Sunday, August 31, 2025

सत्य आणि आभास!

सत्य आणि आभास!

एका लहान गावात, जि प शाळेच्या चौथ्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी, वर्गात बसला होता. शिक्षक अजून यायचे होते. कौलारू इमारतीच्या शाळेतील वर्गाच्या भिंती पांढऱ्या चुन्याने रंगविल्या होत्या. त्या चार भिंतींवर गेरुने पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण असे लिहले होते. त्याखाली, प्रत्येक भिंतीवर एक सुविचार लिहला होता. पूर्वेकडच्या भिंतीवरील ‘नेहमी सत्य बोलावे’ हा सुविचार या विद्यार्थ्याने सहज म्हणून वाचला…पण तो त्याच्या मनात रुजला.

काही वर्षांनी तो Velocity, Relative Velocity आणि Absolute Velocity शिकला.

‘धावत्या रेल्वेतून बाहेर  बघितले असता झाडे पळतांना दिसतात.’ याचे त्याला कारणांसह स्पष्टीकरण विचारण्यात आले. त्याने हे सापेक्ष वेगा मुळे घडते असे कारण देवून स्पष्ट केले.

सत्य आणि आभास याचा त्याला भास होऊ लागला!

त्याला आइन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताची ओळख झाली. सत्य या विषयावर त्याने काही ग्रंथ वाचले आणि प्रवचने ऐकली. 

त्याने वाचले आणि ऐकले की, ‘ज्यांना सत्य समजते ते बोलत नाहीत. ते मौनात जातात.’

त्याने काहींना सत्याचे प्रयोग करताना बघितले तर काहींना त्याचा शोध घेतांना!

प्रयोग करणाऱ्यांना काय निष्कर्ष काय मिळाले? आणि शोध घेणाऱ्यांना ते सापडले का?

सत्य बोलण्यापुरते मर्यादित आहे का?

त्याच्या मनात प्रश्नांची मालिका सुरू झाली:

सत्याचे प्रकार असतात का? जसे की वैज्ञानिक सत्य, तात्विक सत्य, वैयक्तिक सत्य…

प्रत्येकाचे सत्य वेगळे असते का?

आपणही सत्याचा शोध घ्यावा का?

आणि समजा ते सापडले तर त्याचे पुढे काय करायचे?

आपल्याला सापडलेल्या सत्याचा इतरांना काय उपयोग होईल?

असे प्रश्न त्याला अलीकडे पडू लागले आहेत.

शाळेच्या भिंतीवरील सुविचार आता त्याच्या विचारांचा केंद्रबिंदू होतांना दिसत आहे!

प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, जळगांव  @ ऑगस्ट ३१, २०२५

Thursday, August 28, 2025

Organisational Addiction: The Comfort Trap in Corporate Culture

Organisational Addiction: The Comfort Trap in Corporate Culture

In my frequent interactions with engineers working in multinational and giant companies, I’ve observed a subtle yet powerful pattern, one that reveals much about the emotional landscape of today’s workplaces. 

It begins quietly, often on a Friday evening, and unfolds into what I call “Weekend Mania.”

Employees, either in small groups or through company-organised events, head to nearby hotels, resorts, or restaurants. These gatherings—bachelor parties, family outings, farewell dinners, project completion celebrations, or welcome events —are framed as team-building exercises or cultural bonding. But beneath the surface lies a deeper phenomenon I term Organisational Addiction.

What Is Organisational Addiction?

Organisational Addiction is not about substance or vice, it’s about emotional dependency on the corporate environment. Employees become attached not necessarily to the work itself, but to the comfort zone created by:

        Familiar colleagues

        Known geography -proximity of office and residence

        Established routines

        Social rituals and celebrations

This addiction is externally driven. It thrives on parties, outings, and events that create a sense of belonging, but often without deeper purpose. Employees may not be truly passionate about their assignments, yet they continue in the organisation because it feels safe, familiar, and socially engaging.

