Sunday, November 9, 2025

मूल्याधिष्ठित भरारी...

 माणसाला पक्ष्यांसारखे उडता येत नाही, पण विमानाच्या सहाय्याने तो पक्ष्यांपेक्षा उंच भरारी घेऊ शकतो. माशासारखे पाण्याखाली राहता येत नाही, पण पाणबुडीच्या सहाय्याने समुद्राच्या तळाशी पोहोचू शकतो. हत्तीपेक्षा बलवान नसतानाही, अंकुशाच्या सहाय्याने त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. वाघासारख्या हिंस्त्र प्राण्याची बंदुकीच्या सहाय्याने शिकार करू शकतो.

हे सर्व मानवाला शक्य झाले आहे—त्याच्या सुसंघटित प्रयत्नांमुळे, विशिष्ट प्रणालींचा कल्पकतेने उपयोग करण्याच्या क्षमतेमुळे, आणि सतत नवकल्पना शोधण्याच्या वृत्तीमुळे.

अठराव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. मास प्रॉडक्शन, टाइम स्टडी आणि कार्यक्षमतेवर आधारित व्यवस्थापन पद्धतींनी उत्पादन प्रक्रियेत क्रांती घडवली. शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी या परिवर्तनात मोलाचा वाटा उचलला.

याच काळात Organisational Behaviour आणि Organisational Development या संकल्पना उदयास आल्या. संस्था ही केवळ एक रचना नसून ती एक सजीव घटकासारखी वागते—Organisation behaves like an entity. म्हणूनच तिचा अभ्यास करता येतो, आणि योग्य नियोजनाद्वारे तिचा विकासही साधता येतो.

संस्थेच्या कार्यक्षमतेसाठी चार मूलभूत पैलू ओळखले गेले:

•  Planning – उद्दिष्टांची स्पष्टता व ते साधण्या करिता नियोजन  

•  Coordinating – विविध घटकांमध्ये समन्वय 

•  Directing – सहकऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन

•  Controlling – नियोजनानुसार कार्य सुरू राहावे या करिता अधिकाराचा वापर

या सर्व प्रक्रियांना प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी Influence हे एक महत्त्वाचे माध्यम ठरते—ते केवळ अधिकारातून नव्हे, तर विश्वास, संवाद आणि नैतिकतेतून निर्माण होते.

याचबरोबर System Approach ही संकल्पना उदयास आली. उत्पादन प्रक्रियेत Input (कच्चा माल), Process (प्रक्रिया), आणि Output (उत्पादित घटक), व ठरविल्यानुसार आऊटपूट मिळवा या करिता प्रक्रिये दरम्यान आवश्यक बदल सुचविण्याकरिता Feedback यंत्रणा या पद्धतीने ही संकल्पना राबविण्यात येते. आता, System Approach केवळ उत्पादनापुरती मर्यादित न राहता शिक्षण, आरोग्य, प्रशासन, आणि नेतृत्व अशा विविध क्षेत्रात परिमाणकारकरित्या  वापरली जाते. 

केवळ भौतिक साधनांची निर्मिती करून सुखसुविधा निर्माण करणारे नव्हे, तर मानवी जीवन अधिक अर्थपूर्ण, समाधानी आणि मूल्याधिष्ठित बनवण्याचा विचार करणारे नेतृत्व असायला हवे . सुखसुविधा पुरवणे ही एक पायरी आहे, पण मानवजातीच्या कल्याणासाठी विचार करणे हे अंतिम ध्येय असायला हवे.

नेता हा संस्थेचा महत्वाचा घटक, जो संस्थेला दिशा, प्रेरणा आणि मूल्य देतो आणि मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणण्यास मदत करतो .

हेच नेत्यांचं कार्य आहे. अशा नेतृत्वाची गरज आहे, जे केवळ कार्यक्षमतेवर नव्हे, तर मूल्यांवर आधारित असेल.

डॉ. महेंद्र इंगळे @ पुणे, नोव्हेंबर ९, २०२५

No comments:

Post a Comment

Leadership – Privilege or Burden?

  Leadership – Privilege or Burden? Leadership is often seen as a privilege, but in truth it is a burden carried with responsibility. Thos...