Sunday, February 15, 2026

अभिप्राय : अभियांत्रिकी स्पंदने

अभिप्राय : अभियांत्रिकी स्पंदने 

मी शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथे विद्यार्थी असताना प्रा. बी. जी. भांडारकर सरांनी मला फिजिक्स शिकविले. त्यांच्या अक्षरांचा मोहकपणा मोत्यांच्या दाण्यांसारखा भासत असे. ते होस्टेलचे रेक्टर असल्याने वैयक्तिक संबंध जुळले, आणि पुढेही ते कायम राहिले.

शासकीय तंत्रनिकेतनातून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर, सरांनी, देशात व परदेशात अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस, पॉलिटेक्निक तसेच मेडिकल कॉलेजच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले. संस्थांची उभारणी हे त्यांच्यासाठी केवळ कार्य नव्हते, तर ती एक ध्येययात्रा होती. आव्हानांना सामोरे जात, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य ठसा उमटविला.

त्यांचे व्यक्तिमत्त्व माझ्यासाठी सदैव प्रेरणादायी राहिले आहे. वेळोवेळी त्यांनी केलेले मार्गदर्शन, आणि दिलेले प्रोत्साहन माझ्या जीवन प्रवासात दीपस्तंभ ठरले. अलीकडेच त्यांनी माझे ‘अभियांत्रिकी स्पंदने हे पुस्तक वाचून त्यावर, तीन पानांचा सविस्तर अभिप्राय लिहला. त्यांच्या या मनःपूर्वक प्रतिसादाने माझ्या लेखनाला नवी ऊर्जा मिळाली. त्यांच्या शब्दांनी माझ्या लेखनात नव्या स्पंदनांची ज्योत प्रज्वलित झाली.

आज मी त्यांच्या विषयी कृतज्ञतेने नतमस्तक आहे. त्यांच्या शिकवण्यातील तेज, त्यांच्या अक्षरातील सौंदर्य, आणि त्यांच्या मार्गदर्शनातील ऊर्जा माझ्या जीवनात सदैव प्रकाशमान राहील !

Dr. Mahendra Ingale @ Pune on February 16, 2026

#ValueBasedLeadership #EngineeringHeartBeats  #Gratitude #GPJ 

#कृतज्ञता #प्रेरणादायीव्यक्तिमत्व #शिक्षकांचा_सन्मान

No comments:

Post a Comment

लोकशाहीचा नवा राजा: काकराज !

लोकशाहीचा नवा राजा: काकराज! एके दिवशी , घराच्या खिडकीवर बसलेल्या कावळ्याने , घरातील लोकांची आपल्या मुलाला उच्च शिक्षणाकरिता परदेशात पाठविण्य...