Sunday, November 16, 2025

कृतज्ञतेचे रंगीत मुखपृष्ठ

एक दिवस फोन आला. आवाज ओळखीचा आणि आदरयुक्त  होता—

सर,  मी हेमंत नाईक. १९८९ चा विद्यार्थी. तुमचं पुस्तक मिळेल का? मी त्याची झेरॉक्स काढून तुम्हाला परत देईन.

मी थोडा थांबलो. विचारलं, “असं का?”

सर, फोटो कॉपीअर माझ्या ओळखीचा आहे. तो ९० रुपयात झेरॉक्स काढून देणार आहे. ते मला स्वस्तात पडेल.

मी हसलो.

हे झेरॉक्स तुम्हाला स्वस्तात पडणार नाही,” मी म्हणालो. कारण त्यात, मी Copilot च्या सहाय्याने डिझाईन केलेले रंगीत मुखपृष्ठ  नसेल. त्याचे मूल्य हे पुस्तकाच्या किमतीपेक्षा कीती तरी अधिक आहे. ते केवळ कागदाच्या स्वरूपात नाही तर ते भावना, प्रेरणा आणि सन्मानाचं प्रतीक आहे. तुम्ही पुस्तक घेण्याची इच्छा दाखवलीत, हेच माझ्यासाठी मौल्यवान आहे. तुम्ही मला भेटा. मी तुम्हाला हे पुस्तक भेट देईन. झेरॉक्सची आवश्यकता नाही.

दोन दिवसांनी हेमंत भेटले. हातात पुस्तक होतं. ते त्यांनी Amazon वरून मागवलेलं होतं.

ते माझी स्वाक्षरी घेण्यासाठी आले होते. मी लिहिलं—

प्रिय हेमंत नाईक यांना सस्नेह…

त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन, धुळे येथील काही आठवणी सांगितल्या. ‘तुम्ही हसत खेळत शिकवायचे, स्नेहसंमेलन, खेळ व इतर कार्यक्रमांमध्ये आम्हाला प्रोत्साहन द्यायचे. खो खो टीम सोबत तुम्ही सांगली आणि कोल्हापूरला आमच्या सोबत आलात आणि आमचा उत्साह वाढविला. स्पर्धा जिंकल्यानंतर प्रत्येकाला वैयक्तिक बक्षीस दिले. या सगळ्या गोष्टींची, आम्ही भेटतो तेव्हा चर्चा करतो’, असे त्यांनी सांगितले.

पुस्तकावर स्वाक्षरी घेतल्यानंतर त्यांनी एक आठवण सांगितली—

सर, तुमची एक स्वाक्षरी असलेलं जर्नल मी आजही जपून ठेवलं आहे.

तेव्हा ती स्वाक्षरी मिळाल्यावर मला किती आनंद झाला होता, हे शब्दांत

 सांगता येणार नाही.

हे ऐकून मी भारावून गेलो.

माझ्याप्रती कोणी कृतज्ञता व्यक्त करतो—तेव्हा माझं अंतःकरण भरून येतं.

कृतज्ञता हे  शाश्वत मूल्य आहे. माझ्या दृष्टीने त्याला अनन्य साधारण महत्व

आहे. कृतज्ञता ही केवळ भावना नसून आत्म्याला स्पर्श करून, हृदयात दिव्य

 स्पंदने निर्माण करणारी एक अनुभूती असते !

डॉ. महेंद्र इंगळे @पुणे, नोव्हेंबर १७, २०२५  

Saturday, November 15, 2025

More from Less for More

 It was my privilege and pleasure to attend the launch ceremony of the inspiring book ‘More from Less for More’, authored by Padma Vibhushan Dr. Raghunathrao Mashelkar—a visionary scientist, institution builder, and social thinker—and Mr. Sushil Borde- Head of Reliance Innovation Leadership Centre, Head of Jio LEAP, and President of the Anjali Mashelkar Foundation. The event was held at the International Centre, Pune.

Both authors eloquently articulated the essence of the MML (More from Less for More) strategy, weaving together compelling success stories and global case studies. Their message was clear and powerful: by harnessing technology and creativity, we can reduce resource consumption while simultaneously enhancing quality and reach.

