Saturday, July 18, 2026

अभिनयाचा जयजयकार !

अभिनयाचा जयजयकार !

तो माणूस होता…

माणसासारखा बोलायचा,

माणसासारखा वागायचा

माणूसपण किती होते,

सांगता येणार नाही.

 

नंतर तो अभिनेता झाला…

अभिनेत्यासारखा बोलू लागला,

अभिनेत्यासारखा वागू लागला.

अभिनय किती होता,

सांगता येणार नाही.

 

काळ पुढे सरकला…

तो उत्तम अभिनेता बनला.

लोकांनी जयजयकार केला.

 

तो अतिउत्तम झाला…

अधिक जोराने जयजयकार झाला.

 

आता तो खरोखरीचा अभिनेता झाला...

खाजगी जीवनात अभिनय उतरला,

सार्वजनिक जीवनातही तो झळकला!

 

माणूसपण हरवले, अभिनय गुण प्रगटले.

ते खुश होते… लोकही खुश होते.

 

गेल्यावर ते,

लोकांनी जयजयकार केला.

मोठ्याने केला… अभिनयपूर्वक केला!

 

Dr. Mahendra Ingale @  Pune on July 18, 2026
Author of 
Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने

 

 

No comments:

Post a Comment

Value-Based ADR for Royal Families

Value-Based ADR for Royal Families Heritage, Wealth, and the Burden of Disputes: At the dawn of independence, India faced the monumental tas...