Sunday, November 9, 2025

मूल्याधिष्ठित भरारी...

 माणसाला पक्ष्यांसारखे उडता येत नाही, पण विमानाच्या सहाय्याने तो पक्ष्यांपेक्षा उंच भरारी घेऊ शकतो. माशासारखे पाण्याखाली राहता येत नाही, पण पाणबुडीच्या सहाय्याने समुद्राच्या तळाशी पोहोचू शकतो. हत्तीपेक्षा बलवान नसतानाही, अंकुशाच्या सहाय्याने त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. वाघासारख्या हिंस्त्र प्राण्याची बंदुकीच्या सहाय्याने शिकार करू शकतो.

हे सर्व मानवाला शक्य झाले आहे—त्याच्या सुसंघटित प्रयत्नांमुळे, विशिष्ट प्रणालींचा कल्पकतेने उपयोग करण्याच्या क्षमतेमुळे, आणि सतत नवकल्पना शोधण्याच्या वृत्तीमुळे.

अठराव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. मास प्रॉडक्शन, टाइम स्टडी आणि कार्यक्षमतेवर आधारित व्यवस्थापन पद्धतींनी उत्पादन प्रक्रियेत क्रांती घडवली. शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी या परिवर्तनात मोलाचा वाटा उचलला.

याच काळात Organisational Behaviour आणि Organisational Development या संकल्पना उदयास आल्या. संस्था ही केवळ एक रचना नसून ती एक सजीव घटकासारखी वागते—Organisation behaves like an entity. म्हणूनच तिचा अभ्यास करता येतो, आणि योग्य नियोजनाद्वारे तिचा विकासही साधता येतो.

संस्थेच्या कार्यक्षमतेसाठी चार मूलभूत पैलू ओळखले गेले:

•  Planning – उद्दिष्टांची स्पष्टता व ते साधण्या करिता नियोजन  

•  Coordinating – विविध घटकांमध्ये समन्वय 

•  Directing – सहकऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन

•  Controlling – नियोजनानुसार कार्य सुरू राहावे या करिता अधिकाराचा वापर

या सर्व प्रक्रियांना प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी Influence हे एक महत्त्वाचे माध्यम ठरते—ते केवळ अधिकारातून नव्हे, तर विश्वास, संवाद आणि नैतिकतेतून निर्माण होते.

याचबरोबर System Approach ही संकल्पना उदयास आली. उत्पादन प्रक्रियेत Input (कच्चा माल), Process (प्रक्रिया), आणि Output (उत्पादित घटक), व ठरविल्यानुसार आऊटपूट मिळवा या करिता प्रक्रिये दरम्यान आवश्यक बदल सुचविण्याकरिता Feedback यंत्रणा या पद्धतीने ही संकल्पना राबविण्यात येते. आता, System Approach केवळ उत्पादनापुरती मर्यादित न राहता शिक्षण, आरोग्य, प्रशासन, आणि नेतृत्व अशा विविध क्षेत्रात परिमाणकारकरित्या  वापरली जाते. 

केवळ भौतिक साधनांची निर्मिती करून सुखसुविधा निर्माण करणारे नव्हे, तर मानवी जीवन अधिक अर्थपूर्ण, समाधानी आणि मूल्याधिष्ठित बनवण्याचा विचार करणारे नेतृत्व असायला हवे . सुखसुविधा पुरवणे ही एक पायरी आहे, पण मानवजातीच्या कल्याणासाठी विचार करणे हे अंतिम ध्येय असायला हवे.

नेता हा संस्थेचा महत्वाचा घटक, जो संस्थेला दिशा, प्रेरणा आणि मूल्य देतो आणि मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणण्यास मदत करतो .

हेच नेत्यांचं कार्य आहे. अशा नेतृत्वाची गरज आहे, जे केवळ कार्यक्षमतेवर नव्हे, तर मूल्यांवर आधारित असेल.

डॉ. महेंद्र इंगळे @ पुणे, नोव्हेंबर ९, २०२५

Monday, November 3, 2025

Value-Based Leadership: Engineering Dreams, Inspiring Souls

Coming Soon…

Book:

Value-Based Leadership: Engineering Dreams, Inspiring Souls

A soulful journey from reflection to creation.