Organisational Commitment: A Different Path

In contrast, organisational commitment is an internal bond. It arises when an individual:

        Feels emotionally connected to the organisation’s mission

        Derives deep satisfaction from their work

        Sees personal growth aligned with organisational goals

        Values ethics, transparency, and long-term contribution

Organisational Commitment is long-lasting. It doesn’t depend on external stimulation. It’s built through sincerity, hard work, and shared purpose. It’s the difference between attending a party and building a legacy.

The Psychology of Comfort Zones:

Many employees remain in organisations not because they love the work, but because they feel psychologically secure in the ecosystem- familiar faces, known geography, and predictable routines. This comfort zone can quietly discourage growth, innovation, and meaningful engagement. 

Creativity Beyond the Workplace:

When we talk about creativity, it is often confined to innovation within the organisation. But creativity is not limited to corporate strategy or product design- it lives in daily life, in small and seemingly petty things. It is not a big deal; it’s a way of thinking, a way of living!

A creative mind finds joy in solving problems, expressing ideas, and connecting with others. And when employees are creative and satisfied, organisations don’t just benefit, they flourish.

Final Reflection:

A deeper understanding of the dynamics between Organisational Addiction and Organisational Commitment can empower Top Management and HR Leaders to craft thoughtful policies and foster environment where employees truly thrive, not merely servive!

Having mentored young professionals and closely observed workplace dynamics over the years, I find the the distinction between Organisational Culture and Organisational Addiction not only relevant, but also essential in today’s fast-paced, package-driven corporate landscape!

 

Wednesday, August 27, 2025

प्रा के पी अकोले निवृत्त होतांना…

 प्रा के पी अकोले निवृत्त होतांना…

३३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि सन्माननीय शासकीय सेवेनंतर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेचे अधिव्यखाता तथा प्रभारी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले,  प्रा. के. पी. अकोले सर, शासकिय तंत्रनिकेतन, जळगांव येथुन निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून त्यांनी संस्थेतील शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्यात उत्कृष्ट योगदान दिले. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता नवीन शैक्षणिक धोरणास (NEP) अनुसरून K -Curriculum अभ्यासक्रम तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

All India Council for Technical Education (AICTE) या संस्थेद्वारे तयार करण्यात येणाऱ्या Model Curriculum तयार करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ते सहलेखक असलेले  Elements of Electrical and Electronics हे पुस्तक AICTE ने १८ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित केले. MSBTE अभ्यासक्रमांकरिता ५० पेक्षा अधिक, आणि SPPU, Pune; KBCNMU, Jalgaon; Shivaji University, Kolhapur; Uttarakhand Technical Board यांतील अभ्यासक्रमाकरिता अनेक पुस्तके त्यांनी लिहली आहेत. छत्तीसगढ राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन, दुर्ग येथे ते Department Advisory Committee वर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. 

गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, बेळगांव येथून B E ( Electronics and Telecommunication) पदवी प्राप्त केल्यानंतर, १९८७ मधे जळगांव येथील SMIT तंत्रनिकेतनात ते अधिव्यखाता म्हणून रुजू झाले तेव्हा पासून ते परिचित ! मितभाषी, मृदू स्वभावाचे, सहकार्यास नेहमी पुढे असणारे, कठीण प्रसंगातही शांत आणि धैर्यशील असणारे व नेहमी हसतमुख राहणारे प्रा. अकोले आपल्या सहकाऱ्यांमध्ये अत्यंत प्रिय होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात ते नेहमीच अग्रेसर असायचे. 

सुरवातीच्या काळात विना अनुदानित संस्थेत कार्यरत असल्याने आणि नंतर शासकीय तंत्रनिकेतनात अधिव्यखाता म्हणून मुंबई येथे नेमणूक झाल्याने,  व तेथे, संचालयामध्ये आणि World Bank Assistted Project (WBAP) मधे काम करण्याची संधी मिळाल्याने, तसेच काही काळ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगांव येथे प्रति नियुक्तीवर असल्याने, त्यांचे Net Working अत्यंत प्रभावी झाले. त्याचा त्यांना आणि ते ज्या ठिकाणी कार्यरत राहिले त्या संस्थांना खुप फायदा झाला. सेवेत असतांना त्यांना  NITTTR, Chandigarh येथून M E (Computer Science) हे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी मिळाली. 

