Saturday, June 13, 2026

यात्रा समृद्ध जपानची – जळगावच्या परिवर्तनाची दिशा

यात्रा समृद्ध जपानची – जळगावच्या परिवर्तनाची दिशा

पुण्यातील, विशेषतः पिंपळे सौदागरमधील सततच्या घडामोडींनी गजबजलेल्या जीवनानंतर जळगावला परतल्यावर मनात सहज प्रश्न उमटतो – जळगावची आकर्षणे काय आहेत 

उत्तर मिळते: 

ओंकारेश्वर मंदिर – जळगावच्या वैभवाचा आधार आणि तेथील शांतता

भाऊचे उद्यान- तेथील हिरवाई आणि तेथील चैतन्य

भरतदादा अमळकर- समप्रित आणि प्रेरणादायी  व्यक्तिमत्त्व 

आजच्या कार्यक्रमात – यात्रा समृद्ध जपानची’ या अभ्यास दौऱ्याच्या संदर्भात डॉ. भरतदादा अमळकर आणि सौ. हेमाताई अमळकर यांनी अतिशय उत्तम सादरीकरण केले. जपान म्हणजे शिस्त, तंत्रज्ञान, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक परिवर्तन यांचा अदभूत  संगम – हे त्यांनी उदाहरणांसह आणि चित्रफितींच्या माध्यमातून आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत सादर केले.

त्या अनुषंगाने त्यांनी देशातील सद्यस्थितीतील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे विवेचन केले आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला. अभिमानाची बाब म्हणजे ते या प्रक्रियेचे कृतीशील घटक आहेत.

कार्यक्रमाआधी, अनेक मान्यवरांसह महापौर सौ. दीपमालाताई काळे यांची भेट झाली. त्यांच्या कार्यास शुभेछ्या दिल्या. 

आगामी काळात सामाजिक संस्था आणि राजकीय नेते भरतदादा अमळकर यांचे मार्गदर्शन घेतील आणि जळगावला वैभवाच्या शिखरावर पोहोचवतील, अशी आशा मी बाळगतो.

Dr. Mahendra Ingale @ Jalgaon on June 13, 2026

Author of “Value-Based Leadership” mvingale2405@gmail.com

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls

 

 

 

No comments:

Post a Comment

यात्रा समृद्ध जपानची – जळगावच्या परिवर्तनाची दिशा

यात्रा समृद्ध जपानची – जळगावच्या परिवर्तनाची दिशा पुण्यातील , विशेषतः पिंपळे सौदागरमधील सततच्या घडामोडींनी गजबजलेल्या जीवनानंतर जळगावला पर...