, coming in class rooms, business meet, seminars, talk shows and for public meetings and speeches . Some of them bring their Cat, hiding in power point presentation in their laptop or iphone now a days!

That is the beauty of life! Enjoy it!

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...