उत्तेजनाचा प्रवाह...
पूर्वी काही विद्यार्थी तासाला झोपताना दिसायचे.
आता तसे दिसत नाहीत,
ते फार थोडा वेळ झोपतात,
शाळेत आणि घरीही...
त्यांच्या जीवनात निर्माण झाला आहे
सतत उत्तेजनाचा, Stimulus चा प्रवाह...
WhatsApp मुळे अखंड जोडले गेले आहेत ते,
स्नेहीजन आणि मित्रपरिवाराशी......
सतत जागृत असतात मेंदूतील केंद्रे त्यांच्या,
एखादा संदेश, फोटो किंवा रील कधीही येऊ शकते,
ते ग्रहण करण्यासाठी .....
दुसरीकडे YouTube, Instagram चे
विशाल, आभासी, Virtual जग...
जगाच्या काना कोपऱ्यातील घटना,
मनोरंजन, खेळ, किंवा चर्चा अनुभवण्या करिताही
उत्सुक असतात ही केंद्रे !
मेंदूला शांतता, रिकामेपणा किंवा कंटाळा
अनुभवण्याची संधीच मिळू देत नाही
हा उत्तेजनाचा प्रवाह !
स्क्रीन अवर कमी करा म्हणून शाळा सांगतात,
काही झीरो स्क्रीनचा आग्रह धरतात.
झोप कंटाळ्याचा परिणाम होता;
जागेपणा उत्तेजनाचा असावा.
शरीर थकते, पण मन जागेच असते.
शिक्षण व्यवस्थेसमोर हे ही एक आव्हान आहे का ?
Dr. Mahendra Ingale @ Jalgaon on Oct 22, 2026
Author of Value‑Based Leadership
#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #HorizonBeyondCertainty #ValueBasedADRandCounsellingServices #Leadership
No comments:
Post a Comment