लेखकाचा प्रवास…
साधारण दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर,
लिहिलेली पोस्ट सुरुवात ठरली.
मित्रांना ती आवडली, मलाही आवडली.
आणखी पोस्ट लिहिल्या, मित्रांकडे पाठवल्या, त्यांचे अभिप्राय घेतले.
हळूहळू कल्पनांचा ओघ वाढला—
आजूबाजूच्या घटना, पाहिलेले, ऐकलेले, अनुभवलेले,
यांचा ताळमेळ घालून लिहू लागलो,
Writer झालो!
ब्लॉगिंग सुरू केले. Blogger, Medium, LinkedInवर
विविध विषयांवर ब्लॉग लिहले.
Bloggerवर ३४६ ब्लॉग लिहले.
दहा हजारांपेक्षा अधिक वाचकांनी ते वाचले.
सर्वाधिक वाचक अमेरिका, त्यानंतर सिंगापूर
आणि मग भारत येथून होते.
लेखनाच्या माध्यमातून,
जागतिक वाचकवर्गाशी जोडला गेलो,
Blogger झालो!
मित्र म्हटले —पुस्तक लिहा. पुस्तके लिहली.
काही स्वतः प्रकाशित केली, काही प्रकाशकांमार्फत आली.
Author झालो!
या प्रवासात Ernest Hemingway चा Old Man and the Sea मधील समुद्र सतत प्रेरणा देणारा साथीदार ठरला!
“No One is Alone in the Sea"
"Everything is Old except his Eyes"
"Enemy is Worth, to be Loved ”— या शब्दांनी चिंतनशील बनविले.
व्यावसायिक मित्रांनी सुचवले—लेखनाला Product मधे रूपांतरित करा.
Dr. Mahendra’s Consulting Services अंतर्गत,
Value-Based ADR and Counselling Services सुरू केले.
Consultant झालो!
लेखनास आणखी विषय मिळाले!
Dr. Mahendra Ingale @ Pune on Sept 23, 2026
Author of Value‑Based Leadership
#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #HorizonBeyondCertainty #ValueBasedADRandCounsellingServices #Leadership
No comments:
Post a Comment