इतिहास घडविणारे शब्द !
“कल मैं आपके घर आऊँगा”—हे वाक्य संवादकलेचं उत्तम दर्शन घडवतं. एका
वाक्यातील वेगवेगळ्या शब्दांवर दिलेला जोर (emphasis) अर्थाला
नवे रंग देतो.
शब्दांवर जोर दिल्याने बदलणारे अर्थ:
- कल : कल या शब्दावर जोर दिल्यानंतर थोडा पॉज घेवून वाक्य उच्यारल्यास त्याचा अर्थ – ‘उद्या येईन, आज नाही. किंवा अनेकदा टाळल्यानंतर
उद्या नक्की येईन.’ असा होतो. याप्रमाणे इतर शब्दांवर
जोर दिल्यास त्याप्रमाणे अर्थ बदलतो.
- मै : मी स्वतः येईन, सहकाऱ्यांना पाठवणार नाही.
- आपके : तुमच्याकडेच येईन, दुसऱ्या कुणाकडे नाही.
- घर : तुमच्या घरी येईन, ऑफिस किंवा इतर ठिकाणी नाही.
- आऊँगा : निश्चित येईन, शंका नाही.
संवादकलेतील महत्त्व:
संवादकलेत शब्द आणि त्यावर दिलेला जोर हा ही महत्त्वाचा ठरतो. बोलणाऱ्याने कुठल्या
शब्दावर जोर दिला यावरून त्याचा खरा हेतू समजतो. विशिष्ट पद्धतीने शब्द उच्चारुन भावनिक
जवळीक साधता येते, ऐकणाऱ्याच्या मनात विश्वास निर्माण करता येतो.
संवादकला शिकता येते आणि भाषण कौशल्य संपादित करता येते. डेल कारनेगी यांनी How to Win Friends and
Influence People सारख्या पुस्तकांत संवादकलेचे तत्त्वज्ञान मांडले.
त्यांनी दाखवून दिले की योग्य शब्द, योग्य प्रसंग, आणि प्रामाणिकता यांचा संगम झाल्यास संवाद लोकांच्या मनात अमिट ठसा उमटवतो,
आणि त्याद्वारे योग्य तो परिणाम साधला जातो.
आधुनिक काळातील भाषणकला :
आजच्या काळात लोकांच्या भावनांना हात घालून, त्यांना स्वप्ने दाखवून, त्यांच्या आशा अकांक्षा जागृत करून भाषणे कशी करायची याचे मार्गदर्शन
करणाऱ्या Consulting Agencies आणि PR Firms निर्माण झाल्या आहेत.
या कंपन्या नेत्यांना भाषणकौशल्य शिकवतात. भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करून
त्यात भाषणे कशी करायची, LCD Projector सारख्या संसाधानांचा वापर करून, AI तंत्रज्ञानाचा
उपयोग करून प्रेझेंटेशन कसे करायचे याचे
मार्गदर्शन करतात. Digital Platforms वरुन त्याची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करतात. हजारो कोटी
कमावून, काही Cosulting Firm चे प्रमुख स्वतःच
नेते बनले आहेत.
पण अशी भाषणे अनेकदा फुगविलेला फुगा ठरतात. टाचणी लागली तर फुगा क्षणात
फुटतो किंवा कालांतराने त्यातील हवा निघून
जाते. कारण त्यात खरी तळमळ, प्रामाणिकता आणि समाजपरिवर्तनाची ताकद नसते.
उद्दिष्टाशी प्रामाणिक राहून, ज्यांनी संघर्ष केला,
किंमत मोजली त्या नेत्यांची भाषणे इतिहासात अजरामर झाली.
इतिहासातील अजरामर भाषणे:
मार्टिन ल्यूथर किंग :
२८ ऑगस्ट १९६३ रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथील Lincoln Memorial समोर डॉ. मार्टिन ल्युथर किंग
यांनी केलेले हे भाषण ‘I Have a Dream’ म्हणून
अजरामर झाले. या भाषणात त्यांनी पुनरावृत्तीचा वापर केला. नद्या, डोंगर, टेकड्या यांचा उल्लेख करून त्यांनी
स्वातंत्र्याचा निसर्गाशी संबंध जोडला. वर्णभेदमुक्त, न्याय्य
समाजाचे स्वप्न श्रोत्यांसमोर उभे केले. “Freedom will ring” या शब्दांनी त्यांनी स्वातंत्र्याचा नाद संपूर्ण अमेरिकेत
घुमवला. हे भाषण अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीचे प्रतीक ठरले; हे भाषण नियोजनपूर्वक तयार केले
गेले होते, पण त्यातील भावनिक लाट श्रोत्यांना थेट भिडली.
