चांगुलपणाचा प्रवाह!
तो सुरुवातीला थोडासा चांगला होता…
त्याने चांगुलपणावर विश्वास ठेवला…
तो सतत चांगल्या माणसांचा शोधात राहिला,
त्यांच्या सहवासात राहिला,
त्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला.
त्यांच्यातील चांगुलपणा हळूहळू त्याच्यात उतरला…
तोही चांगला झाला…
अधिक चांगला झाला…
त्याच्यातील चांगुलपणामुळे,
चांगुलपणा पसरण्याची शक्यता निर्माण झाली.
चांगुलपणाचा प्रवाह त्याला सतत पुढे नेत राहिला…
आणि तो स्वतःच चांगुलपणाचा स्रोत बनला.
त्याच्या सहवासात इतरही बदलले, उजळले, उन्नत झाले,
हे पाहून चांगुलपणा वरचा त्याचा विश्वास आणखी दृढ झाला.
Dr. Mahendra Ingale @ Pune on August 29, 2026
Author of Value‑Based Leadership
#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #ValueBasedADRAndCounsellingServices
No comments:
Post a Comment