शासकीय सेवेत सन्मानाने जगणे : एक चिंतन
“A
life of integrity is the most noble legacy one can leave behind.” — Confucius
काल संध्याकाळी जळगाव जनता सहकारी बँकेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात, बँकेच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्यानंतर, स्नेही जनांसोबत अल्पोपहार घेत बसलो होतो. बाजूच्या स्क्रीनवर बँकेच्या दैदीप्यमान प्रगतीचा आलेख दिसत होता. ज्यांना बँकेने मदत केली, त्यांच्या जीवन प्रवासात आणि यशात बँकेचा कसा सहभाग आहे हे ते सांगत होते. बँके विषयी कृतज्ञता व्यक्त करीत होते.
नजर पुन्हा व्यासपीठाकडे गेली. भव्य आणि आकर्षक डिजिटल फ्लेक्स वरिल मजकूर वाचत नजर खाली येत होती. मुख्य
कार्यालय: 'सेवा'.........येथे थांबलो. सेवा आणि त्याच्याशी
संबंधित शब्द मी लहानपणापासून ऐकतो आहे. समाज सेवा हा त्यापैकी एक. 'सेवा सदन' या मलबार हिल
वरिल बंगल्यावर जाण्याचा आणि तेथे राहण्याच्या अनेकदा योग आला. तेथे अनेक समाज सेवक
भेटायचे. आणि अलीकडे नगरसेवक आणि जनसेवक हे शब्द वारंवार कानावर पडत आहेत. चार
दशके मी शासकीय सेवेत होतो. मी शासकीय नोकरी केली की शासकीय सेवा हा ही प्रश्न माझ्या मनात आला. थोडे चिंतन घडले.
२००५
मध्ये मुंबईच्या न्यूझीलंड हॉस्टेल, गोरेगाव येथे झालेल्या राजपत्रित महासंघ अधिवेशनात, नव्याने झालेल्या
माहिती अधिकार व बदलीच्या कायद्याची उपयुक्तता, त्याची अमंलबजावणी, त्यातील पळवाटा
व त्याचा संभाव्य गैरवापर या विषयावर मी माझे मत मांडले.
सहकाऱ्यांशी
चर्चेनंतर, शिक्षक संघटनेत, राजपत्रित अधिकारी संघटनेत
आणि प्रशासनात काम करतांना माझ्या अनुभवावर आधारित “शासकीय सेवेत सन्मानाने जगा!” हे पुस्तक मी लिहायला घेतलं. पण संघटनेच्या कार्यात आणि नंतर प्रशासकिय जबाबदाऱ्यांमध्ये एवढा गुंतून गेलो की ते लिहिणं शक्य झाले नाही. नंतर पुन्हा नव्याने ते
लिहायला सुरवात केली.
या प्रवासात काही मूलभूत
प्रश्नांवर चिंतन घडले:
"लोकाभिमुख शासन म्हणजे काय? लोक कल्याण कशात असते?"
"शासकीय नोकरी आणि शासकिय सेवेत काय फरक आहे?"
"सन्मान म्हणजे नक्की काय? तो कोणी कोणाचा करायचा असतो?"
"जगणं म्हणजे नेमकं काय? जिवंत राहणे आणि जगणे यातील मुलभूत फरक काय?"
संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि लोकभिमुखता केंद्रस्थानी ठेवून
जेव्हा प्रशासन चालते तेव्हा लोक कल्याणाचे दरवाजे उघडले जातात. शासकीय सेवेत
सन्मानाने जगणारे अधिकारी हे समाजाच्या आशा आकांक्षांची पुर्ती करणारी शक्ती असतात. अशा अधिकार्यांच्या
कार्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाला झळाळी प्राप्त होते. एक उच्च दर्जाचे मूल्याधिष्ठित आयुष्य त्यांच्या
वाट्याला येते. इतिहासात त्यांच्या कार्य कर्तृत्वाची नोंद होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी ते दीपस्तंभ ठरतात.
या पुस्तकाच्या माध्यमातून, ज्यांची कार्यशैली मला जवळून बघता आली अशा शासकीय सेवेतील, संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ आणि लोकाभिमुख अधिकार्यांच्या प्रेरणादायी वाटचालीचे दर्शन घडावे, विविध घटना, प्रसंग आणि व्यक्तिमत्त्वांच्या उदाहरणांतून प्रशासनातील पैलू उलगडले जावेत हा ही हेतु होता. या संबंधी सूचना करण्याचे आवाहन केले. त्यानुसार काही सूचना प्राप्त झाल्या.
Smt. Lata Ingale – She exemplified integrity
and dedication in her role as an officer in the Town Planning Department,
consistently upholding rules and regulations with precision and fairness. Her
professional journey reflects an unwavering commitment to public service,
marked by sensitivity and responsibility. Incidentally, she is also my wife,
and it is with profound respect that I acknowledge her contribution—not merely
as a distinguished officer, but as someone who has left behind a personal and
professional legacy of dignity, discipline, and service to society.
डॉ. महेंद्र इंगळे @ जळगाव,
जानेवारी २१, २०२६
#ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats