स्वातंत्र्य!
जगावे ते स्वातंत्र्यासाठी,
आणि मरावे तेही स्वातंत्र्यासाठी—
असे हे शाश्वत मूल्य !
१५ ऑगस्ट—
प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमान जागवणारा दिवस!
आजचा दिवस आहे त्या असंख्य स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणाचा,
ज्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन अर्पण केले, प्राणांची आहुती दिली.
त्यांच्या त्यागातून आणि बलिदानातून मिळालेले हे स्वातंत्र्य!
ते जपणे, उन्नत करणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी.
या मंगलदिनी, त्या शूर वीरांना वंदन करून,
त्यांच्या आदर्शांना अनुसरून,
स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध राहू या!
स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!
आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr Mahendra Ingale @Pune on Aug 15, 2026
Author of Value Based Leadership
# EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls
No comments:
Post a Comment