Tuesday, December 2, 2025

मूल्याधिष्ठित नेतृत्व – राष्ट्रनिर्मितीचे गमक

 मूल्याधिष्ठित नेतृत्व – राष्ट्रनिर्मितीचे गमक

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (National Defence Academy) दीक्षांत समारोहात डॉ. अजय कुमार यांनी ठामपणे प्रतिपादन केले –

मूल्ये टिकवणे हेच राष्ट्रनिर्मितीचे खरे गमक आहे.

अकादमीचे स्नातक भविष्यात देशाच्या संरक्षण व्यवस्थेत नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या करिता हा संदेश केवळ प्रेरणादायी नाही, तर जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे.

डॉ. अजय कुमार यांनी IIT कानपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. त्यानंतर, University of Minnesota, USA येथून  बिझिनेस एडमिनिस्ट्रेशनमध्ये Ph.D. प्राप्त केली. देशाच्या संरक्षण सचिव या अत्यंत महत्त्वाच्या पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. आज ते UPSC चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, जिथे राष्ट्रनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी नेतृत्व करू शकणाऱ्या व्यक्तींची निवड करण्याची जबाबदारी ते पार पाडत आहेत.

Value-Based Leadershipया विषयावर मी पुस्तक लिहित आहे. हे पुस्तक केवळ विचारांचे संकलन नाही, तर मूल्याधिष्ठित नेतृत्वाचा एक प्रवास आहे. या प्रवासाला अधिक व्यापक करण्यासाठी, या संकल्पनेला आपल्या कार्यातून मूर्त रूप देण्याकरिता कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्तींशी मी संवाद साधत आहे.

या भेटीगाठींमधून मला सतत जाणवते की मूल्ये ही केवळ वैयक्तिक आचारसंहिता नसून राष्ट्रनिर्मितीची पायाभरणी आहेत. आणि या पायाभरणीत आता आणखी एका प्रेरणादायी नावाची भर पडली आहे…

डॉ.महेंद्र इंगळे @ जळगाव, डिसेंबर २, २०२५

No comments:

Post a Comment

Leadership – Privilege or Burden?

  Leadership – Privilege or Burden? Leadership is often seen as a privilege, but in truth it is a burden carried with responsibility. Thos...