Tuesday, October 13, 2026

पुरस्कारांचे चक्र!

 पुरस्कारांचे चक्र !

माणसे मोठी होतात, आपल्या कर्तृत्वाने, कष्टांनी मोठी होतात. त्यांचा सन्मान होतो, त्यांना पुरस्कार मिळतो— पुरस्कार हे सन्मानाचे प्रतीक!

त्यांनाही पुरस्कार मिळाला… ते आनंदित झाले, त्यांचा उत्साह वाढला.

अल्पावधीत त्यांना दुसरा खुणावू लागला… पहिल्याचे महत्त्व कमी झाले. मेहनत, कष्ट, धावपळ सुरू झाली त्या दुसऱ्यासाठी...

पुन्हा तिसरा… आणि हे असे सुरूच राहिले.

आता जे करायचे ते फक्त पुरस्कारा करिता. प्रचंड काम, प्रचंड धावपळ— लक्ष फक्त पुरस्कार!

ते पुरस्कारांनी रोमांचित झाले,
पुरस्कारांत हरवले,
आणि पुरस्कारपुरतेच उरले.
‘पुरस्कारप्राप्ते’ हीच आता त्यांची ओळख !

Dr. Mahendra Ingale @  Jalgaon on Oct 13, 2026

Author of Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #HorizonBeyondCertainty #ValueBasedADRandCounsellingServices #Leadership


No comments:

Post a Comment

पुरस्कारांचे चक्र!

  पुरस्कारांचे चक्र ! माणसे मोठी होतात, आपल्या कर्तृत्वाने, कष्टांनी मोठी होतात. त्यांचा सन्मान होतो, त्यांना पुरस्कार मिळतो— पुरस्कार हे स...