पुरस्कारांचा प्रवास !
माणसे मोठी होतात, आपल्या कर्तृत्वाने, कष्टांनी मोठी होतात. त्यांचा सन्मान होतो, त्यांना पुरस्कार मिळतो— पुरस्कार हे सन्मानाचे प्रतीक!
त्यांनाही पुरस्कार मिळाला… ते आनंदित झाले, त्यांचा उत्साह वाढला.
अल्पावधीत त्यांना दुसरा खुणावू लागला… पहिल्याचे महत्त्व कमी झाले. मेहनत, कष्ट, धावपळ सुरू झाली त्या दुसऱ्यासाठी...
पुन्हा तिसरा… आणि हे असे सुरूच राहिले.
आता जे करायचे ते फक्त पुरस्कारा करिता. प्रचंड काम, प्रचंड धावपळ— लक्ष फक्त पुरस्कार!
पुरस्कारांत हरवले,
आणि पुरस्कारपुरतेच उरले.
‘पुरस्कारप्राप्ते’ हीच आता त्यांची ओळख !
Dr. Mahendra Ingale @ Pune on Sept 21, 2026
Author of Value‑Based Leadership
#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #HorizonBeyondCertainty #ValueBasedADRandCounsellingServices #Leadership
No comments:
Post a Comment