शांततेची आस!
तो आधी सॉफ्टवेअर इंजिनिअर होता—
तेव्हा त्याच्या हास्यात निरागसता होती...
खळखळून हसणारा,
लहानसहान गोष्टी सोशल मीडियावर शेअर करणारा,
आणि सहकाऱ्यांच्या प्रोत्साहनात आनंद शोधणारा तो नंतर सीनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला.
जबाबदाऱ्या वाढल्या, पण उत्साह अजूनही होता.
पुढे तो प्रोजेक्ट मॅनेजर झाला.
आता त्याला फक्त कोड नव्हे तर माणसं, वेळा, आणि टार्गेट्सही सांभाळावे लागतात....मॅनेज करावी लागतात.
मॅनेजर झाल्यावर त्याच्या आयुष्याची लय बदलली.
रात्रंदिवस काम, बैलेंस शीट्स, नवे टार्गेट्स, नवे प्रोजेक्ट्स, नवे क्लायंट्स
यात तो हरवून गेला.
सोशल मीडियावर त्याची उपस्थिती विरळ झाली.
तेथे तो क्वचितच दिसतो.
शुक्रवार संध्याकाळची तो उत्सुकतेने वाट बघतो.
शनिवार-रविवार त्याला हवी असते शांती,
ती मिळवण्यासाठी तो जातो रेस्टॉरंट्स आणि रिसॉर्ट्समधे.
गोंगाटाच्या जगात, शांतते बरोबरच, स्वतःला ही शोधण्याचा तो प्रयत्न करतो!
Dr. Mahendra Ingale @ Pune on August 31, 2026
Author of Value‑Based Leadership
#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #ValueBasedADRAndCounsellingServices
No comments:
Post a Comment