The MML philosophy is rooted in the conviction that innovation must transcend economic and social boundaries. It champions the idea that excellence should not be the privilege of a few—but the right of all.

More from Less for More is not just a strategy—it is a movement toward inclusive innovation, sustainable progress, and ethical excellence.

I extend my heartfelt congratulations and best wishes to Dr. Mashelkar and Mr. Borde for this remarkable contribution to the world of thought leadership and social transformation.

Dr. Mahendra Ingale @ Pune on November 15, 2025

संघर्षाचे त्रिसूत्र

 संघर्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संघर्षाचे स्वरूप, हेतू आणि त्यातील आव्हाने या नुसार  संघर्षाचे प्रामुख्याने तीन प्रकार करता येतील. वैयक्तिक संघर्ष, जीवन संघर्ष, आणि व्यवस्थेविरुद्ध संघर्ष.

१. वैयक्तिक संघर्ष – अंतःकरणातील शुद्धीकरण

हा संघर्ष आत्म्याशी संबंधित असतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वतःला शुद्ध करणे हा या संघर्षाचा गाभा आहे. हा संघर्ष ऐच्छिक असतो. कोणी जबरदस्ती करत नाही, पण तो न केल्यास आत्मिक उन्नतीचा लाभ मिळत नाही. हा संघर्ष कठीण असतो, पण तोच व्यक्तिमत्त्वाला तेज देतो.

२. जीवन संघर्ष – अस्तित्व टिकवण्याची लढाई

दुःख, दारिद्र्य, दुर्धर आजार, चरितार्थ चालविण्या करिता -शिक्षण, अरोग्य, नोकरीसाठीची धडपड—या सगळ्या अडचणींशी झुंज देत जगण्याचा संघर्ष म्हणजे जीवन संघर्ष. हा ऐच्छिक नसतो; तो अपरिहार्य असतो. यात बाह्य त्रास नसतो, पण परिस्थितीच माणसाला झुंजायला भाग पाडते. हा संघर्ष मूलभूत गरजांसाठी असतो, आणि त्यातून माणूस जगण्यासाठी आवश्यक सामर्थ्य मिळवतो.

३. व्यवस्थेविरुद्ध संघर्ष – मूल्यांची चाचणी आणि भावनिक गुंतवणूक

हा संघर्ष सर्वात गुंतागुंतीचा आणि आव्हानात्मक असतो. तो ऐच्छिक असतो. तो मूल्यांवर आधारित असतो. त्यासाठी  त्यागाची तयारी असावी लागते. अनेकदा व्यवस्थेत बदल घडवून आणण्याकरिता, व्यवस्थेतील विसंगती, अन्याय, भ्रष्टाचार या विरुद्ध उभे राहावे लागते तेव्हा हा संघर्ष निर्माण होतो. या संघर्षापासून दूर राहण्याकरिता व्यवस्थेकडून अनेक प्रकारची प्रलोभने दाखविली जातात.

"सोडून द्या, तुम्हाला बक्षीस मिळेल."

न सोडल्यास, शिक्षा

या संघर्षात एक विशेष गुंतागुंत असते. व्यवस्था नेहमीच बदलाच्या विरोधात असते. व्यवस्थेत काही जवळची माणसे असतात. वैयक्तिक पातळीवर ते आपुलकीने वागतात, पण व्यवस्थेचा भाग म्हणून ते वेगळ्या पद्धतीने वागतात. व्यवस्थेकडून प्रोत्साहन, व्यवस्थेतील व्यक्तींशी आपुलकीचे व भावनिक संबंध, ईछ्या-आकांक्षा आणि इतर परिस्थितीजन्य घटक, त्यांना तसे वागण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे हा संघर्ष काहीवेळा भावनिकदृष्ट्या अधिक वेदनादायक ठरतो.

या संघर्षाच्या कालावधीत अनेकदा द्विधा मनस्थिती निर्माण होते. कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय दडपणे निर्माण होतात तेव्हा संघर्ष सुरू ठेवावा की थांबवावा, हा प्रश्न अनेकदा पडतो. तेव्हा हा संघर्ष वैयक्तिक पातळीवरचाही होतो. स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची परिक्षा यातून होते.

कधी कधी संघर्षाच्या दरम्यान काही असुविधा निर्माण होतात—कधी हेतुपुरस्सर, तर कधी परिस्थितीजन्य. संघर्ष करणारी व्यक्ती थकून जावी, गोंधळून जावी, किंवा तिने माघार घ्यावी या करिता हेतुपुरस्कर असुविधा निर्माण केल्या जातात, गैर समज पसरविले जातात, चारित्र्य हननाचे प्रयत्न होतात. अशा वेळी, अस्तित्वाचीच लढाई असल्याने हा संघर्ष जीवन संघर्षाचे स्वरूप घेतो.

म्हणूनच व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष हा सर्वात गुंतागुंतीचा असतो. तो केवळ बाह्य व्यवस्थेविरुद्ध नसतो, तर अंतःकरणातील द्वंद्वाशीही असतो. तो वैयक्तिक, सामाजिक आणि भावनिक स्तरांवर एकाच वेळी चालतो.

मूल्याधिष्ठित जीवन जगणाऱ्या व्यक्ती या संघर्षासाठी सज्ज असतात आणि पडेल ती किंमत चुकवायला त्या तयार असतात. संघर्षाची त्रिव्रता जेव्हढी अधिक त्या प्रमाणात आत्मबळ निर्माण होते. प्रार्थनेने त्यात वृद्धी होते.

जिंकल्याने नव्हे तर संघर्षाने व्यक्तिमत्वास झळाळी येते. संघर्षाला प्रार्थनेचे बळ मिळते संघर्षशील व्यक्तींचे  व्यक्तिमत्त्व झळाळून उठते. मूल्यांकरिता संघर्ष करणाऱ्या व्यक्तींच्या भोवती एक तेजस्वी आभा निर्माण होते. त्यांच्या सहवासात आश्वासकता वाटते, त्यांच्या नजरेतून स्निग्धता झिरपत जाते, आणि त्यांचे शब्द थेट हृदयाला जाऊन भिडतात. जीवन विकासा करिता या व्यक्ती मार्गदर्शक ठरतात.  

संघर्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे—तोच जीवनाचे खरे सौंदर्य उजळवतो.

डॉ.  महेंद्र इंगळे@ पुणे, नोव्हेंबेर १५, २०२५


Tuesday, November 11, 2025

Power, Politics, and Influence: A Reflection

 Power:

Power is a fundamental psychological need—an instinct embedded in all living beings. In human society, power manifests as the ability to influence people and control the situations. It is not merely about control; it is about the capacity to shape outcomes, inspire action, and bring about change.

MacClelland, in his Theory of  Needs, has identifies the need of power ( nPow) as the desire to influence, control, and lead  others. This need when aligned with values, becomes a force for transformation.

The Source of Power: Followers and Influence

Power is often conferred upon leader by his followers. A leader becomes powerful not in isolation, but through the trust, belief, and support of those who choose to follow. This is especially evident in the political arena, where a single leader may command the allegiance of millions.

Types of Power:

Power takes many forms, shaped by context and source:

Charismatic Power

Rooted in personal magnetism, this power emerges when followers are drawn to a leader’s personality, ideals, or vision. Political leaders,  Spiritual leaders  and leaders of informal organisation often rely on this form of power.

Legitimate Power

This power is derived from a leader’s formal position within the organisation. It grants them the authority to make decisions, control the situations and get the compliance done.  Heads of the States and Constitutional Authorities, Judiciary Personnel, Government Officials, Chairman and CEOs of Business Organizations, Principals and Directors of the Institutes are vested with this type of power. Here, power flows from the position itself, not necessarily from personal charisma.

Expert Power

This power comes from a leader’s knowledge, skills, and expertise in a critical domain—such as science, technology, or economics. People trust and respect leaders who are seen as a experts. Their insights are sought after by governments and corporations alike.

Network Power

This type of power is derived from a leader’s network and relatiobships they have built.  A person with strong connections—be it classmates, former students, or relatives and friends in high places—can wield significant influence. In fact, organizations often value leaders with robust alumni or professional networks, such as those from IITs or Ivy League Schools.

The Purpose and Ethics of Power:

Power is essential to bring about social, political, or organizational change. But it must be exercised with caution. Power is like fire—capable of lighting the path or burning the house.  

When misused,  power corrodes the soul of the leader and eventually exacts a price. Temptations abound—corruption, manipulation, self-interest—are ever present. But a true leader remains anchored in values. Only then will he experience peace and  fulfilment after his tenure ends.

To acquire power ethically, a leader must build trust, and inspire followers by aligning with their dreams and ambitions. This requires not just charisma, but also communication skills, emotional intelligence, and unwavering integrity.

Politics:

Politics is often described as the exercise of power or the ability to influence others.

The term politics often carries negative connotations—“He is playing politics.” Politics is the pursuit of power. Aspiring to power is not wrong; compromising one’s values to get there is. It becomes problematic when individuals seek power through unethical means, even when they lack the competence or legitimacy to lead.

Here, I respectfully differ from Robert Greene, author of ‘The 48 Laws of Power’. While his work offers strategic insights, I believe that any law or tactic that violates ethical principles should be rejected. Power gained through manipulation is fragile and ultimately self-defeating.

Influence:

Influence is the process by which a leader shapes the attitudes and actions of followers. This influence is built on trust, empathy, openness, transparency, and shared vision. The leader motivates the followers and encourages them to work for the attainment of a goal.  

Importantly, influence is reciprocal. Followers also influence the leader and make him change in his actions and behaviour.

Leading by self example is the best way to influence the people.

A Personal Reflection:

During a state-wide training program on ‘Institutional Management’ for polytechnic teachers, I conducted a session on ‘Power, Politics, and Influence’. Drawing real-life examples, including my own as leader of formal and informal organisations, I shared insights that resonated deeply with participants. I concluded with this reflection: 

‘To implement welfare program or bring change in organization, power is required. Power is acquired by doing politics which is done by influencing people. People are influenced by leader understanding their psychology, and promising fulfilment of their needs and ambitions.’

Dr. Mahendra Ingale @ Pune on Nov 11, 2025

( Value- Based Leadership, Publishing soon)

#ValueBasedLeadership #Leadership

Sunday, November 9, 2025

मूल्याधिष्ठित भरारी...

 माणसाला पक्ष्यांसारखे उडता येत नाही, पण विमानाच्या सहाय्याने तो पक्ष्यांपेक्षा उंच भरारी घेऊ शकतो. माशासारखे पाण्याखाली राहता येत नाही, पण पाणबुडीच्या सहाय्याने समुद्राच्या तळाशी पोहोचू शकतो. हत्तीपेक्षा बलवान नसतानाही, अंकुशाच्या सहाय्याने त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. वाघासारख्या हिंस्त्र प्राण्याची बंदुकीच्या सहाय्याने शिकार करू शकतो.

हे सर्व मानवाला शक्य झाले आहे—त्याच्या सुसंघटित प्रयत्नांमुळे, विशिष्ट प्रणालींचा कल्पकतेने उपयोग करण्याच्या क्षमतेमुळे, आणि सतत नवकल्पना शोधण्याच्या वृत्तीमुळे.

अठराव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. मास प्रॉडक्शन, टाइम स्टडी आणि कार्यक्षमतेवर आधारित व्यवस्थापन पद्धतींनी उत्पादन प्रक्रियेत क्रांती घडवली. शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी या परिवर्तनात मोलाचा वाटा उचलला.

याच काळात Organisational Behaviour आणि Organisational Development या संकल्पना उदयास आल्या. संस्था ही केवळ एक रचना नसून ती एक सजीव घटकासारखी वागते—Organisation behaves like an entity. म्हणूनच तिचा अभ्यास करता येतो, आणि योग्य नियोजनाद्वारे तिचा विकासही साधता येतो.

संस्थेच्या कार्यक्षमतेसाठी चार मूलभूत पैलू ओळखले गेले:

•  Planning – उद्दिष्टांची स्पष्टता व ते साधण्या करिता नियोजन  

•  Coordinating – विविध घटकांमध्ये समन्वय 

•  Directing – सहकऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन

•  Controlling – नियोजनानुसार कार्य सुरू राहावे या करिता अधिकाराचा वापर

या सर्व प्रक्रियांना प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी Influence हे एक महत्त्वाचे माध्यम ठरते—ते केवळ अधिकारातून नव्हे, तर विश्वास, संवाद आणि नैतिकतेतून निर्माण होते.

