छोट्या मधुरा सोबत रील केले.
ते तुम्हाला आवडले.
सहज म्हणून फेस बुक वर पोस्ट लिहली.
ती तुम्हाला आवडली.
आणखी लिहा म्हटले.
लिहले.
मग तुम्ही ब्लॉग लिहा म्हटले.
Blogger वर लिहले. त्याचे नियम पाळून लिहले.
ते ही तुम्हाला आवडले.
आणखी लिहा म्हटले. आणखी लिहले.
जगभरात अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत असलेले सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे साडेचार हजार माजी विद्यार्थी LinkedIn वर आहेत. LinkedIn वर लिहा म्हटले. तेथे लिहले.
लिहत राहा म्हटले. लिहत राहीलो.
जगभरातील मान्यवर जेथे महत्वाच्या विषयांवर नावीन्यपूर्ण पद्धतीने लिहतात त्या Medium वर लिहा म्हटले. तेथे लिहले. Leadeship, Decision Making, Need for Achievement, Psyche या विषयांवर लिहले. आणखी वेगळ्या विषयांवर लिहले. नाविन्यपूर्ण पद्धतीने लिहले. अंतःप्रेरणेने लिहले. परमेश्वराच्या कृपेने लिहले.
जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या मोठ्या व्यक्तींना, कुठलाही डेटा उपलब्ध नसताना, ऐतिहासिक महत्वाचे निर्णय घेत असताना उपयुक्त ठरू शकेल असे Decision Making चे Model सादर केले.
हे सर्व इंग्रजीत लिहले.
मराठीत लिहा म्हटले.
मराठीत लिहले.
व्यवस्थापन शास्त्रातील (Management) अनेक महत्वाच्या संकल्पनांचा प्रत्यक्ष उल्लेख न करता, त्यांना अनुसरून, प्रसंगांचा, घटनांचा उल्लेख करून गोष्टी रूपाने लिहले.
ते कॅलिडोस्कोप सारखे झाले. काहींना ते स्मरणरंजन तर काहींना प्रेरणादायी वाटले. पण सर्वांना आवडले.
पुस्तक लिहा म्हटले.
ते लिहले.
आणखी लिहा म्हणत आहेत.
आणखी लिहत आहे.
वेब साइट सुरू करा म्हटले. www पेक्षा https ही वेबसाइट अधिक secured आणि latest trend ची आहे म्हणून ती सुरू करा म्हटले.
तसे केले.
https://mahendraingale.com
या नावाने ती सुरू केली.
प्रक्रियेचा आनंद घेत आहे.
तो तुम्हालाही मिळावा म्हणून लिहले.
No comments:
Post a Comment