प्रक्रियेतील आनंद!
सध्या, मी पुस्तक प्रकाशन प्रक्रियेचा(Process) आनंद घेत आहे. पुस्तक प्रकाशित (Product) होणार आहे, त्याचा आनंद मिळणार आहेच! प्रक्रियेतील आनंद घ्यायची कला, मी फार पूर्वी आत्मसात केलेली आहे.
माझे एक अभियंता मित्र यांनी, अमुल्य सूचना केली. माझ्या विषयीच्या, वर्तमान पत्रातील, ४० वर्षांपूर्वीच्या लेखाचा संदर्भ देवून त्यासंबंधी लिहायचे त्यांनी सुचविले. ते मी लिहले.
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक आदरणीय व्यक्तींनी, या पुस्तकील सोशल मीडियावर आलेले भाग वाचून, ते आवडल्याचे अभिप्राय लिहले. त्यात अतिशोक्ती असली तरी माझ्यावरिल प्रेमापोटी त्यांनी लिहले आहे म्हणून मी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.
परवा, एका मोठ्या कंपनीतून वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेल्या माझ्या मित्रांनी, पुस्तकाच्या Cover Design मागील माझी भूमिका आणि ती अंमलात आणण्याकरिता मी उपयोगात अणलेली पद्धती या बाबत माहिती जाणून घेतली. Quality Control चे तज्ज्ञ व तीक्ष्ण नजर लाभलेले हे अभियंते! प्रत्येक गोष्टी मागील कार्य कारण भाव जाणून घेण्याची, त्यांची उर्मी अधिक प्रबळ झाल्याचे बघून आनंद झाला.
एका विद्यार्थ्याने पुस्तकाच्या प्रती विकत घेवून मित्रांना भेट देईल असे कळविले. पुस्तकाची किंमत व पृष्ठ संख्या माहीत नसतांना, प्रकाशनाआधीच ते विकत घेण्याच्या त्याच्या या धाडसी निर्णयाचे मला कौतुक वाटले! पण पुढच्याच क्षणी लक्षात आले…अरेऽच्च्या, Calculated Risk घ्यायचे आपणच तर याला शिकविले आहे!
वरिष्ठ अधिकारी पदावरून निवृत्त झालेले माझे एक मित्र, त्यांनी माझे अभिनंदन करून, ‘प्रत पाठवा. नक्की वाचेल.’, असे कळविले. UNESCO च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जगात या वर्षी, ISBN कोड असलेली, २२ लाख पुस्तके प्रकाशित झाली. जगतील सगळ्यात मौल्यवान संसाधन म्हणजे ‘वेळ’! या पार्श्वभूमीवर, माझे पुस्तक वाचण्या करिता माझे मित्र आपला अमूल्य वेळ देणार आहेत हे ऐकून त्यांच्या विषयी माझा आदर व प्रेमभाव वाढला.
काहींनी माझ्या पुस्तकास स्मरण यात्रा म्हटले, काहींना ते भूतकाळातील रम्य आठवणी वाटल्या तर काहींना अत्यंत प्रेरणादायी! हे बघून माझे पुस्तक कॅलिडोस्कोप आहे असे मला वाटू लगले आहे.
प्रकाशन प्रक्रियेतील व्यक्तींनी, अशा प्रकारचे पुस्तक आम्ही प्रथमच पाहत आहोत, पुस्तकाचे नाविन्यपूर्ण शीर्षक व लेखक परिचय, मनोगता ऐवजी ‘अंतःप्रेणेने…’ असे लिहिणे किंवा अनुक्रमणिका ऐवजी ‘स्पंदने’ लिहिणे असे प्रकार आम्ही प्रथमच पाहत आहोत असे सांगितले. इतर लेखकांनाही ते असेच सांगतात काय या संबंधी मी माहिती घेत आहे.
एका मैत्रिणीने ‘अभियांत्रिकीची स्पंदने’ असा नावात बदल सुचविला. त्यांना धन्यवाद दिल्यानंतर, संयुक्तिक कारण देवून, त्यांची सुचना मी नम्रपणे नाकारली.
पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर असले तरी, या संबंधातील जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान शिकून, मी त्याचा वापर करीत असल्याने, प्रकाशनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत बदल करू शकत असलो तरी सर्वच बदल करणे शक्य होणार नाहीत हे मी नम्रपणे आपणास सांगत आहे.
सर्वप्रकारच्या समस्या सोडविण्या करिता मी System Approach चा मी अनेक वर्षांपासून उपयोग करित आहे. Input चांगल्या प्रतीचे असेल आणि Feedback चा उपयोग करून Process वर नियंत्रण ठेवले तर Product उत्तम प्रतीचा तयार होतो….मग तो एखाद्या समस्येवरिल उपायाच्या स्वरूपात असू द्या किंवा पुस्तकाच्या!
आणि म्हणून हे पूस्तक वैशिष्टपूर्ण किंवा दर्जेदार वगैरे झाले तर आश्चर्य वाटू देवू नका! फीडबॅक स्वरूपात सूचना केल्यामुळे या यशात तुमचा मोलाचा वाटा असणार आहे.
ज्यांना चांगले विद्यार्थी मिळतात ते चांगले शिक्षक होतात!
ज्यांना चांगले श्रोते मिळतात ते चांगले वक्ते होतात!
आणि ज्यांना चंगले वाचक मिळतात ते चंगले लेखक होतात!
मी चांगला शिक्षक आहे का ते विद्यार्थी सांगतील, आणि चांगला वक्ता आहे का ते श्रोते!
पण मी चांगला लेखक होणार हे खात्रीने सांगतो कारण मला तुमच्या सारखे वाचक मिळाले!
पुस्तक वाचल्या नंतर तुम्ही निश्चितपणे म्हणू शकाल….’Everything is of his own except paper and ink!’
No comments:
Post a Comment