Sunday, June 28, 2026

स्नेहसरींचे अविस्मरणीय क्षण !

 स्नेहसरींचे अविस्मरणीय क्षण !

महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी‑कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा सदाशिव पेठेतील उद्यान कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान मा. श्री. चंद्रकांत दळवी यांनी भूषविले, तर प्रमुख उपस्थितीत श्री. शेखर गायकवाड, श्री. उमाकांत दांगट आणि श्री. व्यंकटेश गायकवाड होते.

सभेत निवृत्त अधिकारी‑कर्मचारी यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे विषय चर्चिले गेले. महाराष्ट्र शासनाने निवृत्तांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा, महागाई निर्देशांक लक्षात घेऊन आठव्या वेतन आयोगात निवृत्तांसाठी तरतूद व्हावी, तसेच संघटनेच्या वाढीत सदस्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा—अशा ठरावांवर सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यामुळे निवृत्तीवेतन वेळेवर मिळेल, महागाई निर्देशांकानुसार त्यात वाढ होईल आणि उद्भवणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सभेतील विशेष आकर्षण ठरले ते यशदाचे अतिरिक्त महासंचालक श्री. शेखर गायकवाड यांचे रंजक भाषण. शासकीय अधिकारी म्हणून आलेले अनुभव त्यांनी नर्म विनोदी शैलीत मांडले आणि उपस्थितांना आनंदित केले.

इंजि. मनोहर पोकळे, श्री. रवींद्र धोंगडे, श्री. प्रवीण शेटे, श्री. नामदेव मोहिते आणि इंजि. साहेबराव पाटील यांच्यासह अनेक सहकारी व स्नेहीजनांची आनंददायी भेट घडली. या सहवासाने सभेचे वातावरण अधिक स्नेहपूर्ण झाले.

सहकाऱ्यांच्या भेटीचा आनंद आणि पावसाच्या सरींचा स्पर्श यामुळे वातावरण हर्षोल्हासाने भरून गेले, ते क्षण अविस्मरणीय बनवून गेले!

Dr. Mahendra Ingale @  Pune on June 28, 2026
Author of
Value‑Based Leadership

#ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने


No comments:

Post a Comment

पेंशनचा सॅल्यूट !

  पेंशनचा सॅल्यूट ! ३५ वर्षीच्या प्रदीर्घ सेवे नंतर पाटील साहेब निवृत्त झाले. सेवपूर्तीचा मोठा कार्यक्रम झाला. कार्यक्रम आटोपून साहेब रात्...