Tuesday, August 4, 2026

भाव विश्वातील जग !

 भाव विश्वातील जग !

 हे शहर चांगले होते,

आताही आहे,

पूर्वी जास्त चांगले होते.


येथे चांगली माणसे राहत होती,

आताही राहतात,

काही जाऊन, काही येऊन राहतात.


पूर्वी मोजकेच विषय असायचे चर्चेला,

आताही असतात,

पण आता ते पूर्वीपेक्षा खूप जास्त असतात.

 

हे शहर आता शहर राहिले नाही,

ते छोटे जग झाले आहे.

 

गाव-पाड्यांतून आलेले लोक शहरी झाले,

आणि शहरी लोक जागतिक झाले.

 

जागतिक सोयी सुविधा नसल्या आल्या वाट्याला,

तरी काही भावविश्वाने जागतिक झाले,

काही आचार विचाराने जागतिक झाले.

 

आता येथील लोक गाव-गाड्यांविषयी बोलत नाहीत,

शहराविषयीही बोलत नाहीत,

ते बोलतात जगाविषयी.

 

जगाच्या समस्यांत गुंतून,

त्यांना आपल्या समस्यांचा विसर पडतो,

त्या विसरातच त्यांना शांतीचा क्षण सापडतो.

 

Dr. Mahendra Ingale @  Pune on August 4, 2026
Author of 
Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls

No comments:

Post a Comment

KISNA

स्वर्ण नगरी म्हणून जळगांवची ओळख आहे. स्वर्ण तीर्थ म्हणूनही आहे. जळगावच्या या ओळखीला आता आणखी एक तेजस्वी अध्याय मिळाला आहे.  KISNA या ढोलकिया...