Thursday, October 9, 2025

अभियांत्रिकी स्पंदनांची लय क्राफ्ट महोत्सवात!

 दसरा संपला...

आता दिवाळीची तयारी सुरू झाली आहे...

आणि नेहमीप्रमाणे, मॉल्सनी आपली दिवाळीची झगमग सुरू केली आहे…

पुण्यातील माझी आवडती ठिकाणं, औंध मधील West End Mall आणि वाकड मधील Phoenix Mall of the Millennium आता दिवाळीच्या रंगात न्हालेली आहेत.

West End Mall मध्ये दरवर्षी दिवाळी निमित्त केलेली सजावट म्हणजे एक कलात्मक पर्वच! छोट्या मधुरा सोबत तिथे जाणे, वेग वेगळ्या इवेंट्स मधे भाग घेत असतांना तिच्या सोबत फोटो काढणे हे माझं खास आवडतं काम. पुण्यात गेल्यावर हे नक्की करायचं आहे. Cross Word ला ही भेट द्यायची आहे.

पण सध्या मी जळगावमध्ये आहे—भारतीय क्राफ्ट उत्सव २०२५ मध्ये, पत्नीच्या सोबतीने. त्या त्यांच्या आवडीच्या वस्तू पाहत असताना, मी हळू हळू प्रदर्शनाच्या शेवटाकडे चालत गेलो… आणि थांबलो...

का? कारण मी पोहोचलो होतो माझ्या आवडीच्या विभागात—पुस्तक प्रदर्शनात!

तेथे मी रेंगाळलो आणि रमलो

काही पुस्तकं चाळली, व्यवस्थापकाशी थोडं बोललो, आणि सहज सांगितलं की मी लेखक आहे. एवढं पुरेसं होतं—ते मला थेट मालकांकडे घेऊन गेले.

ते होते श्री. सणस. प्रदर्शनाच्या दुसऱ्या टोकाला, टेबलावर मांडलेल्या पुस्तकांची रजिस्टर मधे नोंद घेत  होते. साधी वेशभूषा, साधं व्यक्तिमत्त्व. मूळचे सातारा जिल्ह्यातील वाईचे, आणि आता पुण्यात स्थायिक. श्री. सणस आणि त्यांचे चिरंजीव गेल्या अनेक वर्षांपासून पुस्तक प्रदर्शन आणि विक्रीचं काम निष्ठेने करत आहेत.

पुस्तक विक्रीबद्दल बोलताना लक्षात आलं की हे व्यवसायापेक्षा सेवाभावाने चाललेलं काम आहे. मी माझं विजिटिंग कार्ड दिल्यावर त्यांनी व्यवहाराचा विषय न करता सहजपणे सांगितलं—तुम्ही तुमचं पुस्तक इथे ठेवा. पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि इतर ठिकाणी आमची प्रदर्शने असतात, तिथेही ठेवता येईल.

अभियांत्रिकी स्पंदनांची लय हस्तकलेच्या वस्तूंमध्ये, दिव्यांच्या झगमगाटात वाचकांच्या उत्सुक नजरे पर्यंत पोहचली

अविनाशी स्पंदनं संथपणे, लयबद्धरित्या पसरत आहेत हा अनुभव मी पुन्हा घेतला!

महेंद्र इंगळे @ जळगाव, ऑक्टोबर ९,२०२५  

 

No comments:

Post a Comment

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...