Canada India  Institute- Industry Linking Project (CIIILP) या प्रकल्पात आम्ही सोबत काम केले. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. मनोहर पर्रिकर यांनी पणजी येथे आयोजित केलेल्या Show Case मधे त्यांचा सहभाग होता. तसेच MSBTE कडून Non-AICTE अभ्याक्रमांकरिता Norms and Standards तयार करण्याच्या प्रकल्पातही आम्ही सोबत होतो. या प्रकल्पांत उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना प्रशस्ती पत्रके देवून गौरविण्यात आले.

शासकीय तंत्रनिकेतन, नंदुरबार या संस्थेच्या प्राचार्य आणि आहरण व संवितरण अधिकारी पदाचा कार्यभारही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला. 

शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथे मी प्राचार्य म्हणून कार्यरत असतांना त्यांची मला प्रशासनात खूप मदत झाली. DBT प्रकल्प, विद्यार्थ्यांचे प्रवेश व त्याकरिता संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली, शाळा आणि मुख्याध्यापकांशी संपर्क करून राबविण्यात येणारा School Connect कार्यक्रम, शासकीय तंत्रनिकेतन, मुक्ताई नगर स्थापने संबंधी कामे, प्रकल्प अहवाल तयार करणे, विविध  समित्या, ट्रेझरी संबंधातील कामे, Academic Monitoring, MSBTE सोबत Laisoning,  NBA संबंधातील प्रशिक्षण, सार्वत्रिक निवडणुकांत Nodal Officer म्हणून काम करतांना संस्था आणि जिल्हा प्रशासनाशी समन्वय, कोविड कालावधीत वरिष्ठ कार्यालयांनी मागविलेल्या माहित्यांचे वेळेत संकलन या कामात त्यांची मला बहुमोल मदत झाली.

शासकीय तंत्रनिकेतन जळगांव या संस्थेशी त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यांच्या दोन्ही मुली आणि मुलाने या संस्थेतून पदविका प्राप्त करून पुढे उच्च शिक्षण घेतले.

कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडून, एक आदर्श शिक्षक म्हणून ते निवृत्त होत आहेत. शासकीय सेवेत ते सन्मानाने आणि निष्ठेने जीवन जगले. निवृत्ती नंतरच्या त्यांच्या आनंददायी आणि निरामय आयुष्या करिता मी प्रार्थना करतो!

प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, जळगांव @ ऑगस्ट ३०, २०२५

Monday, August 25, 2025

विनम्र अभिवादन- कवयित्री बहिणाबाईं!

 विनम्र अभिवादन- कवयित्री बहिणाबाईं !

आज २४ ऑगस्ट रोजी, रोटरी क्लब जळगांव आणि व. वा. जिल्हा वाचनालय जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने, कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती निमित्ताने, ‘रोटरी वाचन कट्टा’ या उपक्रमा अंतर्गत ‘बहिणाबाईंच्या कवितांचे वाचन’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन ‘अभियंता भवन’ येथे करण्यात आले होते.

रोटरी क्लब अध्यक्ष मा. रो. गिरीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात, ‘वाचन कट्टा’ या उपक्रमाबाबतची भूमिका विषद केली. अभियंता भवनात होणाऱ्या या कार्यक्रमात, प्रसंगाचे औचित्य साधून महान अभियंता भारतरत्न विश्वेश्वरय्या हे कसे महान लेखकही होते ते त्यांच्या आत्मचरित्राचा उल्लेख करून त्यांनी सांगितले.

मराठी साहित्यात बालसाहित्याचे लेखन करणाऱ्या भावकवयित्री, गीतकार, लेखिका आणि समीक्षक, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे अशा जेष्ठ कवयित्री सौ. माया धुप्पड  यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचे वाचन, त्याच सोबत त्यांचे रसग्रहण अतिशय सुंदर रितीने केले; आणि त्यांच्या काही ओव्यांचे गायन केले. येणाऱ्या अभियंतादिनाच्या शुभेच्छा देवून भारत रत्न इंजि. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनातील ठळक वैशिष्टे सांगितले.

