Tuesday, November 24, 2026

लक्ष दीप पॅलेस मधील राणी साहेब !

 लक्ष दीप पॅलेस मधील राणी साहेब !

मी राजा नसलो तरी,
त्या राणीसाहेब आहेत.
 
राणीसाहेबांचे सारेच गुण
त्यांच्या स्वभावात सहज नांदतात.
 
एक विलक्षण रुबाब त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे.
त्यांच्या चालण्यात डौल आहे,
बोलण्यात वजन आहे,
वागण्यात संयत माधुर्य आहे,
हसण्यात प्रसन्न तेज आहे,
आणि नजरेत अनामिक दरारा आहे.
 
त्या बोलू लागल्या की,
सभागृह क्षणभर शांत होते;
त्यांचा प्रत्येक शब्द
लक्षपूर्वक ऐकला जातो.
 
राजवाड्यात राहण्याचे योग
त्यांच्या नशिबात असावेत,
म्हणून ‘लक्षदीप पॅलेस’चे वैभव त्यांना प्राप्त झाले!
 
राजमुकुट नसला तरी,
राजेशाहीचे तेज त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती
अविरत झळकत असते!
 
आम्ही सामान्य प्रजेतील असलो,
तरी आमच्या घरात,
आजही राणीसाहेबांचेच राज्य आहे!

महेंद्र इंगळे @ जळगाव, नोव्हेंबर २५, २०२६

No comments:

Post a Comment

आसावांचा साठा !

आसावांचा साठा ! मला बघून गाली का वृथाच तू हसली  हृदयात माझ्या का प्रेम ज्योत तेवविली ? करावयाचे होते शत शकलं हृदयाचे  मग कशास रडते आता पाहून...