मित्र आणि स्नेहीजनहो,
तर्जनीने ‘पब्लिश’ या टॅबला स्पर्श करताच ‘हे’ पुस्तक प्रकाशित होणार आहे, कोणत्याही क्षणी!
…आणि त्याच क्षणाला, जिंतूरचे रामा भराडी आणि NITTTR चे माजी विद्यार्थी व सोमालीयाचे राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेतील हर्षवर्धन आणि रशियातील निकिता, मुंबईचे पंकज शाह आणि दिल्लीचे सतीश सुर्यन, पुण्याचे सतीश केरकळ आणि जळगांवचे कैलास वानखेडे हे पुस्तक वाचू शकतील!
चांगदेव मधील माझे स्नेही, शाळा कॉलेजातील माझे मित्र, माझे सहकारी, माझे विद्यार्थी हे पुस्तक आप आपल्या सवडीने घरी बसून वाचू शकतील.
प्रकाशनानंतर, या पुस्तकाच्या जाहिरात आणि वितरणाची जबाबदारी एका आंतर राष्ट्रीय संस्थेकडे दिलेली आहे. यात बऱ्याचशा संकल्पना माझ्या आहेत, विशेषतः जाहिरातीतील मजकुराबाबत.
आवश्यक ते बदल करून, या पुस्तकाचे इंग्रजीतील, केलेले रूपांतर (भाषांतर नाही!)‘Engineering Heart Beats’ हे बेस्ट सेलर होऊ शकते अशी शक्यता या क्षेत्रातील काही व्यक्तींनी वर्तविली आहे. विविध विषय, नाविन्यपूर्ण पद्धतीने त्यांची केलेली मांडणी, अनुभवांशी निगडित करून, त्यावर प्रभावी शब्दात केलेले भाष्य, विचारातील स्पष्टता व सलगता, सकारात्मकता, हृदय स्पर्शी शब्दांनी साधलेला संवाद, आणि सगळ्यात महत्त्वाचे, व्यक्ती, स्थळ, काळ आणि घटना यांचा उल्लेख असल्याने, निर्माण झालेली Authenticity, जिचे जागतिक पटलावर फार महत्व आहे …अशी काही महत्वाची कारणे त्यांनी मला सांगितली. असे होऊ शकते याची मला जाणिव आहे. तो एक मोठा प्रकल्प असेल व मला त्यात आपले सहकार्याची आवश्यकता भासेल.
आणखी असे की, पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमात मी आपल्याला सहभागी करून घेवून, आनंद देवू इच्छितो…
हे पुस्तक वेग वेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या व्यक्तींच्या हस्ते, वेग वेगळ्या वेळी प्रकाशित होणार आहे.
आपणही, आपल्या घरून, कार्यालयातून, आपल्या कुटुंबियांच्या व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत, ते आपल्या हस्ते प्रकाशित करू शकाल. त्याची पूर्व सूचना दिल्यास त्यासंबंधीची व्यवस्था करता येईल.
आपला स्नेहांकित,
महेन्द्र इंगळे
No comments:
Post a Comment