‘प्रतिमा’ या ललित लेख संग्रहाच्या, आणि ‘अस्मिता’ या काव्य संग्रहाच्या, लेखिका आणि कवयित्री सौ. पुष्पा साळवे यांनी बहिणाबाईंचा जीवनपट उलगडून दाखविला आणि बहिणाबाईंवर स्वरचित कविता प्रभावीरित्या सादर केली. 

‘अभियांत्रिकी स्पंदने’ या पुस्तकाचे लेखक इंजि. प्रा. डॉ. महेंद्र इंगळे यांनी आपल्या मनोगतात,

‘शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बहिणाबाईंनी, आपल्या साध्या सोप्या बोलीभाषेत स्त्रियांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या; आणि जीवन संघर्ष्याच्या कहाण्या ऐकविल्या. आपल्या सूक्ष्म निरीक्षणातून आणि चिंतनातून, निसर्गाची रहस्ये उलगडून दाखविली; मानवी मनाच्या वर्तनावर भाष्य केले आणि अध्यात्मही सांगितले! 

ज्या जीवन संघर्षाला त्या स्वतः धीराने सामोरे गेल्या तो त्यांनी आपल्या कवितेतून मांडला. आपला स्वानुभव त्यांनी अंतःप्रेरणेने शब्दबद्ध केला म्हणून त्याला चिरंतन स्वरूप प्राप्त झाले. त्यांची कविता आपल्या हृदयाच्या गाभ्यापर्यंत जाऊन पोहचते आणि म्हणूनच ती पुन्हा पुन्हा वाचाविशी आणि ऐकाविशी वाटते.

‘सरसोती’ला आपली माय मानून, 

‘अरे,संसार संसार जसा तवा चुल्हयावर 

आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर’

या शब्दांतून जीवन संघर्षाचे सत्य त्या सहजरित्या मांडतात!

‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर 

किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर’

यातून मानवी मनाच्या वर्तनावर समर्पक शब्दात भाष्य करतात !’, असे सांगितले.

कवयित्री ज्योती वाघ, संगीता महाजन, प्रिया सफळे, अर्चना पाटील, महिला अधीक्षिका प्राची पाटील, आणि पूर्वेश पाटील व योगेश पाटील या विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या कवितांचे वाचन केले.

या कार्यक्रमास रोटरी क्लबचे सचिव रो. सुभाष अंमळनेरकर, कार्यकारी सचिव रो. पंकज व्यवहारे, एनक्लेव चेअरमन रो. इंजि. जितेंद्र ढाके, व. वा. वाचनालयाच्या मानद सचिव रो. प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी, अभियंता पतपेढीचे चेअरमन इंजि. प्रमोद पाटील, व्हा. चेअरमन इंजि. चंद्रकांत तायडे,  संचालिका इंजि. स्वाती नन्नवरे, संचालक इंजि. एस पी चव्हाण, इंजि. ब्रह्मानंद तायडे, इंजि. दिपक निकम, इंजि. सौ. लता इंगळे, रोटरी क्लब, व. वा. वाचनालय व अभियंता पतपेढीचे पदाधिकारी, जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल मा. सुहास रोकडे, परिवर्तनचे हर्षल पाटील, साहित्य क्षेत्रातील मान्यवर, अभियंते, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्यांनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या त्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देवून सन्मान करण्यात आला.

संस्थापक चेअरमन तथा आजीव अध्यक्ष इंजि.साहेबराव पाटील यांनी आभार मानले.

Wednesday, August 20, 2025

कवयित्री बहिणाबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

कवयित्री बहिणाबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

२४ ऑगस्ट रोजी रोटरी क्लब जळगांव आणि व. वा. जिल्हा वाचनालय जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने, कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती निमित्ताने, ‘रोटरी वाचन कट्टा’ या उपक्रमा अंतर्गत ‘बहिणाबाईंच्या कवितांचे वाचन’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान महाबळ रोड वरील, ‘अभियंता भवन’ या ठिकाणी येथे आयोजित करण्यात आला आहे.

