Tuesday, July 28, 2026

बीजांचा संघर्ष !

 बीजांचा संघर्ष !

बियांना रुजायचे असेल तर संघर्ष अटळ असतो

जेथे त्यांना रुजायचे असते, 

त्या जमिनी खाली असतो घनदाट अंधार

दैदीप्यमान प्रकाशाची ओढ उराशी बाळगून  

वाढायचे असते त्यांना संघर्ष करीत !

 

एकाच वेळी वाढायचे असते त्यांना दोन्ही बाजूंनी                                                                     जमीनीखाली मुळे पाठवून, जमीनीवर शेंडे उंचावून!

 

कधी पशू-पक्ष्यांकडून तर कधी माणसांकडून,

डोंगरावर बिया भिरकावल्या जातात

काही रुजतात, काही मातीत मिसळून जातात

ज्या रुजतात त्यांना असतो दऱ्या कपारींचा आधार 

निसर्ग परिस्थिती निर्माण करतो अनुकूल आणि प्रतिकूलही!

त्या संघर्ष करतात, रुजतात आणि वाढतात


जंगलात रुजणाऱ्या बिया म्हणजे स्वतंत्र नेतृत्व !

हे नेतृत्व कठोर असतं, ते निर्माण करते स्वातंत्र्याची आस आणि संघटित शक्ती—जंगलासारखी !

त्यातील काही वटवृक्ष होतात!

 

काही बिया मशागत केलेल्या शेतात रोवलेल्या जातात

त्यांना खत पाणी मिळते, त्यांची काळजी घेतली जाते

त्यांना माणसांची साथ लाभते  

खतपाणी, मशागत, देखभाल यामुळे त्यांचा संघर्ष हलका होतो


शेतात रोवलेल्या बिया म्हणजे सहकार्यात्मक नेतृत्व!

हे नेतृत्व लोकांना सोबत घेऊन चालते, त्यांना आधार देते, त्यांच्या गरजा पूर्ण करतं —शेतीसारखं!

त्यातून पुन्हा नवी बीजे निर्माण होतात

ती पुन्हा रोवली जातात...

 

Dr. Mahendra Ingale @  Pune on July 28, 2026
Author of 
Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls #अभियांत्रिकीस्पंदने

No comments:

Post a Comment

Every Leader is a Dreamer

Every Leader is a Dreamer "Every leader is first a dreamer-one who knows: Who They Are, and dares to shape destiny through vision....