इन्साफच्या डगरीवरून चालताना…
‘इन्साफ की डगरपे, बच्चों दिखाओ चलके…’
हे
गीत गात, बालकांच्या हृदयात
देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणारे,
ते
शिक्षक पूलंचे ध्येयवेडे चितळे मास्तर तर नसतील?
‘ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कलके…’
कानात
प्राण आणून ऐकणारा, पहिल्या ओळीतील बालक,
ज्यांचे
कदम कधी डगमगले नाहीत—ते लाल बहादूर शास्त्री तर नव्हते?
‘अपने हो या पराये, सबके लिये हो न्याय…’
या तत्वाचा उच्चार करणारा, त्यांच्या शेजारी बसलेला बालक,
खडतर
रस्त्यांवरून चाललेले रामशास्त्री प्रभुणे तर नसतील?
‘तन मन की भेट देकर, भारत की लाज रखना…’
हे शब्द हृदयपटलावर उमटले असल्याने, पॅटन रणगाड्यांना उध्वस्त करून,
मृत्यूला मिठी मारणारे अब्दुल हमीद तर नसतील?
‘जीवन नया मिलेगा, अंतिम चितामें जलके…’
या
शब्दांतून स्फूर्ति घेऊन, देहभान
विसरून गाणारा तो बालक,
त्याच
आवेशात फाशीच्या दोराला आलिंगन देणारे भगतसिंह तर नव्हते?
Dr. Mahendra Ingale @ Pune on Sept 20, 2026
Author of Value‑Based Leadership
#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #HorizonBeyondCertainty #ValueBasedADRandCounsellingServices #Leadership
No comments:
Post a Comment