Sunday, February 8, 2026

२५९ वी मैफल : प्रवास अभियांत्रिकी स्पंदनांचा !

 २५९ वी मैफल : प्रवास अभियांत्रिकी स्पंदनांचा !

गेल्या अनेक दिवसांपासून ‘Hobby Dooby Do’ या मंचावर संवाद साधण्याची इच्छा आमचे मित्र, प्रसिद्ध उद्योजक आणि मल्हार कम्युनिकेशनच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेले प्रा. सुंदरलाल मल्हारा यांचे सुपुत्र — सतत नवकल्पना शोधणारे, साधी राहणी ठेवूनही ठळकपणे उठून दिसणारे, पारदर्शी आणि मावळ स्वभावाचे आनंद मल्हारा व्यक्त करत होते.

डान्स मास्टर तनय मल्हारा आणि अभिनेत्री तन्वी मल्हारा यांचे वडील म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!

मुलाखत घेणारे माझे मित्र प्रा. राजेंद्र देशमुख — प्राध्यापक आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे माजी संचालक — हे साहित्य, संस्कृती आणि पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत आहेत. त्यांच्या मुलाखत घेण्याच्या पद्धतीमुळे आणि शब्दप्रयोगांच्या कलात्मकतेमुळे हा कार्यक्रम दर्जेदार झाला, असे म्हणण्याचा मोह मी टाळू शकत नाही. त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार!

मल्हार कम्युनिकेशन आणि Hobby Dooby Do च्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार!

अनेकांनी ही मुलाखत बघीतली. त्यांना ती आवडली. त्यांनी त्या बद्दल लिहले. त्या सर्वांचे आभार.

‘आदरणीय इंगळे सर,

आपले व्यक्तिमत्व हे अत्यंत प्रेरणादायी असे आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर मध्ये असताना काम करण्याची संधी मिळाली. कोणतीही जबाबदारी सहजरित्या आणि हसत खेळत कशी पार पाडावी याचा अनुभव  तेव्हा आला. 

आजही अचानक मधून मधून आपला फोन मला येतो आपण आस्थेने आपुलकीने विचारपूस करून आवश्यक तेथे मार्गदर्शन करतात. खूप आनंद वाटतो. आपल्याकडून नावीन्यपूर्ण साहित्याची निर्मिती अशीच होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

प्रा. ज्ञानेश्वर आहिरराव, ८/२/२०२६

विभाग प्रमुख, अणु विद्युत अभियांत्रिकी 

शासकीय तंत्र निकेतन, आहिल्या नगर’

‘सर, 

अतिशय सुंदर मुलाखत आपण दिलेली आहे. ज्याप्रमाणे तुम्ही शिक्षण घेत असताना हसत-खेळत, शिकलात कवी बनलात अध्यापक बनतात, पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी आपले योगदान हसत खेळत दिले, त्याच प्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही वावरलात. 

इतकेच नाही तर तुम्ही आमच्यामध्ये जेव्हा मिसळायचे तेव्हा देखील तुमचे जीवनात जगण्यातले भाव कवी सारखे व आनंदमय आणि हसत खेळत असायचे. संस्थेचा शैक्षणिक दर्जा देखील तुम्ही हसत खेळत सांभाळला. 

तुमचे अनमोल सहकार्य लाभले. आजही तुमच्या आठवणीतून या सगळ्या गोष्टी येत असतात. तुम्ही केलेल्या कार्यातून आनंदमय जीवनाचे रहस्य सदैव लोकांसाठी एक आदर्श असेल. 

तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा  !

कैलास माळी, ८ फेब्रुवारी २०२६

माजी प्रबंधक, शासकीय तंत्र निकेतन, धुळे’

आपण सुद्धा ही मुलाखत पाहावी, आपल्याला ती नक्की आवडेल. आणि जसे सर्वजण म्हणतात तसेच, ‘आपण like, share आणि subscribe करावे ही विनंती.’

https://youtu.be/C67bdzTXHCw?si=Gw8QhTCeQZc3EBoX

Dr. Mahendra Ingale @ Pune, Feb 8, 2026

#ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats



No comments:

Post a Comment

Cinematic Adventure, Reimagined !

  Cinematic Adventure, Reimagined ! Long ago, I had a brief encounter with Hindi cinema — a moment I fondly described in my book as a “Ci...