One quiet moment, a thought stirred within me:

Should I write a book on leadership—when so many already exist?

I paused. I pondered. And then, the answer came: Yes.

Not to add one more book, but to offer one more voice—rooted in values, shaped by experience, and guided by intuition.

Thus began the journey of Value-Based Leadership.

To my surprise, I discovered that many chapters were already alive—shared as heartfelt posts on social media, embraced by readers, and even recognized by Facebook as “High Quality Content.”

I began rearranging those reflections, weaving in new ones, and letting the book take shape in its own organic way.

Even now, I do not fully know what form it will take—but I do know what spirit it carries.

Cover:

At its heart lies a golden compass, symbolizing ethical navigation, timeless wisdom, and the courage to choose direction over drift. It’s not just about where a leader goes, but why and how they journey. The compass guides decisions even in turbulent times.

Above it rises a torch, an emblem of enlightenment, purpose, and the enduring flame of inspiration. It represents the soul of leadership: the ability to illuminate paths for others, to kindle hope, and to lead not by dominance but by example.

The white background offers purity and space—suggesting reflection, humility, and openness. It reinforces the idea that true leadership is rooted in simplicity and sincerity.

The title in a deep blue, the color of depth, the color of oceans and skies reflects the expansive reach of value-based leadership across disciplines, cultures, and generations.

The subtitle, “Engineering Dreams, Inspiring Souls,” bridges the technical and the emotional realms.

This book will explore:

• Different forms of leadership—personal, political, corporate, and civic

• Aspects of leadership such as problem-solving, ethical dilemmas, and decision-making

  And ultimately, my personal framework:

“Decision Making With Intuition Integrated With Prayer”—a soulful approach that blends inner clarity with spiritual grounding.

It is written for:

• Professionals seeking purpose beyond performance

• Statesmen and politicians navigating ethical crossroads

• Citizens aspiring to lead with integrity in everyday life

If this resonates with you, I invite you to:

• Share your thoughts, stories, and reflections on value-based leadership

• Provide insights in the field of leadership and establish yourself as a thought leader.

• Connect if you are a publisher who believes in meaningful, values-driven literature

Let’s shape a leadership narrative that walks with humility and speaks with conviction.

Let it be a mirror for self-reflection—and a torch for future generations.

Dr. Mahendra Ingale @ Pune on Nov 5, 2025

mahendraingale67@gmail.com



हंस, कावळे व मानसरोवर!

 हंस, कावळे व मानसरोवर!

लोक व्यवहारापासून अलिप्त असलेले, गुढ व्यक्तिमत्त्वाचे, प्रतिभावान व प्रथितयश लेखक जी. ए. कुलकर्णी यांची विदूषक ही अंतर्मुख करणारी प्रदीर्घ कथा!

मी ती अनेकदा वाचली. आता ऐकतो. 

व्यस्ततेमुळे मूळ कथा वाचणे किंवा ऐकणे आपल्याला सहज शक्य नाही. त्यामुळे या कथेतील हंस, कावळे आणि मानस सरोवरा संबंधातील विडंबनात्मक रुपक-उपकथेचा काही भाग मी येथे उद्धृत करीत आहे. मूळ कथेतील प्रत्येकी वापरून, पुढे मी या उपकथेचा  कल्पनाविस्तार केलेला आहे.

'एकदा असंख्य कावळे मानससरोवराजवळ जमले. त्या ठिकाणी शुभ्र पंखांचा, लाल चोचीचा एक हंस हंसीबरोबर जलक्रीडा करत होता. कावळ्यांनी एकदम कलकलाट केला व त्यांनी हंसास मानससरोवर सोडून जाण्यास सांगितलं, कारण त्यांच्या आगमनाच्या क्षणापासून मानससरोवरावर त्यांची सत्ता सुरु झाली होती.

"अनादिकालापासून हे सरोवर हंसांसाठीच आहे." हंस म्हणाला, "शिवाय तुम्हाला पोहता येत नाही, तर मानससरोवर हवं कशाला?"

