भ्रमनिरास !
आज सकाळी लक्षदीप पॅलेस समोरील, बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर फिरत असतांना रमेश शास्त्रींनी लिहिलेले, लता मंगेशकर यांनी गायलेले, शंकर जयकिसन यांचे संगीत आणि विमला कुमारीवर चित्रीत झालेले १९४९ च्या बरसात चित्रपटातील *हवा मे उडता जाये मोरा लाल दुपट्टा मलमल का....* हे अप्रतिम गीत ऐकत असतांना माझ्या प्रिय मैत्रिणीस विचारले की.......
'तुझ्याकडे मलमलचा लाल दुपट्टा आहे का?
तो हवेत उडतांना इकडे तिकडे लहरतो का?
थर थर थर थर हवा चालली असतांना
तुझा जियरा डगमग डोलतो का?
फर फर फर फर उडणारी चुनरी
तुझा घुंगट उघडते का?
झर झर झर झर वाहणाऱ्या झरण्यातील पाणी बघून
आणि ठुम्मक ठुम्मक वाजणाऱ्या घुंगरांचा आवाज ऐकून
तुझी चाल मस्तानी होते का?'
तर तिचे उत्तर *नाही* असे आले...
*महेंद्र इंगळे, पुणे*
(अधिक आनंदासाठी मित्रांनी मूळ चित्रफित बघावी. मैत्रिणीस प्रश्न स्वतःच्या जोखमीवर विचारावेत.)

 
 
 
