Tuesday, June 3, 2025

IIT, Bobay

 ४७. IIT, Bobay

SPCE मधे शिकत असतांना अनेकदा IIT, Bomby मधे जायचो. आमच्या एका मित्राचा भाऊ तेथे शिकत होता. त्याला भेटायला मित्रा सोबत पहिल्यांदा गेलो. येथे सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेल मधे राहणे बंधनकारक होते. त्याच्या रूम मधे अभ्यासाच्या साहित्या व्यतिरिक्त, गिटार, अनेक इंग्रजी कादंबऱ्या, Rubik’s Magic Cube  अशा अनेक गोष्टी दिसल्या. त्याचे काही मित्र तेथे आले व त्यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या Mood Indigo  या स्नेहसमेंलनातील त्यांच्या सहभागा विषयी चर्चा केली. 

नंतर तो आम्हाला कॅम्पस दाखवायला घेवून गेला. पवई येथील ५४५ एकरातील निसर्ग सुंदर परिसरात अनेक हॉस्टेल्स व डिपार्टमेंटच्या बिल्डिंग होत्या. डिपार्टमेंटच्या सर्व बिल्डिंग, सुंदर फूलांच्या वेलींनी सजलेल्या, ‘Infinite Corridor’ ने जोडल्या गेलेल्या होत्या. भव्य लायब्ररी बघितली. तेथे एक महत्वाची माहिती मिळाली. मुंबई विद्यापीठातील, VJTI  आणि  SPCE च्या विद्यार्थ्यांनी I-card जमा केल्यानंतर, ते लायब्ररी सुविधा वापरू शकत होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवळच असल्याने, अनेकदा चित्ते व मगरी भक्ष्याच्या शोधात कॅम्पस मधे येतात हे मित्राच्या भावाने सांगितले. ऑलिंपिक दर्जाचे स्विमिंग पूल, फुटबॉल, हॉकी, क्रीकेटचे ग्राऊंड्स, टेनिस, बास्केट बॉल, वॉली बॉलचे कोर्टस आम्ही बघितले. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांकारिता असलेले ‘Students’ Activity Center’ (SAC) बघितले. येथील विद्यार्थी पॅरा ग्लायडिंग आणि इतर साहसी खेळात भाग घेत असतात अशी माहिती त्याने दिली. हे सर्व बघून मी फार प्रभावित झालो. संधी मिळाल्यास आपण येथून M Tech करावे असा विचार माझ्या मनात आला. 

काही दिवसांनी, Mood Indigo बघायला गेलो. तेथे बघितलेले अनेक कार्यक्रम आम्ही SPACE 82 या आमच्या स्नेहसंमेलनात आयोजित केले. 

प्रा. परमेश्वरन आम्हाला hydraulics शिकवायचे. त्यांच्याकडून आयआयटी मधील घटनांची माहिती मिळायची. ते येथून Ph.D. करित होते. अंतिम वर्षात, प्रा नागराजू यांच्या मार्गदर्शना खाली करित असलेल्या Geo-Tech प्रोजेक्टच्या अनुषंगाने, मी अनेकदा तेथील लायब्ररी मधे गेलो.

अंतिम वर्षाची परीक्षा संपल्यानंतर, IIT-B कडे M Tech प्रवेशाकरिता अर्ज केला. तेथे M Tech (Geo-Tech) करिता निवड झाली. परंतु, त्याकरिता प्रवेश न घेता, मी सहाय्यक अभियंता म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्यात उमरगा येथे रुजू झालो.    

भारतात, १९५० मधे , Indian Institute of Technology, Kharagpur या पहिल्या IIT ची स्थापना झाली. त्यानंतर १९६१ पर्यंत, IIT-B, IIT-M, IIT-K, IIT-D या संस्थांची स्थापना झाली.पं जवाहरलाल नेहरू या संस्थांना ‘आधुनिक भारताची मंदिरे’ म्हणायचे. UNESCO आणि सोविएट रशियाच्या मदतीने, १९५८ मधे, Indian institute of  Technology, Bombay या संस्थेची स्थापना झाली. यूनेस्को मार्फत, सोविएत रशियाने, या संस्थेक‍रिता Equipment, Machinery दिले तसेच आपल्या देशातील तज्ञ प्राध्यापक (Faculty) या संस्थेत प्रतिनियुक्तिवर पाठविले.

मी आयआयटी मधे जायचो तेंव्हा तेथील विद्यार्थ्यांचे बारकाईने निरीक्षण करायचो. ते कसे बोलतात, कसे चालतात, कसे विचार करतात याचे निरीक्षण मी करायचो. लायब्ररी मधे ते कोणती पुस्तके वाचतात, कॅंटीन मधे कोणत्या विषयांवर बोलतात हे मी बघायचो. एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली होती की त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. त्वरित फॉर्म्युला डिरायइव करून, कुठलाही प्रॉब्लेम ते सॉल्व करू शकतात. आणि हे सर्व ते आनंदाने आणि हसत खेळत करतात.

मुलगा, हर्षवर्धन ९वीत असतांना, आम्ही त्याला आयआयटी मधे घेवून गेलो होतो. दहावीत असतांना, वाढदिवसा निमित्त मी त्याला, रॉबिन शर्मांचे ‘Towards Greatness’ हे पुस्तक भेट दिले होते. चि हर्षवर्धन यांस, महानतेच्या दिशेने वाट चाल करण्या करिता….शुभेच्छ्यांसह सप्रेम भेट!, असे लिहून, खाली मी स्वाक्षरी केली होती. University of Texas, Dallas येथून M S Computer Science केल्यानंतर, काही वर्षे , Microsoft मधे राहिल्यानंतर, आता त्याच्या आवडीचे काम असलेल्या एका प्रतिष्ठित कंपनीत, तो सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे.

माझ्या आयआयटी भेटींचा मला शिकत असतांना आणि पुढे शिकवित असतांना फायदा  झाला, तसा तो हर्षवर्धनलाही झाला असावा!

No comments:

Post a Comment

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...