"आम्हाला पोहता येत नसेल, पण त्याचा आणि स्वामित्वाचा काय संबंध आहे? आपल्या सत्तेची नृत्यशाला अथवा गायनशाला असेल तर आपल्याला नृत्य-गायन आलंच पाहिजे असं कुठे आहे?" कावळ्यांच्या नेत्याने राजकारणी हसून विचारले. हा नेता मोठा व्युत्पन्न होता व त्याने कृष्णद्वीपात जाऊन न्याय व राज्यशास्त्राचा प्रगाढ अभ्यास केला होता.

"आणि आत्ताच्या आत्ता तू मानससरोवर सोडून गेला नाहीस, तर आम्ही सगळे तुझ्यावर तुटून पडू व तुझा आणि तुझ्या निवासस्थानाचा पूर्ण नाश करू!" एका तरूण कावळ्याने गर्जून सांगितले.

परंतु त्याच्या या कर्कश शब्दांनी नेत्यास क्रोध आला व त्याचे संस्कारित मन फार व्यथित झाले. त्याने आपल्या उतावीळ अनुयायांस गप्प बसवले. अशा त-हेच्या आततायी उपायांची योजना आता रानवट झाली होती आणि तिला कृष्णद्वीपनीतीत स्थान नव्हते. त्याने पुन्हा सौजन्यपूर्वक हसून म्हटले, "आपलं म्हणणं मला पूर्ण मान्य आहे. मानससरोवर हंसांसाठीच आहे, ही आपली प्राचीन परंपरा मला अढळ राखायची आहे. उलट, त्या पवित्र परंपरेच्याच सामर्थ्यशाली आश्रयाने मला मातृदेशाची कीर्ती वृद्धिंगत करायची आहे. पण त्यासाठी हंस कोण हे आधी ठरलं पाहिजे. आपण हंस आहात हे कशावरून?"

हंसाला या प्रश्नाचा मोठा विस्मय वाटला. त्याने आपल्या शुभ्र पंखांकडे पहिले. त्याला जलातील प्रतिबिंबात आपली डौलदार मान, तिच्या अग्रभागी असलेली कमलदलासारखी लाल चोच दिसली. पण आपण हंसच आहोत हे सांगण्यास त्यास प्रमाण सुचेना. कावळ्यांचा नेता नम्रपणे हसला. तो म्हणाला, "तेंव्हा प्रथम आपण या प्रश्नाचा निर्णय लावू. येथे उपस्थित असलेल्या सर्वांना आपण एकेक पान आणायला सांगू. जर आपण हंस असाल तर त्यांनी लाल पान आणावं. जर त्यांना मी हंस आहे असा विश्वास असेल तर त्यांनी हिरवं पान आणावं."

" पण या ठिकाणी हंसापेक्षा कावळेच संखेने जास्त आहेत." हंसी म्हणाली.

"देवी, आपले शब्द पूर्ण सत्य आहेत, पण तो आमचा का अपराध आहे?" नेता विनयाने म्हणाला.

थोड्याच वेळात त्या ठिकाणी हिरव्या पानांचा ढीग जमला. हंसीने जाऊन कमळाची एक लाल रंगाची अस्फुट कळी आणून ठेवली.

कावळ्यांचा नेता म्हणाला, "पाहिलंत? न्यायनीतीनुसार निर्णय घेऊन मी हंस ठरलो आहे, हे इतर सारे माझेच आप्तगण असल्यामुळे अर्थात ते देखील हंसच आहेत; आणि आता आपणच मान्य केलंत की, मानससरोवर हंसांसाठीच आहे. तेंव्हा तुम्ही आता येथून जावं हे न्यायाचं होईल."

हंस खिन्न होऊन सरोवराबाहेर आला. हंसीने त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, "प्रिया, तू खिन्न का?" ती म्हणाली, "पानांच्या राशीनं का हंसत्व ठरत असतं? चल, आपण येथून जाऊ. तू ज्या जलाशयात उतरशील ते मानससरोवर होईल! जेथे तू दिसशील ते तीर्थक्षेत्र ठरेल!"'

