Author of Value-Based Leadership !
गेल्या वर्षी, दीर्घकाळ
विचाराधीन असलेल्या विषयावर, मी पुस्तक
लिहायला सुरुवात केली—“शासकीय सेवेत सन्मानाने जगा!” परंतु
लिहिताना जाणवले की हा विषय केवळ शासकीय सेवेपुरता मर्यादित ठेवणे योग्य नाही.
स्थळ‑काळाच्या चौकटीतही तो अडकू नये. म्हणून पुस्तक लेखन थांबवले. परंतु विविध
विषयांवर ब्लॉग लिहणे सुरू होते. प्रामुख्याने इंग्रजीत.
तंत्रज्ञानातील
झपाट्याने होणारी प्रगती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील संशोधन, आणि
त्याचा सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रावर होणारा परिणाम
यामुळे मानवी जीवनात व्यक्ती म्हणून आणि समुदाय म्हणून होत असलेले बदल मला
प्रकर्षाने जाणवत होते. मानवी जीवन अधिक सुखकर व्हावे याकरिता तंत्रज्ञानाचा उपयोग,
जीवनाच्या मूळ प्रेरणा आणि काळानुरुप त्यात होणारे बदल, शाश्वत मूल्ये आणि त्यांचे संवर्धन यावर लिहिण्याची प्रेरणा झाली.
त्यातून Value‑Based Leadership हे पुस्तक साकारले.
या पुस्तकात “Living with Dignity in Government Service” हे एक प्रकरण समाविष्ट केले. यात ज्या प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांविषयी लिहले आहे, त्यांच्या
कार्याचा गौरव होत आहे हे बघून समाधान वाटते.
अनेक मान्यवरांनी
पुस्तकाचे परीक्षण केले; काही वृत्तपत्रांत प्रकाशित झाले, तर काही सोशल मीडियावर प्रसारित झाले. पुस्तकातील अनेक
प्रकरणे सोशल मीडियावर उपलब्ध असल्याने वाचकांनी त्यांचे प्रिंट‑आउट्स काढले आणि
आपल्या उद्योग‑व्यवसायात मार्गदर्शन म्हणून उपयोग केला.
आम्ही हे पुस्तक प्रमुख
भाषांमध्ये भाषांतरित करतो, ऑडिओ‑बुकच्या स्वरूपात आणतो, तसेच काही
प्रकरणांवर आधारित चित्रपट निर्मिती होऊ शकते असे प्रस्ताव आले. पण सुरवतीपासूनच, या पुस्तका करिता Organic Digital Marketing with Passive Mode ही Strategy अवलंबली असल्याने ते अद्याप स्वीकारलेले नाहीत.
दिवसाआड कोणी ना
कोणी या पुस्तकाविषयी माझ्याशी संवाद साधत असतो. त्यामुळे “Author of Value‑Based Leadership” ही ओळख धारण करणे मला आवडायला लागले आहे !
वाचक म्हणून आपल्याशी केलेला असा सुसंवाद माझ्याकरिता आनंददायी
ठरतो.
Dr. Mahendra
Ingale @ Jalgaon on June 19, 2026
Author of “Value-Based Leadership” mvingale2405@gmail.com
#EngineeringHeartBeats
#ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls