Friday, October 9, 2026

उत्तेजनाचाचा प्रवाह...

 उत्तेजनाचाचा प्रवाह...

पूर्वी वर्गात अनेक विद्यार्थी तासाला झोपताना दिसायचे.

आता ते झोपताना दिसत नाहीत,

शाळेतही आणि घरीही...

त्यांच्या जीवनात निर्माण झाला आहे 

सतत उत्तेजनाचा, Stimulus चा प्रवाह...

 

WhatsApp मुळे ते अखंड जोडले गेले आहेत

स्नेहीजन आणि मित्रपरिवाराशी......

सतत जागृत असतात मेंदूतील केंद्रे,

एखादा संदेश, फोटो किंवा रील कधीही येऊ शकते,

ते ग्रहण करण्यासाठी .....

 

दुसरीकडे YouTube, Instagram चे विशाल आभासी, Virtual जग...

जगाच्या काना कोपऱ्यातील घटना, 

मनोरंजन, खेळ, किंवा चर्चा अनुभवण्या करिताही

उत्सुक असतात ही केंद्रे !

 

मेंदूला शांतता, रिकामेपणा किंवा कंटाळा 

अनुभवण्याची संधीच मिळू देत नाही

हा उत्तेजनाचा प्रवाह !

 

झोप कंटाळ्याचा परिणाम होता; जागेपणा उत्तेजनाचा असावा.

शरीर थकते, पण मन जागेच असते.

आधुनिक शिक्षण व्यवस्थेसमोर हे ही एक आव्हान आहे का ?


Dr. Mahendra Ingale @  Jalgaon on Oct 9, 2026
Author of Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #HorizonBeyondCertainty #ValueBasedADRandCounsellingServices #Leadership

 

No comments:

Post a Comment

उत्तेजनाचाचा प्रवाह...

  उत्तेजनाचाचा प्रवाह... पूर्वी वर्गात अनेक विद्यार्थी तासाला झोपताना दिसायचे. आता ते झोपताना दिसत नाहीत, शाळेतही आणि घरीही... त्या...