मैत्रीचा सोहळा!
चांगले मित्र मिळाले ही ही परमेश्वरचीच कृपा!
चार महिने पुस्तक लेखन आणि प्रकाशन यात व्यस्त असल्याने पुण्याला होतो. त्यांनतर आज प्रथमच मित्रांशी भेट झाली.
१९७८ पासूनच्या सहप्रवासात, हास्य विनोद, विचारांचे आदान प्रदान, कठीण प्रसंगी साथ, एकमेकांना प्रोत्साहन, आठवणींचा गोडवा या साऱ्यांचे शब्दांकन कठीण, पण त्यांचे सार काढून ते ‘अभियांत्रिकी स्पंदने’ या पुस्तकातून मांडले. माझे हे मित्र माझ्या व्यक्तिमत्त्वाचे भाग आहेत. शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव या प्रेमळ धाग्यात आम्ही बांधले गेले आहोत. आयुष्यातील अनेक धाडसी निर्णय मी यांच्या प्रोत्साहनामुळे आणि भक्कम पाठींब्यामुळे घेवू शकलो. अनेक संकल्पनांना मूर्त स्वरूप देवू शकलो. ते या पुस्तकाचा भाग आहेत.
Social and Educational Entrepreneur असलेले आमचे मित्र डॉ. भरत अमळकर हे यशस्वी उद्योजक आहेत. केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. Maharastra State Board of Technical Education, Mumbai वर Governing Coucil Member आहेत. याचा आम्हा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे.
कुशाग्र बुद्धी लाभलेले, VJTI या नामांकित संस्थेतून B E Production पदवी प्राप्त केलले, काही काळ सक्रिय राजकारणात राहून तेथेही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेले, आध्यात्मिक वृत्तीचे आमचे उद्योजक मित्र श्री सुनील बढे यांचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. मुंबई, त्यानंतर SSBT College of Engineering and Technology, Jalgaon आणि गिरणांजनी तंत्रनिकेतन, एरोंडोल हा प्रवास आम्ही सोबत केला.
कृतज्ञता भावाने, मी मित्रांना व विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेच्या शिक्षण विभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या सौ. हेमाताई अमळकर यांना हे पुस्तक भेट दिले.
उद्योजकतेच्या वाटेवर पाऊल ठेवून, काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यावरून आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थ्याने, चिन्मय अमळकरने हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले.
स्पंदनांचे दस्तऐवजीकरण झाले!
तो एक आनंदोत्सव झाला!
तो एक मैत्रीचा सोहळा झाला!!
No comments:
Post a Comment