याचबरोबर System Approach ही संकल्पना उदयास आली. उत्पादन प्रक्रियेत Input (कच्चा माल), Process (प्रक्रिया), आणि Output (उत्पादित घटक), व ठरविल्यानुसार आऊटपूट मिळवा या करिता प्रक्रिये दरम्यान आवश्यक बदल सुचविण्याकरिता Feedback यंत्रणा या पद्धतीने ही संकल्पना राबविण्यात येते. आता, System Approach केवळ उत्पादनापुरती मर्यादित न राहता शिक्षण, आरोग्य, प्रशासन, आणि नेतृत्व अशा विविध क्षेत्रात परिमाणकारकरित्या  वापरली जाते. 

केवळ भौतिक साधनांची निर्मिती करून सुखसुविधा निर्माण करणारे नव्हे, तर मानवी जीवन अधिक अर्थपूर्ण, समाधानी आणि मूल्याधिष्ठित बनवण्याचा विचार करणारे नेतृत्व असायला हवे . सुखसुविधा पुरवणे ही एक पायरी आहे, पण मानवजातीच्या कल्याणासाठी विचार करणे हे अंतिम ध्येय असायला हवे.

नेता हा संस्थेचा महत्वाचा घटक, जो संस्थेला दिशा, प्रेरणा आणि मूल्य देतो आणि मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणण्यास मदत करतो .

हेच नेत्यांचं कार्य आहे. अशा नेतृत्वाची गरज आहे, जे केवळ कार्यक्षमतेवर नव्हे, तर मूल्यांवर आधारित असेल.

डॉ. महेंद्र इंगळे @ पुणे, नोव्हेंबर ९, २०२५

Monday, November 3, 2025

Value-Based Leadership: Engineering Dreams, Inspiring Souls

Coming Soon…

Book:

Value-Based Leadership: Engineering Dreams, Inspiring Souls

A soulful journey from reflection to creation.

One quiet moment, a thought stirred within me:

Should I write a book on leadership—when so many already exist?

I paused. I pondered. And then, the answer came: Yes.

Not to add one more book, but to offer one more voice—rooted in values, shaped by experience, and guided by intuition.

Thus began the journey of Value-Based Leadership.

To my surprise, I discovered that many chapters were already alive—shared as heartfelt posts on social media, embraced by readers, and even recognized by Facebook as “High Quality Content.”

I began rearranging those reflections, weaving in new ones, and letting the book take shape in its own organic way.

Even now, I do not fully know what form it will take—but I do know what spirit it carries.

Cover:

At its heart lies a golden compass, symbolizing ethical navigation, timeless wisdom, and the courage to choose direction over drift. It’s not just about where a leader goes, but why and how they journey. The compass guides decisions even in turbulent times.

Above it rises a torch, an emblem of enlightenment, purpose, and the enduring flame of inspiration. It represents the soul of leadership: the ability to illuminate paths for others, to kindle hope, and to lead not by dominance but by example.

The white background offers purity and space—suggesting reflection, humility, and openness. It reinforces the idea that true leadership is rooted in simplicity and sincerity.

The title in a deep blue, the color of depth, the color of oceans and skies reflects the expansive reach of value-based leadership across disciplines, cultures, and generations.

The subtitle, “Engineering Dreams, Inspiring Souls,” bridges the technical and the emotional realms.

This book will explore:

• Different forms of leadership—personal, political, corporate, and civic

• Aspects of leadership such as problem-solving, ethical dilemmas, and decision-making

  And ultimately, my personal framework:

“Decision Making With Intuition Integrated With Prayer”—a soulful approach that blends inner clarity with spiritual grounding.

It is written for:

• Professionals seeking purpose beyond performance

• Statesmen and politicians navigating ethical crossroads

• Citizens aspiring to lead with integrity in everyday life

If this resonates with you, I invite you to:

• Share your thoughts, stories, and reflections on value-based leadership

• Provide insights in the field of leadership and establish yourself as a thought leader.

• Connect if you are a publisher who believes in meaningful, values-driven literature

Let’s shape a leadership narrative that walks with humility and speaks with conviction.

Let it be a mirror for self-reflection—and a torch for future generations.