त्याबद्दल रोटरी क्लब, व वा वाचनालय आणि अभियंता पतपेढीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देवून त्यांचे अभिनंदनही करतो.

बहिणाबाई चौधरी जळगांव जिल्ह्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या अस्मिता!

औपचारिक शिक्षण न घेताही, आपल्या अनुभवांवर आधारित कवितांनी मराठी साहित्यात अमिट ठसा उमटविणाऱ्या बहिणाबाईंच्या नावाने जळगांव येथे ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ’ आहे हेच त्यांच्या प्रतिभेचे आणि लोकमान्यतेचे मोठेपण दर्शविते.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बहिणाबाईंनी, आपल्या साध्या सोप्या बोलीभाषेत स्त्रियांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या; आणि जीवन संघर्ष्याच्या कहाण्या ऐकविल्या. आपल्या सूक्ष्म निरीक्षणातून आणि चिंतनातून, निसर्गाची रहस्ये उलगडून दाखविली; मानवी मनाच्या वैशिष्ट्यावर भाष्य केले आणि अध्यात्मही सांगितले! 

ज्या जीवन संघर्षाला त्या स्वतः धीराने सामोरे गेल्या तो त्यांनी आपल्या कवितेतून मांडला, म्हणूनच त्यांची कविता आपल्या हृदयाच्या गाभ्यापर्यंत जाऊन पोहचते. आणि म्हणूनच त्यांच्या कविता या पुन्हा पुन्हा वाचाव्याशा आणि ऐकव्याशा वाटतात.

त्या जेव्हा, ‘सरसोती’ला आपली माय मानून, 

‘अरे,संसार संसार जसा तवा चुल्हयावर 

आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर’

हे सांगतात तेव्हा जीवन संघर्षाचे किती मोठे सत्य त्या सहजपणे मांडतात !

‘मन वढाय वढाय,

उभ्या पिकातलं ढोर 

किती हाकला हाकला, 

फिरी येतं पिकांवर’

यातून मानवी मनाच्या वर्तनावर  किती समर्पक शब्दात भाष्य केले आहे !

अशा अनेक निवडक कवितांचे वाचन, जेष्ठ कवियित्री सौ. माया धुप्पड आणि सौ. पुष्पा साळवे या प्रभावीपणे करणार आहेत. त्यांच्या वाचनातून बहिणाबाईंच्या शब्दांचे स्पंदन पुन्हा एकदा आपल्या मनात घुमेल!

या कार्यक्रमास उपस्थित राहून, बहिणाबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्याची संधी आपण अवश्य घ्यावी अशी मी आपणास विनंती  करतो.

प्रा. डॉ. महेंद्र इंगळे @ ऑगस्ट २१, २०२५

Engineering Heart Beats Reach Young Hearts !

Engineering Heart Beats Reach Young Hearts !

Today was a day of quiet pride and deep satisfaction. I was invited by the enthusiastic team at Dexcel Digital Hub Pvt. Ltd., where a group of young IT engineers had come together to felicitate me for my Marathi book ‘Abhiyantriki Spandane’. Many of them had purchased the book online, read it with keen interest, and found it not just inspiring, but guiding. Their discussions around the book led to a heartfelt request: They wished to meet me in person, receive my autograph, and seek guidance on shaping their careers.

Their gesture touched me deeply. In a world often driven by metrics and packages, here was a group of young professionals seeking meaning, values, and direction.

The event was beautifully organised. Present were: Mr. Dattatray Waghmode, Director, Mr. Shivraj Shendge, HR, Mr. Dipak Gaikwad, Mrs. Mayuri Patil Kharche and several other bright minds who had taken time out of their demanding schedules to honour a writer!

They offered me a bouquet, a thoughtful gift of Ferrero Rocher, and a Certificate of Appreciation that read: “Your book has inspired us and contributed positively to the betterment of social life.”

I signed their copies with messages of best wishes, and we shared a joyful photo session. But more than the ceremony, it was the sincerity in their eyes and the warmth in their words that stayed with me.

