Monday, September 14, 2026

आधुनिक आयुधांसह पोतराज!

आधुनिक आयुधांसह पोतराज!

कुंजीर मॉलच्या आवारात  येवले चहाचे घोट घेतांना, पोतराज भेटला….

क्रू कट हेअर स्टाइल, पिळदार दंड, रापलेली शरीरयष्टी, 
सिक्स पॅक भासेल अशी बांधणी…

मजबूत पंज्यात पकडलेल्या चाबकाने,
त्याने ट्याट्यू काढलेल्या उघड्या पाठीवर, 
चाबकाचे जोरदार फटके मारले…

येवलेनी सन्मानपूर्वक त्याला एक मोठा चहाचा कप दिला…. 

शेजारी बसून चहा पित असतांना, 
त्याचा फोटो काढण्याचा मोह मला झाला, 
पण अनेक कारणांनी मी तो आवरला…

चहाचा कप ठेवण्याकरिता तो ट्रे कडे जायला निघाला,
तेव्हा त्याच्या कमरेला लटकलेले 
फोन पे चे स्कॅनर चाबकसोबत डौलाने झुलत होते…

Dr. Mahendra Ingale @  Pune on Sept 15, 2026 Author of Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #EveryDreamComesTrue  #ValueBasedADRAndCounsellingServices #HorizonBeyondCertainty

No comments:

Post a Comment

Value-Based ADR for Royal Families

Value-Based ADR for Royal Families Heritage, Wealth, and the Burden of Disputes: At the dawn of independence, India faced the monumental tas...