Dr. Mahendra Ingale @ Pune on Nov 5, 2025

mahendraingale67@gmail.com



हंस, कावळे व मानसरोवर!

 हंस, कावळे व मानसरोवर!

लोक व्यवहारापासून अलिप्त असलेले, गुढ व्यक्तिमत्त्वाचे, प्रतिभावान व प्रथितयश लेखक जी. ए. कुलकर्णी यांची विदूषक ही अंतर्मुख करणारी प्रदीर्घ कथा!

मी ती अनेकदा वाचली. आता ऐकतो. 

व्यस्ततेमुळे मूळ कथा वाचणे किंवा ऐकणे आपल्याला सहज शक्य नाही. त्यामुळे या कथेतील हंस, कावळे आणि मानस सरोवरा संबंधातील विडंबनात्मक रुपक-उपकथेचा काही भाग मी येथे उद्धृत करीत आहे. मूळ कथेतील प्रत्येकी वापरून, पुढे मी या उपकथेचा  कल्पनाविस्तार केलेला आहे.

'एकदा असंख्य कावळे मानससरोवराजवळ जमले. त्या ठिकाणी शुभ्र पंखांचा, लाल चोचीचा एक हंस हंसीबरोबर जलक्रीडा करत होता. कावळ्यांनी एकदम कलकलाट केला व त्यांनी हंसास मानससरोवर सोडून जाण्यास सांगितलं, कारण त्यांच्या आगमनाच्या क्षणापासून मानससरोवरावर त्यांची सत्ता सुरु झाली होती.

"अनादिकालापासून हे सरोवर हंसांसाठीच आहे." हंस म्हणाला, "शिवाय तुम्हाला पोहता येत नाही, तर मानससरोवर हवं कशाला?"

"आम्हाला पोहता येत नसेल, पण त्याचा आणि स्वामित्वाचा काय संबंध आहे? आपल्या सत्तेची नृत्यशाला अथवा गायनशाला असेल तर आपल्याला नृत्य-गायन आलंच पाहिजे असं कुठे आहे?" कावळ्यांच्या नेत्याने राजकारणी हसून विचारले. हा नेता मोठा व्युत्पन्न होता व त्याने कृष्णद्वीपात जाऊन न्याय व राज्यशास्त्राचा प्रगाढ अभ्यास केला होता.

"आणि आत्ताच्या आत्ता तू मानससरोवर सोडून गेला नाहीस, तर आम्ही सगळे तुझ्यावर तुटून पडू व तुझा आणि तुझ्या निवासस्थानाचा पूर्ण नाश करू!" एका तरूण कावळ्याने गर्जून सांगितले.

परंतु त्याच्या या कर्कश शब्दांनी नेत्यास क्रोध आला व त्याचे संस्कारित मन फार व्यथित झाले. त्याने आपल्या उतावीळ अनुयायांस गप्प बसवले. अशा त-हेच्या आततायी उपायांची योजना आता रानवट झाली होती आणि तिला कृष्णद्वीपनीतीत स्थान नव्हते. त्याने पुन्हा सौजन्यपूर्वक हसून म्हटले, "आपलं म्हणणं मला पूर्ण मान्य आहे. मानससरोवर हंसांसाठीच आहे, ही आपली प्राचीन परंपरा मला अढळ राखायची आहे. उलट, त्या पवित्र परंपरेच्याच सामर्थ्यशाली आश्रयाने मला मातृदेशाची कीर्ती वृद्धिंगत करायची आहे. पण त्यासाठी हंस कोण हे आधी ठरलं पाहिजे. आपण हंस आहात हे कशावरून?"

हंसाला या प्रश्नाचा मोठा विस्मय वाटला. त्याने आपल्या शुभ्र पंखांकडे पहिले. त्याला जलातील प्रतिबिंबात आपली डौलदार मान, तिच्या अग्रभागी असलेली कमलदलासारखी लाल चोच दिसली. पण आपण हंसच आहोत हे सांगण्यास त्यास प्रमाण सुचेना. कावळ्यांचा नेता नम्रपणे हसला. तो म्हणाला, "तेंव्हा प्रथम आपण या प्रश्नाचा निर्णय लावू. येथे उपस्थित असलेल्या सर्वांना आपण एकेक पान आणायला सांगू. जर आपण हंस असाल तर त्यांनी लाल पान आणावं. जर त्यांना मी हंस आहे असा विश्वास असेल तर त्यांनी हिरवं पान आणावं."