My brief address to them:

Dear Friends,

It’s a joy to share with you today, not just as an author, but as a fellow traveler in the journey of engineering, learning, and life. Your appreciation for ‘Abhiyantriki Spandane’ has touched me deeply. But more than the felicitation, it is your sincerity, curiosity, and respect that have truly moved me.

Let me share a few thoughts that I believe are worth carrying into your careers and lives.

In today’s fast-paced world, many chase packages, perks, and promotions. But I urge you to pause and ask: What truly brings fulfilment?

Dear Friends,

Work hard. Enjoy the work. Joy in work elevates your self-image, and with it, your esteem in the eyes of your family and society.  Sincerity and Hard Work are timeless virtues. They may not trend on social media, but they build legacies!

Teamwork, Transparency, and Shared Challenges create cultures that thrive, not just survive!

Organisational Commitment is not a transaction, it’s a relationship! It gives you deep satisfaction.

And here’s something I’ve learned over the years:

When you are innovative and creative, you will find yourself energetic.

Creativity isn’t just a skill, it’s a source of vitality. It keeps your spirit awake, your mind curious, and your work meaningful.

Now I share with you something close to my heart:

Life is simple. We make it complex.

We clutter it with comparisons, chase illusions, and forget the essence. But the truth is:

Love, Gratitude, Compassion, and Kindness are the eternal values. They don’t just decorate life; they define it! They act as a compass that leads us to fulfilment. In your careers, relationships, and reflections, let them guide you!

Let me quote here a few lines from the poem by Nobel Laureate Pablo Neruda:

“You start dying slowly
if you do not travel,
if you do not read,
if you do not listen to the sounds of life,
if you do not appreciate yourself.”

This is not just poetry, it’s a wake-up call.
Don’t let your spirit fade in routine.
Stay curious. Stay kind. Stay alive.

You are not just engineers, you are creators of culture, carriers of values, and contributors to society. Let your work reflect not just skill, but soul!

Thank you for honouring me today. May your journey be rich, not just in success, but in meaning!

Dr. Mahendra Ingale, Pune, @ August 19, 2025

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Monday, August 18, 2025

‘अभियांत्रिकी स्पंदने’—पुण्याच्या ज्ञानपरंपरेत एक नवा ठसा!

 

अभियांत्रिकी स्पंदने’—पुण्याच्या ज्ञानपरंपरेत एक नवा ठसा!

पुणे—विद्येचं माहेरघर!

या शहराने ज्ञान, संस्कृती, आणि विचारांची उज्ज्वल परंपरा जपली आहे!

डेक्कन जिमखाना हे त्या परंपरेचं तेजस्वी प्रतीक, जिथे विचारांचे दीप उजळतात, आणि नव्या कल्पनांना दिशा मिळते!

येथे Book Ganga International Book Store या प्रतिष्ठित दालनात माझं पुस्तक, ‘अभियांत्रिकी स्पंदने’ पोहचलं ! प्रतिष्ठित लेखकांच्या पुस्तकांसोबत ते दिमाखाने स्थानस्थ झालं! माझ्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ! 

पुण्यातील काही जिवलग मित्रांनी सुचवले की हे पुस्तक Book Ganga मध्ये उपलब्ध असावे. त्यांच्या सूचनेनुसार मी त्वरित श्री. विवेक कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला आणि संध्याकाळी त्या दालनात पोहोचलो. मॅनेजर श्री. जोग यांनी अत्यंत आत्मीयतेने स्वागत केले. त्यांनी बुकगंगाच्या योजना, वेबसाइट, ऍप आणि लेखकांसाठी असलेल्या सोयींबाबत सविस्तर माहिती दिली. श्री. कुमार यांनी पुस्तक ठेवण्याच्या औपचारिकता तत्परतेने पूर्ण केल्या. मी पुस्तकाच्या काही प्रती त्यांच्याकडे सुपूर्त केल्या. या प्रतींची विक्री झाल्यावर, पुढील मागणी नोंदविल्यानंतर त्याप्रमाणे प्रती उपलब्ध करून दिल्या जातील अशी व्यवस्था करून दिली. पुस्तकावर २५% सवलत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला—वाचकांसाठी एक आनंददायक बाब!