महात्मा गांधी :
८ ऑगस्ट १९४२ रोजी
मुंबईतील गावलिया टॅंक येथून, महात्मा गांधी यांनी “Do or Die” ही घोषणा करून, या स्वातंत्र्य लढ्यात भारत देशाला स्वातंत्र्य
तरी मिळवू किंवा त्या प्रयत्नात मरू तरी असा संकल्प केला. या भाषणानंतर गांधीजीना अटक झाली तरीही तो संदेश देशभर
पसरला आणि स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक गती मिळाली.
Quit India भाषणात “Do or Die” ही घोषणा आधीच ठरवली होती. अहिंसा व सत्याग्रह यावर आधारित संघर्षाचे आवाहन त्यांनी नियोजनपूर्वक केले. तरीही त्यातील तळमळ जनतेच्या मनात ज्वाला पेटवणारी ठरली.
लोकमान्य टिळक :
१९०६ मध्ये, ब्रिटिश सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना अटक केली.
न्यायालयात खटला सुरू असतांना, युक्तिवादात,
लोकमान्य टिळकांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” ही घोषणा केली. न्यायालयात त्यांनी स्वराज्याचा हक्क
अधोरेखित केला. या वाक्याने भारतीय जनतेला स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणा दिली. न्यायालयाने
त्याना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली आणि त्यांची रवानगी मंडालेच्या तुरंगात करण्यात आली. पण त्यांचे हे वाक्य
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे घोषवाक्य बनले. जनतेसाठी प्रेरणादायी मंत्र ठरले. त्यातून
जनतेला आत्मविश्वास आणि धैर्य मिळाले. स्वराज्याची मागणी ही केवळ राजकीय घोषणा
नव्हती, तर ती जनतेच्या मनातील आकांक्षा होती. पुढील
स्वातंत्र्यलढ्याला यामुळे निर्णायक गती मिळाली.
विन्स्टन चर्चिल :
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनसाठी विन्स्टन चर्चिल यांची भाषणे राष्ट्राला संकटात उभारी देणारी ठरली. त्यांच्या
संवादकलेत प्रामाणिकता, धैर्य आणि प्रेरणा यांचा संगम होता.
१३ मे १९४० रोजी पंतप्रधान झाल्यानंतर चर्चिल यांनी संसदेत पहिले भाषण दिले.
त्यात त्यांनी म्हटले— “I have nothing to offer but
blood, toil, tears and sweat.” या वाक्यात त्यांनी जनतेला कठीण वास्तव स्वीकारायला भाग पाडले. युद्ध
दीर्घकाळ चालेल, त्यात बलिदान द्यावे लागेल, पण शेवटी
विजय मिळेल—हा संदेश त्यांनी दिला. हे भाषण प्रामाणिकतेचे प्रतीक ठरले. लोकांना
खोटे आश्वासन न देता त्यांनी संघर्षासाठी तयार केले.
४ जून १९४० रोजी Dunkirk मधून ब्रिटिश सैनिकांची सुटका झाल्यानंतर चर्चिल
यांनी संसदेत भाषण केले. त्यात त्यांनी म्हटले— “We shall fight on the beaches… We shall never surrender.” या वाक्यात त्यांनी जनतेला धैर्य दिले. संकटाच्या काळात ब्रिटिश जनतेला
आत्मविश्वास परत मिळवून दिला. हे भाषण जिद्दीचे प्रतीक ठरले.
समारोप:
संवादकला ही शिकता येते, भाषणकौशल्य प्राप्त करता येते. पण इतिहासात अजरामर ठरतात
तीच भाषणे जी मानवी आयुष्य बदलतात, समाजाला दिशा देतात आणि
पिढ्या न पिढ्या प्रेरणा देतात.
टिळकांचे न्यायालयातील उदगार, गांधींचे “Do or Die, चर्चिलचे Blood, Toil, Tears
and Sweat आणि मार्टिन ल्यूथर किंग यांचे I Have a Dream—हे शब्द आजही जिवंत आहेत.
या शब्दांनी परिवर्तनाची बीजे रोवली, त्यांनी इतिहास घडविला!
Dr. Mahendra Ingale @
Pune on August 9, 2026
Author of Value‑Based Leadership
#EngineeringHeartBeats
#ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls
No comments:
Post a Comment