Saturday, January 31, 2026

लोकशाही कल्याणकारी राज्य

आज सकाळी प्रा. सतीश केरकर यांची दृश्य स्वरूपातील पोस्ट पाहिली. १०००० फेस बूक फ्रेंड, व त्याकरिता दोन अकाऊंट उघडणारे, दररोज ३०/४० मित्रांना वाढ दिवसाच्या शुभेछ्या देवून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे प्रा केरकर नेहमीच विचारांना चालना देत असतात. ती पोस्ट पाहून माझ्या मनात तीन वेगळी दृश्ये उभी राहिली—

दृश्य क्रमांक १ – राजेशाही व्यवस्था

भव्य पटांगणावर सुरू असलेले खेळ फक्त "आम" आणि "खास" व्यक्तींनाच पाहता येतात. सामान्य जनतेला ते शक्य होत नाही.

दृश्य क्रमांक २ – साम्राज्यशाही व भांडवली व्यवस्था

ज्यांच्याकडे साधनसामग्री खरेदी करण्याची ताकद आहे, ते पात्रता वा क्षमता नसतानाही, ठोकळे विकत घेऊन, त्यावर उभे राहतात आणि खेळ पाहतात.

दृश्य क्रमांक ३ – लोकशाही व कल्याणकारी राज्य

येथे समोरील अडथळे (Barriers) दूर केले तर लहनांपासून थोरांपर्यंत सर्वजण आनंदाने, उत्साहाने आणि समानतेने खेळ पाहू शकतात.

या तीन दृश्यांमधून एक स्पष्ट संदेश मिळतो:

लोकशाही कल्याणकारी राज्य म्हणजे अडथळे दूर करून सर्वांना समान संधी देणे.

प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, पुणे, फेब्रु १, २०२६ 

#ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats

No comments:

Post a Comment

Realised Dreams, Rising Power

  Realised Dreams, Rising Power A river begins as a trickle in the mountains. At first, it flows quietly, nourishing the soil and quenchin...