Friday, February 13, 2026

मनःपूर्वक आभार!

 मनःपूर्वक आभार!

प्राचार्य डॉ. मधुकर सलगरे यांनी माझ्या Engineering Heart Beats या पुस्तकाचे परीक्षण केले. संपादकीय कार्य, सामाजिक उपक्रम, ग्रंथलेखन आणि संशोधन यांसारख्या अनेक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी आपल्या अमूल्य वेळेतून हे परीक्षण अत्यंत बारकाईने आणि सविस्तरपणे केले. त्यांचे परीक्षण साप्ताहिक ठोकशाही या वृत्तपत्रात प्रसिद्ध होत आहे, याबद्दल मी प्राचार्य डॉ. सलगरे आणि ठोकशाही परिवाराचे मनःपूर्वक आभार मानतो.

डॉ. सलगरे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. तरीही माझ्यावरील आपुलकीमुळे त्यांनी माझ्याकरिता काही स्तुतिपर शब्द वापरले असावेत का, असा विचार माझ्या मनात तरळून गेला. पण तसे असले तरी हे परीक्षण माझ्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे. अशा प्रोत्साहनामुळेच मी सतत लिहीत आहे, आणि Value-Based Leadership या पुस्तकाचा जन्मही या प्रेरणेच्या प्रवाहातूनच झाला आहे.

पुन्हा एकदा, प्राचार्य डॉ. सलगरे आणि ठोकशाही यांचे मनःपूर्वक आभार! त्यांचे हे  परीक्षण सोशल मिडिया वर आल्याने अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. अशीच एक - माझे मित्र दिलीप जोशी यांनी दिलेली प्रतिक्रिया येथे देण्याचा मोह मला आवारात नाही. ते एक अभियंता आणि उत्तम लेखक आहेत.

‘उत्तम परीक्षण !

एका उच्च तोलामोलच्या विद्याविभूषित प्राचार्य महोदयांनी केलेली ही समीक्षा निश्चित सखोल, लेखनाची पारख करणारी आणि अभ्यासपूर्ण आहे.. विद्यार्थ्यांना प्रेरक अशीच आहे. त्यांना हे पुस्तक वाचण्याची प्रेरणा यातून निश्चित मिळेल..

अभिनंदन !’

दिलीप जोशी, नासिक

डॉ. महेंद्र इंगळे @ पुणे, फेब्रु १३, २०२६

#valueBasedLeadership #EngineeringHeartBeats

No comments:

Post a Comment

लोकशाहीचा नवा राजा: काकराज !

लोकशाहीचा नवा राजा: काकराज! एके दिवशी , घराच्या खिडकीवर बसलेल्या कावळ्याने , घरातील लोकांची आपल्या मुलाला उच्च शिक्षणाकरिता परदेशात पाठविण्य...