भाग २
सॅल्युटच्या पलीकडे !
सेक्युर्टी गार्ड सॅल्युट करीत होते...
पण तरी ही पाटील साहेब अस्वस्थ होते...
संध्याकाळी बाळासाहेब कुंजिर
क्रीडा मैदानावरील ट्रॅक वर चालत असतांना सहजच त्यांच्या मनात विचार आला...
शासकीय सेवेची ३५ वर्षे कशी धबडग्यात गेली ते कळलेच नाही. आता निवांतपणा लाभला आहे तर ही अस्वस्थता का? हळू हळू संपूर्ण आयुष्याचा पटच त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहीला. ग्राउंड वरिल हाय-मास्ट दिव्यांच्या प्रकाशात तो आणखीनच स्पष्टपणे दिसू लागला...
महाविद्यालयीन काळात आणि त्यानंतर MPSC व UPSC परीक्षेची तयारी करताना त्यांनी विपुल वाचन
केले. मात्र पुढे शासकीय सेवेत प्रवेश झाल्यावर त्यांचा वेळ शासन निर्णय, प्रकल्प अहवाल, बजेटची व्हाईट-बुक्स, ब्ल्यू-बुक्स आणि वृत्तपत्रांच्या वाचनातच खर्च होऊ लागला. सखोल वाचन करून
त्यावर चिंतन करण्यासाठी त्यांना फारसा वेळ देता आला नाही. ते व्यवस्थेचा भाग बनून त्यात इतके समरस झाले की स्वतःविषयी विचार करण्याची संधीच त्यांना मिळाली नाही.
ते शासकीय अधिकारी म्हणून
नियुक्त झाले तेव्हा गावाकडे त्यांचा मोठा सत्कार झाला होता. कृतज्ञता भावाने
त्यांनी स्वीकारला होता. आपल्याला मिळालेल्या पदाचा आपल्या लोकांच्या कल्याणाकरिता
उपयोग करू असे भाव त्यांच्या मनात निर्माण झाले होते.
पुढे ते मंत्रालयात गेले.
उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून कार्यरत असतांना, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर,
त्यांना सामाजिक आणि राजकीय विण अधिक चांगल्या पद्धतीने समजली. त्यांच्या लाघवी
स्वभावाने आणि मधुर बोलण्याने ते सर्वाना हवे हवेसे वाटायला लागले. मंत्रालयाच्या
लॉबीतून चालतांना, मंद हसून ते सर्वांकडून अभिवादन स्वीकारायचे. यातील
बरेच जण केवळ पदामुळे अभिवादन करीत आहेत हे त्यांना ठाऊक होते, तरीही ते त्यांना हवे हवेसे वाटू लागले होते.
वीस वर्षाहून अधिक काळ ते मंत्रालयात मंत्री आस्थापनेवर कार्यरत होते. 'यशोधन' मधील प्रतिष्ठेचे शासकीय निवासस्थान, तेथून दृष्टीस पडणारे अरबी समुद्र, क्वीन्स नेकलेस, नरीमन पॉइंट, क्रिकेट
क्लब ऑफ इंडिया (CCI) मधील उच्चभ्रूंचा वावर, ओबेरॉय टावर,
ताज इंटरनॅशनल येथे देश-विदेशातील उद्योगपतींसोबत होणाऱ्या पंचतारांकित बैठका....या सर्वांबरोबरच
पाटील साहेबांना लॉबीत मिळणारे अभिवादन आवडायला लागले होते.
सॅल्युटच्या पलीकडे !
पण तरी ही पाटील साहेब अस्वस्थ होते...
शासकीय सेवेची ३५ वर्षे कशी धबडग्यात गेली ते कळलेच नाही. आता निवांतपणा लाभला आहे तर ही अस्वस्थता का? हळू हळू संपूर्ण आयुष्याचा पटच त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहीला. ग्राउंड वरिल हाय-मास्ट दिव्यांच्या प्रकाशात तो आणखीनच स्पष्टपणे दिसू लागला...
तरीही ही
अस्वस्थता का? विचाराच्या तंद्रीत बराच कालावधी उलटून गेला....
पाटील साहेब घरी आले. दुपारचे
जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी ईमेल चेक केले. फेस बूक कडून आलेले नोटिफिकेशन बघितले.
