Great Author!
आज प्राचार्य एम एस महाजन सरांना भेटलो.
सरांचे, शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथे असताना, १९८६ मधे, जेव्हा Statistical Quality Control हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा ती आम्हा सर्वांकरिता अभिमानाची गोष्ट ठरली होती. धनपत राय सारख्या नामांकित पब्लिशरनी हे पुस्तक प्रकाशित केले होते. देशातील जवळ जवळ सर्व विद्यापीठात आणि प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयांत विद्यार्थी आणि प्राध्यापक हे पुस्तक वापरत होते.
प्रकाशकांच्या आग्रहानुसार, सरांनी १९८२ मधे हे पुस्तक लिहायला सुरवात केली. Statistical Quality Control या विषयातील जागतिक स्तरावर मान्यता असलेले तज्ञ Eugene Grant यांनी या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक लिहले होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक असलेले Grant हे सरांचे आदर्श होते. परंतु त्यांचे हे पुस्तक विद्यार्थ्यांनाच काय प्राध्यापकांनाही समजायला अवघड जायचे!
केरळ राज्यातील त्रिचूर येथे Total Quality Management (TQM) या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमात प्रा. महाजन सर सहभागी झाले असताना, प्रशिक्षण देणारे प्रा. राघवेंद्र यांना श्री महाजन यांचे कार्यक्रमात लक्ष नाही असे समजून त्यांना एक प्रश्न विचारला. महाजन सरांचे खरोखर लक्ष नव्हते. परंतु समयसूचकता बाळगून, त्यांनी बोर्डवर लिहलेले काही शब्द बघून त्या अनुषंगाने बोलायला सुरवात केली. ५/७ मिनिट ते बोलत होते. प्रा. राघवेंद्र आश्चर्य चकित होऊन म्हणाले, “यातील बराचसा भाग अजून शिकवायचा आहे, मिस्टर महाजन!”. तेव्हा प्रा. धनोकरांनी सांगितले, ‘सर, ‘Statistical Quality Control’ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रा राघवेंद्रांनी त्यांना नाव विचारले. नाव ऐकल्यानंतर, “या विषया करिता मी तुमचेच पुस्तक वापरत असतो.”, असे ते म्हणाले.
या सारखे अनेक अनुभव सरांनी सांगितले. Author होण्याचे काय फायदे असतात तेही सांगितले. अशा थोर व्यक्तींचा सहवास आणि आशीर्वाद लाभल्याने, मलाही ते मिळतील हा विचार माझ्या मनात आला!
No comments:
Post a Comment