कळशीतील पाणी!
तापी- पूर्णा नद्यांच्या संगमा ठिकाणी, किनाऱ्यावर उभा राहून मी अथांग जलाशयाकडे बघत आहे. सेंद्रिय गवतावर माझे पाय भिजले आहेत. हातात कळशी आहे. नुकताच पाऊस कोसळून गेला आहे. आकाश निरभ्र झाले असून सभोवतालच्या परिसराला झळाळी अली आहे आणि वातावरण चैतन्याने भरून गेले आहे. वातावरणात गारवा आहे. पक्षी त्यांच्या पंखांनी पाणी झटकत, झाडांच्या फांद्यांवर विसावा शोधत आहेत. नावाड्यांनी होड्या सोडायला सुरवात केली आहे. तराफ्यांवर बसून, प्रवाहात खोलवर जाऊन, भोई जाळे फेकत आहेत.
काही तरुण तरुणी नद्यांना आलेले पूर बघत, पनघटावर हास्य विनोदात मग्न आहेत. वटेश्वर मंदिराच्या शेजारी निंब आणि पिंपळ एकमेकांना घट्ट मिठी मारून उभे आहेत. त्यांच्या पारावर बसून भाविक मंडळी भजने म्हणत हरी नामात तल्लीन झाली आहेत. त्यांचे स्वर चांगदेव मंदिरच्या गाभाऱ्यातील मंत्रोच्च्यारांशी समरस झाले आहेत. मंदिरात, संत व साधू अभिषेकाच्या पवित्रतेत लीन झाले आहेत.
हातातील कळशी प्रवाहात बुडऊन भरून घ्यावी. नदी पात्राकडून मंदिराकडे जाणाऱ्या पनघाटवरील पायऱ्यांवरून चढून, वटेश्वर महादेवावर जल अभिषेक करावा, नंतर पनघटा वरील तरुण तरुणींना आणि पारावर बसलेल्या भाविकांना, ते तहानले असतील तर कळशीतील पाणी द्यावें असा विचार मझ्या मानात आला!
No comments:
Post a Comment