" पण या ठिकाणी हंसापेक्षा कावळेच संखेने जास्त आहेत." हंसी म्हणाली.

"देवी, आपले शब्द पूर्ण सत्य आहेत, पण तो आमचा का अपराध आहे?" नेता विनयाने म्हणाला.

थोड्याच वेळात त्या ठिकाणी हिरव्या पानांचा ढीग जमला. हंसीने जाऊन कमळाची एक लाल रंगाची अस्फुट कळी आणून ठेवली.

कावळ्यांचा नेता म्हणाला, "पाहिलंत? न्यायनीतीनुसार निर्णय घेऊन मी हंस ठरलो आहे, हे इतर सारे माझेच आप्तगण असल्यामुळे अर्थात ते देखील हंसच आहेत; आणि आता आपणच मान्य केलंत की, मानससरोवर हंसांसाठीच आहे. तेंव्हा तुम्ही आता येथून जावं हे न्यायाचं होईल."

हंस खिन्न होऊन सरोवराबाहेर आला. हंसीने त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, "प्रिया, तू खिन्न का?" ती म्हणाली, "पानांच्या राशीनं का हंसत्व ठरत असतं? चल, आपण येथून जाऊ. तू ज्या जलाशयात उतरशील ते मानससरोवर होईल! जेथे तू दिसशील ते तीर्थक्षेत्र ठरेल!"'

सरोवरात, हंसाच्या वळचणीने राहणारी बदके,  समोरच्या झाडावरील वानर,  झाडाच्या ढोलीत राहणारी खार हे हंस व कावळ्यांच्या नेत्यातील संवाद उत्कंठतेने ऐकत होते; तसेच आणलेली लाल व हिरवी पाने मोजून हंस कोण हे ठरवण्याची नाविन्यपूर्ण प्रक्रिया जवळून बघत होते. कावळ्याच्या नेत्याचे  सामर्थ्य, बुद्धीवैभव, वाक्चातुर्य, तर्कसंगत पद्धतीने त्याने केलेले विवेचन, त्याचा शांत व संयमी स्वभाव बघून ते फार प्रभावित झाले. आपणांस अनुयायी म्हणून स्वीकारावे अशी त्यांनी नेत्याकडे आजिजीने विनंती केली; ती त्याने मान्य केली. त्यानंतर घारी आणि  गिधाडांनीही कावळ्यांच्या नेत्याचे नेतृत्व स्वीकारले.

कावळ्यांच्या नेत्याने मानसरोवर बगळ्यांकडे, तर समोरचा भूप्रदेश वानराकडे सोपविला. खारीला आवश्यक त्या सुखसोयी ढोलीतच पुरवण्यात येत असून; सभोवतालच्या प्रदेशाच्या टेहळणीची  जबाबदारी तिच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

आकाशात उंच भरारी घेणारा व आपल्या तीक्ष्ण नजरेने भक्ष्याचा वेध घेऊन, वेगाने झडप घालणारा सुवर्ण गरुड परिस्थितीचे अवलोकन करीत होता. उद्या हेच कावळे पानांचे भारे गोळा करत माझ्या कांचनगौरी शिखरावर अधिकार सांगू लागतील हा विचार त्याच्या मनात येताच त्याच्या अंगावरील पिसे उसळली व डोळ्यात अंगार फुलला... 


*प्रा. महेंद्र इंगळे, जळगांव -पुणे*


(ता.क. कथेत लेखकाला अभिप्रेत असलेले हे कृष्णद्वीप म्हणजे जागतिक दर्जाचे Harward  सारखे एखादे विद्यापीठ तर नाही ना? नेत्याने तेथून MBA, Doctorate of Law, Juris Doctor या सारख्या पदव्या प्राप्त केल्या होत्या काय?  असे प्रश्न मला पडतात.)

Realised Dreams, Rising Power

  Realised Dreams, Rising Power A river begins as a trickle in the mountains. At first, it flows quietly, nourishing the soil and quenchin...