सरोवरात, हंसाच्या वळचणीने राहणारी बदके,  समोरच्या झाडावरील वानर,  झाडाच्या ढोलीत राहणारी खार हे हंस व कावळ्यांच्या नेत्यातील संवाद उत्कंठतेने ऐकत होते; तसेच आणलेली लाल व हिरवी पाने मोजून हंस कोण हे ठरवण्याची नाविन्यपूर्ण प्रक्रिया जवळून बघत होते. कावळ्याच्या नेत्याचे  सामर्थ्य, बुद्धीवैभव, वाक्चातुर्य, तर्कसंगत पद्धतीने त्याने केलेले विवेचन, त्याचा शांत व संयमी स्वभाव बघून ते फार प्रभावित झाले. आपणांस अनुयायी म्हणून स्वीकारावे अशी त्यांनी नेत्याकडे आजिजीने विनंती केली; ती त्याने मान्य केली. त्यानंतर घारी आणि  गिधाडांनीही कावळ्यांच्या नेत्याचे नेतृत्व स्वीकारले.

कावळ्यांच्या नेत्याने मानसरोवर बगळ्यांकडे, तर समोरचा भूप्रदेश वानराकडे सोपविला. खारीला आवश्यक त्या सुखसोयी ढोलीतच पुरवण्यात येत असून; सभोवतालच्या प्रदेशाच्या टेहळणीची  जबाबदारी तिच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

आकाशात उंच भरारी घेणारा व आपल्या तीक्ष्ण नजरेने भक्ष्याचा वेध घेऊन, वेगाने झडप घालणारा सुवर्ण गरुड परिस्थितीचे अवलोकन करीत होता. उद्या हेच कावळे पानांचे भारे गोळा करत माझ्या कांचनगौरी शिखरावर अधिकार सांगू लागतील हा विचार त्याच्या मनात येताच त्याच्या अंगावरील पिसे उसळली व डोळ्यात अंगार फुलला... 


*प्रा. महेंद्र इंगळे, जळगांव -पुणे*


(ता.क. कथेत लेखकाला अभिप्रेत असलेले हे कृष्णद्वीप म्हणजे जागतिक दर्जाचे Harward  सारखे एखादे विद्यापीठ तर नाही ना? नेत्याने तेथून MBA, Doctorate of Law, Juris Doctor या सारख्या पदव्या प्राप्त केल्या होत्या काय?  असे प्रश्न मला पडतात.)

The Sculptor of Souls

 “A leader is best when people barely know he exists, when his work is done, his aim fulfilled, they will say: We did it ourselves.”

Lao Tzu

While revisiting Transcendence: My Spiritual Experiences with Pramukh Swamiji by Dr. A.P.J. Abdul Kalam, I found myself gently drawn into a realm beyond thought—a quiet immersion in transcendence. This book, gifted to me by a dear colleague, is not merely a literary offering. It is a luminous bridge—spanning science and spirituality, intellect and intuition, leadership and humility. Each page pulses with purpose, inviting reflection, reverence, and renewal.

Dr. Kalam’s reflections on Pramukh Swamiji touched me deeply. The fusion of scientific rigor and spiritual depth, the emphasis on honour and creative leadership, and the call to live with purpose—all these themes echo in the lives of quiet visionaries I’ve been privileged to know. Their leadership was not a spotlight—it was a mirror reflecting the strengths of others.

One such moment of revelation came during a presentation by an IT engineer—an alumnus of a U.S. university who had left behind a promising career to serve the Swaminarayan Sampradaya. His presentation unveiled the story behind the construction of Akshardham Mandir in Delhi. What moved me most was not the grandeur of the temple, but the process, and the vision behind its creation.

To achieve the temple’s intricate symmetry and sculptural finesse, the team sought out the descendants of once-renowned sculptors—artists whose lineage carried the dormant genius of stone and spirit. These heirs, having drifted into other professions due to the decline in demand for traditional craftsmanship, were rediscovered and retrained. Pramukh Swamiji believed that artistry, like values, lives in the genes—it only needs the right soil to bloom. Through patient mentoring and spiritual conviction, these individuals reclaimed their ancestral gift. The result: a temple that stands today not just as an architectural marvel, but as a testament to faith in forgotten potential.

