Sunday, August 10, 2025

गोम आणि तत्वज्ञ!

 गोम आणि तत्वज्ञ!

—————————————————————————

विडंबनात्मक लेखन हा वाचकांपर्यंत पोहचण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. कारण हे लेखन वाचकाला अंतर्मुख करते. विडंबनाच्या माध्यमातून मानवी स्वभावावर आणि व्यवहारावर सूक्ष्म भाष्य करता येते. यात लेखक स्पष्टपणे अर्थ सांगत नाही, तर वाचकांच्या संवेदनशीलतेवर तो अर्थ शोधण्याची जबाबदारी सोपवतो. 

—————————————————————————

गोम ही एक सर्पिणी कृमी! तिच्या शरीराचे अनेक खंड, प्रत्येक खंडावर दोन पाय ! चाळीस पेक्षा अधिक पाय असलेली गोम, पायांचा विशिष्ट पद्धतीने उपयोग करून, शरीर मागे पुढे करीत ती अतिशय लयबद्ध पद्धतीने आणि वेगात चालते. तिच्या चालीत एक सहजता, एक गती, एक सौंदर्य असते!

ती चालत असतांना एका ‘तत्त्वज्ञाने’ तिला थांबवून प्रश्न विचारला, ‘तू चालायला सुरवात करताना कोणता पाय पहिल्यांदा उचलतेस ?’

या तत्त्वज्ञाने कृष्णद्वीपातून व्यवस्थापन शास्त्राचे प्रशिक्षण घेतले होते. त्याच्या मनात संशोधन सुरू असते, ‘गोम मधे इतकी ऊर्जा कुठून येते?’ , ‘ तिने पायांचा कार्यक्षम वापर केल्यास तिचा वेग वाढू शकेल काय?’  या विषयी सखोल अभ्यास करण्याकरिता त्याने प्रश्न विचारला होता.

गोम थांबली. ती गोंधळली. यापूर्वी, तिने याबाबत कधी विचार केला नव्हता. ती विचार करू लागली. पण तिला या बाबत काही एक सुचत नव्हते. कधी डावा, कधी उजवा, मागचा आणि पुढचा पाय उचलून बघून ती प्रात्यक्षिक करून पाहू लागली. या प्रक्रियेत, ती जागच्या जागी उलट सुलट होत होती. वर जात होती, खाली पडत होती. तिच्या आजू बाजूला अनेक कृमी, किटक जमले आणि तिची गंमत बघू लागले. यातील काही तिचे भक्ष्य होते. 

गोम प्रश्नाचे उत्तर देण्याच्या स्थितीत नाही हे पाहून तत्वज्ञ शांतपणे निघून गेला!

No comments:

Post a Comment

Cinematic Adventure, Reimagined !

  Cinematic Adventure, Reimagined ! Long ago, I had a brief encounter with Hindi cinema — a moment I fondly described in my book as a “Ci...