Monday, November 3, 2025

कवडशांच्या सोबतीने प्रवास

चालत असताना काही कवडसे दिसले…

निश्चित सांगता येणार नाही, पण बहुधा ते सत्याचे असावेत.

त्या उजेडाच्या उगमाचा शोध घ्यावा का, असा विचार मनात आला.

रस्त्यात Nietzsche भेटला. तो म्हणाला—

"सत्य दाहक असते.

त्याच्या प्रकाशाने डोळे दिपतात.

लोकांना सत्य सांगितलेले आवडत नाही.

जगात राहायचे असेल, तर त्यांच्या स्वप्नांसोबत राहा.

जग सोडून जाणाऱ्याला मात्र ते सांगायला हरकत नाही."

मी थोडा थांबलो…

कवडसे अजूनही दिसत आहेत.

त्या प्रकाशात समोरचा रस्ता स्पष्ट दिसतो आहे.

रस्ता दिसतोय…चालले पाहिजे...

कवडशांचा एवढा प्रकाश पुरेसा आहे.

स्वप्नांसोबत राहूनही, कवडशांच्या सोबतीने चालता येते.

पुढे, सत्याचा प्रकाश दाहक असला,

तरी स्वप्नांची सावली त्याला सुसह्य बनवू शकते,

म्हणून चालले पाहिजे…

आजचे स्वप्न उद्याचे सत्य असू शकते,

म्हणून चालले पाहिजे…

— महेंद्र इंगळे

पुणे, नोव्हेंबर ३, २०२५

No comments:

Post a Comment

पुरस्काराचा प्रवास

पुरस्काराचा प्रवास माणसे मोठी होतात, आपल्या कर्तृत्वाने, कष्टांनी मोठी होतात. त्यांचा सन्मान होतो, त्यांना पुरस्कार मिळतो— पुरस्कार हे सन्म...