Wednesday, February 18, 2026

हर हर महादेव! शिवजयंतीचा जयघोष!

 हर हर महादेव! शिवजयंतीचा जयघोष!

शिव जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आजचा दिवस म्हणजे पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा उत्सव!

छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेले धैर्य, दूरदृष्टी आणि जनतेप्रती असलेली त्यांची  बांधिलकी आजही आपल्याला मार्गदर्शन करते.

त्यांच्या जीवनातून आपण शिकतो—

·      जगावे ते कशासाठी आणि मरावे ते कशासाठी याचे भान

·      स्त्रियांविषयीचा मातृभावयुक्त आदर

·      अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य

·      लोककल्याणासाठी नेतृत्व करण्याची जबाबदारी

·      संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान जपण्याची प्रेरणा

महाराज हे मूल्याधिष्ठित जीवन जगून स्वतःच्या आचारणातून धडे घालून देणारे अद्वितीय राजा होते.

स्वतःच्या जीवना पेक्षा स्वराज्याचे उद्दिष्ट अधिक मौल्यवान मानणारे अनुयायी निर्माण करणारे, सत्तेसाठी नव्हे, तर सेवेकरिता राज्य उभारणारे ते राजे होते.

समोर बलाढ्य शत्रू असताना थेट युद्ध शक्य नाही हे जाणून त्यांनी गनिमी काव्याची युद्धनीती अवलंबली आणि विजय मिळवला. प्रसंगी दोन पावले मागे जाऊन तह करणारे राजकीय धुरंधर, आणि योग्य वेळ आल्यावर गमावलेले किल्ले पुन्हा ताब्यात घेणारे दूरदृष्टीसंपन्न राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

त्यांचे जीवन म्हणजे प्रेरणेचा दीपस्तंभ! स्वराज्य, स्वाभिमान आणि जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे राजे, ज्यांनी इतिहासात अमिट ठसा उमटवला असे राजे!

हर हर महादेव!

तेजस्वी सूर्य, आकाशाखाली

पराक्रमी राजा उभा राहिला!

 

सिंहासनासाठी, वैभवासाठी नव्हे

तर जनतेसाठी उभा राहिला!

 

छत्रपती शिवाजी महाराज हे ते नाव

सुवर्णाक्षरांनी कोरले गेले हृदयामध्ये भाव!

 

रामायण–महाभारतातील ऐकत कथा

राजमातेच्या सहवासात राजा घडत होता!

 

हर हर महादेव! रणघोष घुमले  

सैनिकांच्या डोळ्यांत तेज चमकले!

 

तानाजी, मुरारबाजी पराक्रमी वीर

बाजी प्रभू तलवारींसह रणधीर!

 

प्रतापगडावरिल शत्रू मदमस्त

अफजल तेथेच झाला ध्वस्त !

 

रणनीती, पराक्रम, अद्वितीय तेज

राजाचे शौर्य अतुलनीय, विशेष!

 

स्त्रियांचा सन्मान केला  

राजा चरित्राने उजळला!

 

जीवनातील प्रत्येक क्षण

राजाच्या प्रेरणादायी ठरला!

 

हर हर महादेव! जयघोष घुमतो

राजाचा पराक्रम सदैव झळकतो!

 

महेंद्र इंगळे, पुणे, फेब्रुवारी १९, २०२६

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Shantaram: A Personal Revisit

  S hantaram : A Personal Revisit While rearranging the books in my bookcases at Jalgaon, my hands lingered on Shantaram —Gregory David Ro...