ऊर्जेचा प्रपात…
मानवाचा जन्मच मुळात संघर्षातून होतो. मानवाच्या मूळ प्रेरणांमधील संघर्षशीलता ही एक महत्वाची प्रेरणा! हजारो वर्षांपासून, म्हणजे मानवी जीवन अस्तित्वात आले तेंव्हा पासून मानव आपली क्षमता विकसित करण्याकरिता प्रचंड संघर्ष करित आहे. त्यात नवनव्या उंची गाठत आहे. ही प्रक्रिया अव्ह्यावतपणे सुरू आहे. मानवाच्या क्षमतेबद्दल भाकीत वर्तविता केवळ अशक्य!
मानवी क्षमता अमर्याद आहे!
Human potential has no bound!
एखाद्या व्यक्ती कडे किती पराकोटीची क्षमता असू शकते हे, अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असतांना, ऑलिंपिक मधे, १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत, सुवर्ण पदक मिळवणाऱ्या, कार्ल लुईस या धावपटूच्या रोमांचकारी गोष्टीतून मी सांगतो….
ध्येयपूर्ती हे ज्यांनी जिवीत कर्तव्य मानले, त्यासाठी कल्पनातीत संघर्ष केला, त्यांनी इतिहास घडविला. इतिहासाच्या पानांवर त्यांचे नाव सुवर्णाक्षरात कोरले गेले.
अशाच एका धेयवेड्या मुलाची, कल्पना आणि वास्तवता यांच्या मिश्रणातून तयार केलेली ही गोष्ट !
मागील २५ वर्षात ही गोष्ट मी अनेकदा सांगितली. प्रत्येक वेळेस नव्याने सांगितली. गोष्ट सांगतांना एका शब्दातित अवस्थेत मी पोहचतो. माझ्यात अंतर्बाह्य बदल होत आहेत; ऊर्जेचा एक प्रचंड प्रपात निर्माण झाला आहे आणि त्यात माझ्यासह सर्व सभागृह न्हावून निघत आहे अशी भावना माझ्या मनात निर्माण होते !
मागील आठवड्यात शासकिय तंत्रनिकेतन, जळगांव द्वारा उमाळे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात, ही गोष्ट सांगतांना, उमा-महेश्वर मंदिराच्या परिसरातील अत्यंत पवित्र वातावरणात, चैतन्याचा महासागर निर्माण झाला असून, त्यात ऊर्जेचा प्रपात कोसळत आहे व त्यातून निर्माण झालेल्या तुषारांमुळे सभागृहात आनंदाच्या लहरी पसरत आहेत असे चित्र माझ्या मनःचक्षू समोर उभे होते.
प्रा.डॉ. महेंद्र इंगळे, पुणे -फेब्रुवारी, २०२५

 
 
 
