प्रिय मित्रा,
Autobiography या ब्लॉगमुळे प्रभावित होऊन तू मला पुस्तक लिहण्याविषयी मार्गदर्शन मागितले हे फार बरे केले! तुला वैक्तिक मार्गदर्शन, खरे तर अनुभव कथन केलेलेच आहे. त्यात थोडा बदल करून, आणखी काही जणांना ते उपयुक्त ठरू शकेल आणि माझ्या लेखन प्रक्रियेविषयी माहितीही कळेल म्हणून हा ब्लॉग लिहीत आहे.
काही दिवसांपूर्वी, ‘Write Autobiography!’ ही पोस्ट मी FB वर लिहली. अनेकांना ती आवडली. त्यावर त्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. इंग्रजीत लिहिलेल्या पोस्टलाही एव्हढा प्रतिसाद मिळतो हे बघून माझा उत्साह निश्चितपणे वाढला. मग मी ती पोस्ट ‘Medium’ करिता लिहली. या प्लेटफॉर्मवर लिहतांना, काही औपचारिकता पाळून, मोजक्या शब्दात प्रभावी पणे कसे लिहता येईल याचा विचार करून, त्या अनुषंगाने लिखाणात बदल करावा लागतो. त्या नुसार बदल करून मी ‘Why Every Great Person Must Write His Autobiography’ या शीर्षकाचा ब्लॉग लिहला.
Medium वर नवोदित लेखकांपासून ते Strategy Advisor Roger Martin, Best Selling Author Jon Krakauer, 44th President of US Barack Obama यांच्या सारखे मान्यवर लिहतात.
मागच्या आठवड्यात, Medium कडून, माझ्या सर्व पोस्ट पैकी ही सर्वात जास्त पाहिली गेलेली पोस्ट म्हणून अभिनंदनपर संदेश आला. तो मी आपल्या सोबत शेयर केला. फेसबुकवरून, असे अभिनंदनपर संदेश नेहमी येत असतात. ते स्वतःहून माझ्या पोस्ट Recommond करत असते.
आज तर या पोस्ट मधील, ‘Share your story when the time is right, and when the people are ready to listen!’ हा quote वापरून त्यावर मी रील बनविला. तो ही अनेकांना आनंद देत आहे.
लेखनाचे विविध प्रकार आहेत. पण मी या ब्लॉग मधून, आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहण्याबद्दल लिहले आहे. पण ते इतर लेखनालाही काही प्रमाणात लागू होऊ शकते.
प्रिय मित्रा,
तू पुस्तक लिह. जरूर लिह. पण काही गोष्टींकडे लक्ष असू दे. फक्त लक्ष असू दे. त्यामुळे विचलित होऊ नकोस.
तु Whatsapp वर लिहतोस. वेग वेगळ्या ग्रुपवरील मित्रमंडळी ते वाचतात. त्यावर 👍आणि 👌 असे करतात. सावधान! येथेच सावधान होण्याची वेळ आहे. ती तु साध. पुस्तक लिहल्यावर ते वाचतीलच याची खात्री देता येणार नाही. तुझ्याकडे असलेल्या व्यवहारिक शहाणपणाचा येथे वापर कर आणि पुस्तक लिही.
व्यक्ती तेवढ्या प्रकृती असे आपण म्हणतो. पण प्रामुख्याने जगात दोन प्रकारची माणसे आहेत. शहाणे आणि वेडे! तसे ते नसते तर जग नीरस झाले असते. संपूर्ण विश्व हे विरोधभासाने भरले आहे. स्त्री-पुरुष, रात्र-दिवस, सुख-दुःख, काळा-गोरा, चांगला- वाईट तसेच शहाणे आणि वेडे ! कोणाच्या पंक्तीला बसायचे ते तू ठरव, कारण या प्रक्रियेत तुला अनेक व्यवहार्य सल्ले मिळतील.
लिहणे महत्त्वाचे. किती जण वाचतात ते गौण आहे. लिहणे तुझी मानसिक गरज असू शकते. पूर्वी व्हॉट्सअप नव्हते तेव्हा तु ४० पानी वहीत लिहायचा. एखाद दुसरा लेख किंवा अभिप्राय वृत्त पत्रात छापून यायचा. आता ते ही सोपे राहिले नाही. प्रासंगिक लिहण्या करिता सध्यातरी WA आणि FB शिवाय पर्याय नाही. तुला फार लिहतो म्हणून ग्रुप वरुन काढून टाकल्यास पुन्हा एकदा नोटबुक आणि पेनला शरण जा! पण लिहीत राहा.
लेखन हे अभिव्यक्त होण्याचे एक साधन आहे. त्याच्यामुळे सर्जनशीलता वाढते. म्हणून तू लिहीत रहा. FB ला शरण जा. सावधानता बाळगून, Friends आणि Followers च्या जाळ्यात न अडकता तेथे भरभरून लिह, म्हणजे टाईप कर. मग तेथेही लोक तुला सांगतील. तुला दैवी देणगी लाभली आहे. तुझ्यावर सरस्वतीची कृपा आहे वगैरे. काही जण ‘I am proud of you’ असे लिहून तुझे कौतुक करतील. तुला GIF पाठवतील. यातील मनापासून किती आहेत हे जाणण्याचा प्रयत्न कर. ‘Who You Are?’ हा माझा ब्लॉग वाचल्यावर ते समजण्यास तुला मदत होऊ शकते. तू उद्यपित होऊ नकोस. विचलित होऊ नकोस. मध्यात राहा. सावधान!
पुस्तक लिहिणे आणि प्रकाशित करणे आता फार सोपे झाले आहे. Amazon KDP आणि Pothi.com या सारख्या प्लॅटफॉर्म्सवर एक रुपयाही खर्च न करता, ७२ तासात तुझे पुस्तक प्रकाशित होऊ शकते आणि जगभरात ते कुठेही वाचले जाऊ शकते. POD म्हणजे प्रिंट ऑन डिमांड या पद्धतीची निवड करून, वाचकांना विकत घेण्याकरिता link उपलब्ध करून दिल्यास, पाणी पावसाचा, ट्रॅफिक, पार्किंग असा कुठलाही त्रास न होता, १ ते १००० प्रती तिसऱ्या दिवशी घरपोहच मिळू शकतात. यात काही अडचण आल्यास मी आहेच. लिहणे, शीर्षक, प्रूफ रीडिंग, कवर डिझाईन- फ्रंट, बॅक, स्पाइन-, बुक साईज, फॉरमॅटिंग, पेपर टाइप, स्केचेस, एडव्हर्रटाइजमेंट, मार्केटिंग, SEO, Website Design, पॉडकास्ट याचा माझ्याइतका क्वचितच एखाद्या लेखकाला अनुभव असेल! तेव्हा तू पुस्तक लिहायला सुरवात कर.
खरे तर असा सल्ला देणे हा वेडेपणाच आहे. शहाण्याने हे करू नये. पण केवळ मित्रप्रेमामुळे मी ते केले हे एक कारण. आणि दुसरे…
ज्यांना सत्य समजले आहे ते बोलत नाहीत आणि लिहित नाहीत. मला ते अद्याप समजले नसल्याने, ते समजेपर्यंत मी बोलणार आहे आणि लिहणार आहें. या प्रक्रियेतून त्याच्या अधिक जवळ मी जाऊ शकेल असा माझा विश्वास आहे!
तुझाच,
महेंद्र इंगळे, जळगांव @ ऑगस्ट ६,२०२५
No comments:
Post a Comment