Later, I visited Akshardham and experienced its grandeur firsthand. The film on Neelkanth, shown on what was then India’s largest screen, transported me into a state of trance. I felt the presence of something timeless—an echo of devotion, discipline, and design. My visits to Swaminarayan Mandirs in Mumbai, Vadodara, Dhule, and Jalgaon deepened this connection. I was fortunate to witness the construction and inauguration of some of these temples, each a living embodiment of service and sanctity.

The reflections in Transcendence continue to guide my understanding of creative leadership. They remind me that true leadership is not about visibility—it is about nurturing possibility. It is the quiet art of enabling others to shine; leading not from the front, but from within. It is the courage to trust in latent talent, the humility to serve without applause, and the wisdom to build bridges between tradition and transformation.

The legacy of Pramukh Swamiji teaches us that value-based leadership is not a performance—it is a pilgrimage.

कवडशांच्या सोबतीने प्रवास

चालत असताना काही कवडसे दिसले…

निश्चित सांगता येणार नाही, पण बहुधा ते सत्याचे असावेत.

त्या उजेडाच्या उगमाचा शोध घ्यावा का, असा विचार मनात आला.

रस्त्यात Nietzsche भेटला. तो म्हणाला—

"सत्य दाहक असते.

त्याच्या प्रकाशाने डोळे दिपतात.

लोकांना सत्य सांगितलेले आवडत नाही.

जगात राहायचे असेल, तर त्यांच्या स्वप्नांसोबत राहा.

जग सोडून जाणाऱ्याला मात्र ते सांगायला हरकत नाही."

मी थोडा थांबलो…

कवडसे अजूनही दिसत आहेत.

त्या प्रकाशात समोरचा रस्ता स्पष्ट दिसतो आहे.

रस्ता दिसतोय…चालले पाहिजे...

कवडशांचा एवढा प्रकाश पुरेसा आहे.

स्वप्नांसोबत राहूनही, कवडशांच्या सोबतीने चालता येते.

पुढे, सत्याचा प्रकाश दाहक असला,

तरी स्वप्नांची सावली त्याला सुसह्य बनवू शकते,

म्हणून चालले पाहिजे…

आजचे स्वप्न उद्याचे सत्य असू शकते,

म्हणून चालले पाहिजे…

— महेंद्र इंगळे

पुणे, नोव्हेंबर ३, २०२५

Sunday, November 2, 2025

The Dream That Refused to Die

 Among the many voices that have echoed through the corridors of history, few have stirred my soul as deeply as that of Dr. Martin Luther King Jr. His iconic speech, “I Have a Dream,” is not merely a masterpiece of oratory—it is a voice carved from courage, a lyrical manifesto of hope, and a timeless call to conscience.

I have listened to that speech countless times. Each time, it moves me anew. The cadence of his voice, the deliberate repetition of phrases, the poetic invocation of rivers and mountains—Mississippi, Colorado, Stone Mountain, Lookout Mountain—these were not just geographical markers, but symbols of a nation’s fractured soul yearning for unity. His refrain, “Let freedom ring,” rang not only across the land but deep within the hearts of those who heard him. The audience’s rising excitement, their thunderous affirmations after each sentence, transformed that moment into something immortal.

Dr. King was not merely a speaker; he was a seer. A visionary who dared to dream aloud in a time of darkness. He knew the risks. He received threats. He sensed, perhaps even accepted, that his life might be cut short. And yet, he did not flinch. He did not retreat. His commitment to justice, to equality, to the dignity of the African American community, was unwavering. It was, in the truest sense, a “ready-to-die” level of commitment—the highest form of moral courage a leader can embody.

What draws me most to his speech is the word “Dream”, Not just its poetic repetition, but the very idea of it. I, too, have cherished dreams—not only those that visit in the quiet of night, but those that blaze in the light of day. Dreams that guide, that inspire, that shape destinies. Many of my dreams have come true, and so I resonate deeply with Dr. King’s vision. His dream was not a fantasy; it was a blueprint for a better world.