मा. विठ्ठलराव दीक्षितांचा वारसा लाभलेले, Book Ganga  हे केवळ पुस्तकांचे दुकान नाही, तर एक सांस्कृतिक केंद्र आहे. येथे मराठी आणि इंग्रजी भाषेतील विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना आहे. मी पूर्वीही येथे अनेक पुस्तकांची खरेदी केली आहे. त्या आनंदाच्या आठवणींमध्ये, शेजारी असलेल्या चितळेंकडून बाकरवडी घेण्याचा मोहही अनेकदा अनिवार झाला आहे—कधी पुस्तकांनंतर, तर कधी अगदी उलट!

पण आजचा दिवस वेगळा होता. आज माझेच पुस्तक त्या दालनात स्थान मिळवत होते. पुण्याच्या ज्ञानपरंपरेत माझ्या लेखणीचा ठसा उमटत होता! हा विचारच मनाला गहिवरून टाकणारा होता! 

मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने काही सुंदर क्षण टिपले गेले! विविध पुस्तकांचे दर्शन घेत, वेळ कसा गेला कळलेच नाही. बाहेर पडताना ओलाने घरी जाण्याचा विचार होता, पण त्या जागेपासून निघावेसेच वाटत नव्हते.

मी बुकस्टोरच्या बाहेर बराच वेळ उभा राहून रस्त्यावरची ट्रॅफिक न्याहाळत होतो. समोर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य आणि प्रेरणादायी पुतळा दिसत होता. तो बघून मन भारावून गेले. संध्याकाळच्या गारव्यात पावसाचे बारिक तुषार हवेत विरघळत होते. दिवसभराच्या संततधार पावसाने रस्ते, झाडे, वाहने सगळेच ओलेचिंब झालेले. हातात छत्री होती, पण ती उघडावीशी वाटलीच नाही. वातावरणात एक वेगळीच जादू होती!

ओलाने मी पाऊण तासात घरी पोहोचू शकलो असतो, पण त्या सुंदर संध्याकाळची अनुभूती घेत थोडं चालावं असे मला वाटले. मी चितळेंच्या समोरून, फर्ग्युसन रस्त्यावरून चालत निघालो. मला आवडणारा पुण्यातील हा सगळ्यात सुंदर रस्ता! रस्त्याच्या दुतर्फा असलेली प्रतिष्ठानं न्याहाळत, रुपाली, वैशाली समोरून, फर्ग्यूसन कॉलेजच्या बाजूने चालत, संत तुकाराम पादुका, संत ज्ञानेश्वर पादुका चौक ओलांडून पुढे चालत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उड्डाण पुलापर्यंत पोहचलो. पदपथावरून चालतांना, छत्रीला आणि स्वतःला सांभाळत, टिपता येतील तेव्हढे क्षण कॅमेऱ्यात टिपले! उड्डाण पुलाखालून काटकोनात वळून कृषी महाविद्यालयाच्या बाजूने शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला पोहोचलो. तेथून मेट्रोने भोसरी स्टेशनवर उतरलो, तेव्हा रात्रीचे ९.३० वाजले होते!

सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधे शिकत असतांना, मध्य रात्री नंतर, ग्रँट रोडवरील दिल्ली दरबारहून चालत, रात्रीची मुंबई न्याहाळत हॉस्टेलला पोहोचलो तेव्हा सूर्योदया पूर्वीच्या नारंगी आणि सोनसळी छटांनी न्हालेले आकाश कॅम्पस वर स्वागत करीत होते; त्या क्षणाची आठवण होऊन एक नवीन स्पंदन निर्माण झाले ! 

प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, पुणे @ ऑगस्ट १८, २०२५

ता. क.:  ‘संध्या रात्रीचा फर्ग्युसन रोड’  हा स्वतंत्र ब्लॉग लिहणार आहे, जसा ‘लाँग मार्च’  हा रात्रीच्या मुंबईचे वर्णन करणारा ब्लॉग लिहला आहे. 


 

 

 

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...