Sunday, July 20, 2025

अर्पण !

 उत्तर भारतीय श्रावण मास सुरू झाला आहे.

मराठी श्रावणाची आम्ही वाट पाहत आहोत.

येत्या सहा सात दिवसात तोही सुरू होईल. 

या पावन पर्वावर, पत्नी सोबत मी ओंकारेश्वर मंदिरात आलो आहे. 

मंदिर व परिसरात आकर्षक रोषणाई केली आसल्याने, संध्याकाळच्या शांततेत मंदिर परिसर दिव्य प्रकाशाने न्हालेला आहे.

संध्या आरती नुकतीच संपली आहे. 

पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. 

वातावरणात प्रसन्नता आणि मंदीर परिसरात चैतन्य जाणवते आहे. 

मंद वाऱ्याचा झोत देवस्थानचा सगुण साकार स्पर्श हृदयापर्यंत पोहचवत आहे. 

माझ्याकरिता ओंकारेश्वर मंदिर श्रद्धास्थान आणि ऊर्जेचा स्त्रोत !

पंडितजींनी तिलक केल्यानंतर, साकार निराकार स्वरूपातील श्री शिवशंकर आणि माँ पर्वती यांचे समवेत विराजमान असलेल्या श्री गणेशांच्या चरणी माझे पुस्तक अर्पण करीत आहे.


महेंद्र इंगळे, जळगाव 

जुलै १९, २०२५

No comments:

Post a Comment

Who You Are ?

Who You Are ? While walking the track this morning, a quiet phrase surfaced in my mind - ‘Carried Away.’ It felt like a nudge from within...