Dr. King’s words did not merely inform—they pierced. They entered the hearts of his listeners like arrows of truth. He was a communicator of rare power, a leader whose voice became a vessel for the voiceless. He did not lead with fear or force, but with faith and fire. That is value-based leadership in its purest form: a life lived in service of a cause greater than oneself, with integrity, eloquence, and unshakable resolve.

In honoring Dr. King, I honor the dreamer in all of us. The one who dares to imagine a world not as it is, but as it could be. And in doing so, I reaffirm my own belief—that dreams, when guided by values, can indeed change the world.

Dr. Mahendra Ingale @ Pune on Nov 2, 2025

(Value Based Leadership, Publishing soon)

#ValueBasedLeadership #IHaveADream #MartinLutherKingJr #DreamsComeTrue

Thursday, October 30, 2025

Ratan Tata: Value-Centred Leader

 "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that person, but I can't respect him." ~ Ratan Tata

The world is often dazzled by power and profit. But Ratan Tata stood apart. He was not just a titan of industry. He was a gentleman of grace. Of humility. Of unwavering values.

His life is not just a tale of corporate triumph; it is a living testament to the quiet strength of character.

After earning his degree in architecture and structural engineering from Cornell University, and working briefly in the United States, Tata returned to India at his grandmother’s insistence. He joined the Tata Group not as a privileged heir, but as an ordinary engineer—working shoulder to shoulder with shop-floor workers and supervisors. He earned their respect not through authority, but through camaraderie.

From these humble beginnings, he rose to become Chairman of the Tata Group, steering it through transformative change. He reorganized subsidiaries, exited non-core businesses, and focused on building a globally competitive enterprise. His leadership was marked by trust in people, delegation of responsibility, and quiet conviction.

Tata’s values were not negotiable. He refrained from entering certain government mega-projects where conditions clashed with his ethical standards. His ascent was powered not by ambition alone, but by vision, discipline, and a deep sense of responsibility.

Under his leadership, the Tata Group expanded globally, acquiring iconic companies like Jaguar Land Rover and Corus Steel, and saw a tremendous rise in profitability.

He was featured on the cover of Forbes, interviewed by leading journalists, and invited to speak at prestigious institutions—Stanford among them.

Beyond business, Ratan Tata was a generous philanthropist. He donated $50 million each to Cornell University and Harvard Business School—his alma mater. His contributions to Indian hospitals, educational institutions, and social causes are countless. But what moved me most was his love for his German Shepherd, Tommy. In his will, he ensured ₹12 lakh was allocated for Tommy’s care. That gesture speaks volumes about his heart.

He was a great patriot, deeply devoted to his motherland. He was awarded the Padma Vibhushan, India’s second-highest civilian honour—not just for his business achievements, but for the values he upheld.

I still remember watching him on Rendezvous with Simi Garewal. There he was—soft-spoken, composed, and deeply human. His responses to personal questions, especially about marriage and children, were marked by rare honesty. He admitted he once longed for companionship, but eventually found peace in solitude and freedom from familial responsibilities. When he spoke of the loneliness he felt after stepping down from the Tata Group at 75, it wasn’t self-pity—it was a dignified reflection of a man who had given his all.

He once wrote to J.R.D. Tata, “You have set the highest standards of integrity I have ever seen in the manner in which you conducted yourself.” On that same show, Simi Garewal turned those words back to him, saying, “The same applies to you.” Her words echo my own sentiments.

Ratan Tata lived his values. He was honest with others because he was honest with himself. A man of vision, humility, and steel-like will, his life is an enduring inspiration for the corporate world.

His life reminds us that success without values fades, but values with success endures as legacy!

Dr. Mahendra Ingale @ October 30, 2025

(Value Based Leadership, Publishing soon)

#RatanTata #ValueBasedLeadership #LeadershipReflections #PhilosophyOfLeadership

Realised Dreams, Rising Power

  Realised Dreams, Rising Power A river begins as a trickle in the mountains. At first, it flows quietly, nourishing the soil and quenchin...