एक पोस्ट त्यांच्या दृष्टीस पडली. ते थांबले. थोडे विचार मग्न झाले. नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे ते परीक्षण होते. खाली हॅश टॅग असल्याने त्यांनी त्या
विषयाशी संबंधीत आणखी पोस्ट वाचल्या. पुस्तका विषयीची त्रिव्र उत्सुकता त्यांच्या मनात निर्माण झाली. अमॅझान लिंकचा उपयोग करून त्यांनी पुस्तक मागवले.
तिसऱ्या दिवासी पुस्तक प्राप्त झाले. त्यांनी ते झपाटल्या सारखे वाचून काढले. यात काही तरी आहे हे जाणवत होते पण नेमके काय ते समजत नव्हते.
दुसऱ्या दिवशी
त्यांनी पुस्तक पुन्हा वाचायला घेतले. आपल्यात बदल घडत आहे याची
त्यांना जाणीव व्ह्यायला लागली. त्यांनी मनन केले. चिंतन केले. पुस्तक वाचून संपले
तेव्हा संध्याकाळ झाली होती. त्यांनी संध्याकाळाचा चहा घेतला. ते घराबाहेर पडले. त्यांनी सेक्युरिटी गार्डसना यापुढे सॅल्युट न करण्याचे सांगितले.
....आता पाटील साहेब अनेकांना स्वतःहून हात जोडून नमस्कार करतात. ज्यांचा सन्मान होतोय त्यांच्या
जवळ जाऊन ते आस्थेने विचारपूस करतात. आपल्या लईत वॉकिंग करतात. सॅल्युटची अपेक्षा
ठेवत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि चालण्यात वेगळाच आत्मविश्वास जाणवतो. त्यांच्या व्यक्तिमत्वास झळाळी प्राप्त झाली आहे.
त्यांच्यातील हे बदल बघून
पत्नी आश्चर्य चकित झाल्या. त्यांनी विचारले, "हे कसे घडले ?" त्यांनी शांतपणे पुस्तक दाखविले. बाईसाहेबांनीही पुस्तक वाचायला सुरवात केली. आता त्यांचे सामाजिक कार्य अधिक
अर्थपूर्ण होत आहे असे त्यांना वाटायला लागले आहे.
पाटील साहेब आणि त्यांच्या पत्नी, बाळासाहेब कुंजिर क्रीडा मैदानावरिल ट्रॅक वर नियमित फिरतांना दिसतात. पाटील साहेब
एका NGO चे प्रमुख
आहेत. गरीब, वंचित विद्यार्थ्यांना शैलक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे
कार्य ही संस्था करते. एका अभ्यास मंडळाची स्थापनाही त्यांनी केली आहे. तेथे
स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, करियर गाईडन्स या संबंधीचे मार्गदर्शन मिळते. येथे सल्युट नाही पण सन्मान आहे, मनःपूर्वक !
शासनाच्या विविध समित्यांमध्ये ते आवश्यकतेनुसार सहभाग नोंदवतात. तीन Multinational कंपन्यांनी त्यांना Non Executive Director म्हणून
बोर्डवर घेतले आहे. महत्वाच्या विषयांवर, ते बोलतात, लिहतात, त्या अनुषंगाने
देश आणि विदेशात प्रवास करतात. नुकतेच त्यांना Bharat-USA Legislator's Engagement for Action and Policy (LEAP) उपक्रमांतर्गत ‘भारतातील राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था’
या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या
व्याख्यानाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
आता सॅल्युट थांबला, पण संस्कार आणि मूल्यांची वृद्धी होत आहे. सन्मानाची अपेक्षा राहिली नाही; ते त्या पलीकडे गेले आहेत.
मनात विचार आला. पुस्तक वाचून बदल घडू शकतो का
? व्यक्ती
स्वतः ठरविते तेव्हाच तिच्यात बदल घडतो. पुस्तक
हे निमित्त, पण त्या अनुषंगाने मनन, चिंतन घडते. काही वेळेस लख्खन
वीज चमकावी असा विचार मनात येतो आणि नंतर आयुष्यच बदलून जाते, असेही घडते. जे
मुळात आत आहे ते बाहेर येते, प्रगट होते, Manifest होते.
आणखी एक विचार मनात आला.
पाटील साहेबांनी मागविलेले पुस्तक 'Value Based Leadership' तर नसेल ना ?
Dr. Mahendra Ingale @
Pune on July 4, 2026
Author of Value‑Based Leadership
Author of Value‑Based Leadership
No comments:
Post a Comment