Saturday, March 8, 2025

Ms. Damayanti Ingale-Marathe

 

सौ. दमयंतीताई इंगळे-मराठे…

जळगाव जिल्ह्यातील, बोदवड येथे, बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ. दमयंतीताई इंगळे-मराठे माझ्या बहिण आहेत. 

सेवाभावी वृत्तीने  कार्य करण्याचा वारसा त्यांना बाबांकडून लाभलेला आहे. आपल्या पदाचे काम सांभाळून, ग्रामीण भागातील महिलांकरिता स्वयंरोजगाचे मोफत कार्यक्रम त्या राबवित असतात. अंगणवाडी सेविका व मदतनीसांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून त्या त्यांच्या वैक्तिक सुखदुःखात सहभागी असतात. महाराष्ट्रातील सेविका संघटनेचे काही काळ त्यांनी  नेतृत्व केले.

प्रशिक्षण कार्यक्रम हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, पुणे (यशदा) येथील अनेक महत्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

बालकांचे योग्य पोषण सुनिश्चित करण्यासाठी, ‘राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन’  स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य!  सदर प्रकल्पास युनिसेफ (United Nation’s Children Fund) ने पूर्ण सहाय्य केलेले आहे.

महाराष्टातील कुपोषणाच्या घटना कमी करणे, त्याकरिता, स्त्री गरोदर राहिल्यापासून मूल दोन वर्षांचे होईपर्यंत म्हणजे पहिल्या १००० दिवसांवर लक्ष केंद्रित करणे; योग्य स्तनपान, पूरक पोषक आहार, बाळाच्या वाढीचे सनियंत्रण व संवर्धन, किशोरवयीन मुलींचे शिक्षण व लग्नाचे योग्य वय यासंबंधी स्त्रीयांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन ही मिशनची प्रमुख उद्दिष्टे आहेत. मिशन राबविण्यात जळगांव जिल्हा अग्रेसर आहे. सौ. दमयंतीताई मिशन राबवितांना, शब्दशः अहोरात्र काम करित आहेत.

सामाजिक बांधिलकी मानून, समर्पित भावनेने कार्य, माहितीचे संकलन करून ते अचूकपणे व वेळेत सादर कारणे, कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन व त्यात सर्वांचा सहभाग, पारदर्शीपणा, बोलण्यात नम्रपणाबरोबरच स्पष्टपणा, स्थानिक पदाधिकारी तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी यांचेशी स्नेहार्द्र संबंध ही त्यांची काही गुणवैशिष्ट्ये!

लोकमत या लोकप्रिय दैनिकाने, आज महिला दिना निमित्त, त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांच्या कार्याचा गौरव केला ही आनंददायी बाब आहे.

प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, पुणे …मार्च ८, २०२५

No comments:

Post a Comment

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...