आत्मसन्मान!
‘शासकीय सेवेत सन्मानाने जगा !’ या पुस्तकाचे ‘लेखन’ सुरू आहे. खरं म्हणजे लॅपटॉप वर ‘टाइपिंग’ आणि मोबाईल वर ‘स्पीकिंग’ सुरू आहे. मोबाईलवर बोललो की ते टाईप होते. पुण्याला असतो तेव्हा शिवार गार्डन परिसरातील, Vision Flora च्या प्रशस्त लॉबी मधे खुर्चीवर बसून, रस्त्यावरची रहदारी न्याहाळत, येवलेंच्या चहांचा आस्वाद घेत, मोबाईल वर सहजपणे जे सुचते त्यास अनुसरून काही वाक्ये लिहतो. हे लेखन नंतर लॅपटॉप वर कॉपी किंवा ट्रान्सफर करतो. जळगांवला असतो तेव्हा ‘भाऊंच्या उद्यानात’ सकाळी ट्रॅक वर फिरतांना मोबाईल वर बोलतो…लिहतो. घरी लॅपटॉप आणि बाहेर मोबाईल असे खऱ्या अर्थाने हे ‘मोबाईल’ लिखाण आहे. प्रकल्प स्वरूपात हे सुरू आहे.
पुस्तक लेखनाच्या निमित्ताने, आता मी Digital World मधे प्रवेश केलेला आहे! त्या निमित्ताने Web Developing, Graphic Desigining, Podcast, Talk Show, Social Media Management या क्षेत्रातील लोकांशी संपर्क येत आहे. मला नवीन गोष्टी शिकायला, समजून घ्यायला आणि करायला आवडतात. सर्जनशीलता वृद्धिंगत व्हावी या करिता अनेक वर्षांपासून जाणीव पूर्वक प्रयत्न करीत असल्याने, या क्षेत्रातील लोकांसमोर नवीन कल्पना मांडून त्याप्रमाणे काही गोष्टी त्यांच्या कडून करून घेतो. काही स्वतः करतो. पाऊल ठेवले तेथे आजही ठसा उमटतो ही परमेश्वराची कृपा!
काल मी, ‘अविरत प्रयत्नांती, सदाचरणाने आणि परमेश्वराच्या कृपेने जबाबदारीच्या पदावर पोहोलेली व्यक्ती जेव्हा त्या पदाची कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडते तेव्हा ती आत्मसन्मानास पात्र ठरते.’ असा Quote लिहला. Canva चा उपयोग करून, हवे ते बॅक ग्राउंड निवडून त्याचा flyer बनविला. Instagram वर अजय-अतुल व अजय गोगावले आणि मुकेश पाटील यांच्या अत्यंत प्रेरणादायी महाराष्ट्र गीतांचा उपयोग करून त्याचे रील बनविले. ते Insta आणि Fb वर अपलोड केले. स्टेटस ही ठेवला. तो अनेकांना आवडला. त्यांनी 👍 करुन लाईक केले. त्यांना मी धन्यवाद दिले.
काहींनी व्हॉट्सअप वर, ‘खूप creative visual representation आहे.’
‘Quote आणि Visual फार परिणाम कारक आहे.’
या सारखे अभिप्राय पाठविले.
अभिप्राय लिहलेल्यांना सहज म्हणून आणि connectivity असावी व्हावी म्हणून मी धन्यवाद देतानाच,
‘या व्यक्तीला आत्मसन्मानास पात्र कोण ठरविते?’
Answer the Question
And get the Mint !
असे लिहून पाठविले.
अजून पर्यंत कोणी Mint क्लेम केलेले नाही!
No comments:
Post a Comment