Sunday, January 4, 2026

Self-Actualisation ची झुळूक !

 Self-Actualisation ची झुळूक !

Maslow ने गरजांची आवश्यकता (Hierarchy of Needs) पिरॅमिडच्या सहाय्याने मांडणी करून सांगितली. अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या शारीरिक गरजा (Physiological Needs) ही सर्वात प्राथमिक गरज समजली जाते. या गरजेची पूर्ती झाल्यानंतर पुढची सुरक्षिततेची (Safety and Security) गरज निर्माण होते. तिची पूर्ती झाल्यानंतर प्रेमभावना आणि आपुलकीची (Love and Belongingness) गरज निर्माण होते. त्यानंतर ओळख (Recognition) व मानसन्मान (Esteem) आणि सर्वात वर आत्मसिद्धी (Self-Actualisation) अशी गरजांच्या आवश्यकतेची शिडी सांगितली आहे.

Self-Actualisation स्थितीत, व्यक्ति आध्यात्मिक वाटेवर चालायला सुरुवात करतो. तो सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन परमेश्वरी कृपेच्या सानिध्यात राहून आनंदाने जीवन व्यतीत करू इच्छितो. निसर्ग आणि प्राणीमात्रांवर प्रेम करतो. एकटा राहण्याचा आनंद घेतो. अशी या अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीची काही लक्षणे Maslow ने सांगितली आहेत.

मी सहज म्हणून विचार केला... आपण कुठे आहोत?

मी लिहितो, आणि तुम्ही ‘थंब’ करता. मला आनंद होतो. याचा अर्थ मी Recognition किंवा Esteem येथपर्यंत पोहोचलो आहे. या गरजेची पूर्ती झाल्यानंतरच Self-Actualisation कडे जाता येईल का, असा विचार माझ्या मनात येतो.

Maslow ने,  गरजांची पूर्ती ही एका शिडीप्रमाणे क्रमशः होते असे सांगितले होते. पण नंतर त्याने हेही मान्य केले की काही व्यक्ती काही गरजांची अपूर्णता असूनही Self-Actualisation चा अनुभव घेतात. म्हणजेच:

• Recognition किंवा Esteem पूर्ण न झाल्याशिवाय Self-Actualisation शक्य नाही — हा एक सामान्य नियम असू शकतो, पण काही अपवाद असतात.

काही व्यक्तींच्या अंतःप्रेरणा इतक्या प्रबळ असतात की त्या बाह्य मान्यतेच्या प्रतीक्षेत न राहता स्वतःच्या मूल्यांशी एकरूप होतात.

लक्षदिप अपार्टमेंट मधील मांजरी माझ्या पायाशी घोटाळतात किंवा दुपारच्या वेळेस मी त्यांना बाकांजवळ डोळे मिटून शांतपणे बसलेले पाहतो, तेव्हा, मला त्यांच्यामध्ये Self-Actualisation ची बरेचशी लक्षणे दिसतात. त्या करिता त्या काही विशेष प्रयत्न करतात का, याचे निरीक्षण मी करतो. तेव्हा प्रयत्नविरहित अस्तित्व या स्थितीत, या मांजरी निसर्गाशी सुसंवाद साधत एकटेपणाचा आनंद घेत आहेत असे मला वाटते!

मी लिहितोआणि तुम्ही ‘थंब’ करता — तेव्हा मला जो आनंद होतो तो केवळ Recognition आणि Esteem चाच नाहीतर तो स्वतःच्या सर्जनशीलतेचा उत्सव देखील असू शकतो. 

म्हणजेच Esteem च्या पायरीवर असताना, Self-Actualisation ची झुळूकही अनुभवता येवू शकते. 


डॉ. महेंद्र इंगळे @ जळगाव, जानेवारी  ४, २०२६ 

#ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats

 

No comments:

Post a Comment

Cinematic Adventure, Reimagined !

  Cinematic Adventure, Reimagined ! Long ago, I had a brief encounter with Hindi cinema — a moment I fondly described in my book as a “Ci...